जागतिक महिला दिन का साजरा केला जातो?

जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? 

Why World Women's Day is celebrated? 


 महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


दिनांक २८ फेब्रुवारी १९०९रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.



इतिहास ..

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. 


१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.


खरंच, तिला काय हवं आहे ?

   आज महिला दिन आहे.आज तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. तिच्या कर्तृत्वाचे नगारे वाजतील. तिच्याशिवाय हे जगणे कसे अर्थहीन आहे हे पटवून सांगितले जाईल. ती घर, संसार, कुटुंब ,करियर ,व्यवहार, मुलेबाळे सगळे कसे व्यवस्थित सांभाळते ,याविषयी लेख येतील. ती आता सगळ्याच क्षेत्रात कशी आघाडीवर आहे . कशातच कमी नाही, याचेही गोडवे गायले जातील. तिचे श्रेष्ठत्व, कर्तृत्व मान्य करत असताना तिच्यावर अत्याचार मात्र वाढतच आहेत. तिला गर्भात मारण्यापासून विकण्या पर्यंतच्या गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत. तोंडाने गोड बोलून हाताने गळा  दाबला जात आहे. आजही स्त्रीला चार भिंतीत राहणे कसे सुरक्षित आहे , तिने मुलांना कुटुंबाला महत्त्व देणे किती आवश्यक आहे, तिने स्वतःचा, करिअरचा, मनाचा ,भावनांचा विचार न करता मुलांच्या भवितव्याचा, कुटुंबाच्या गरजेचा विचार केला पाहिजे हेही सांगितले जात असतेच.

  एकीकडे हे असे चालू असताना आजकालच्या स्त्रीला घर नको, संसार, मुलेबाळे नको ,लग्न नको, लग्न केले तर सासू-सासरे नको , घराची जबाबदारी नको, स्वयंपाक पाणी नको, असाही डिंढोरा पिटवला जात आहे. मग, मग प्रश्न पडतो....खरंच तिला काय हवं आहे? तिला एकटीने जगायचेय ? खरंच तिला कोणीच नकोय का?.....

तर तसं अजिबात नाही. भारतीय स्त्रीला हे सगळं हवय ..तिने आजपर्यंत हे सगळं केलंय. त्याग, प्रेम , समर्पण, वत्सलता, ममता , करुणा यांची  ती मूर्ती आहे. तिच्या इतके कष्ट कोणीच केले नाही. करणार नाही. तिलाही नवरा , मुलं ,संसार,  कुटुंब सगळे हवे आहे. पण......

हा पण महत्त्वाचा आहे . कारण हे सगळं हवं असताना तिला तिची स्वतःची स्वतंत्रपणे ओळख हवी आहे. अमक्याची बायको , तमक्याची  आई असं म्हणून घेण्यापेक्षा , ती एक  समर्थ नोकरदार ,अधिकारी , डॉक्टर,  इंजिनीयर,  उद्योजिका किंवा अगदी गृहिणी म्हणून तिला तिचे स्थान हवे आहे.तिची ही आयडेंटिटी तिला महत्वाची वाटते. तिला निर्णय घेण्याचे व तो निर्णय अंमलात आणण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. तिला आर्थिक स्वावलंबन, योग्य मानसन्मान हवा आहे.तिचेही कुटुंबात एक स्थान आहे हे सर्वांनी ओळखावे असे तिला वाटते.

तशी ती अल्पसंतुष्ट आहे. तुम्ही शब्दांनी जरी तिची जाणीव ठेवली,  तिची जबाबदारी वाटून घेतली , तिला थोडी मदत केली , तरी ती सगळ्यांसाठी वाटेल ते करायला तयार असते . प्रत्येक वेळी तिला गृहीत धरून तुम्ही तुमचे निर्णय घेऊ नये,  असे तिला वाटते . घरातल्या ज्येष्ठांनी तिचे थोडे कौतुक करावे, थोडी काळजी घ्यावी, नवऱ्याने तिला कमी लेखून येता जाता कोणासमोर अपमान करू नये, मुलांनी, सूनांनी ,मुलींनी गृहीत धरून तिच्यावर विसंबून राहू नये, एवढं तिला हवं आहे . ती तुमच्यासाठी,  सगळ्यांसाठी आहे आणि तिला सगळे हवे आहेत. आता तिला आत्मभान आलं आहे आणि तो आत्मसन्मान तिला हवा आहे.  आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार हवा आहे. हा निर्धार आपण महीलांनीच करायला हवा.मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो .महीला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.