वरखेड च्या मॉडेल शाळेत जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा

 वरखेड च्या मॉडेल शाळेत जागतिक महिला दिवस 

उत्साहात साजरा.. 


जिल्हा परिषद मॉडेल शाळा येथे आज दिनांक ८ March २०२२ रोजी जागतिक महिला दिवसउत्साहात साजरा कारण्यात आला.. 

यावेळी वर्ग ६, ७, ८ च्या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, सायना नेहवाल, डॉक्टर, खेळाडू, मदर टेरेसा अशा नामांकित आपापल्या क्षेत्रात पुढे गेलेल्या स्त्रियांची प्रतीकात्मक वेशभूषा केली. तर काही विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणात ची घोषवाक्य व पोस्टर तयार करून आणली, काही विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे कर्तुत्व सांगणारे भाषणे केली.

यावेळी शाळेतील शालेय पोषण आहार मदतनीस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रीती लेखनआर यांचा देखील सत्कार पुष्पगुच्छ देऊन शाळेतील शिक्षिका दिपाली सूर्यवंशी यांनी केला कार्यक्रमाचे संचालन आयोजन नियोजन रतिराम गायकवाड सर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची क्षणचित्रे पुढील प्रमाणेअधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.