सरल पोर्टल वर विद्यार्थ्यांचे आधार आपल्या मोबाईल वरुनच कसे अपडेट करायचे?

सरल पोर्टल वर विद्यार्थ्यांचे आधार  आपल्या 

मोबाईल वरुनच कसे अपडेट करायचे? 


22021 22 संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधार 31 मार्च 2022 पर्यंत सरल पोर्टल म्हणजेच स्टुडंट पोर्टल वर अपडेट करायचे आहे. ही स्टूडेंट पोर्टल वरील विद्यार्थी आधार अपडेट आपण आपल्या मोबाईल वरुन देखील करू शकतो यासाठी आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड चा फोटो आपल्याकडे असावा किंवा प्रत्यक्ष आधार असले तरी चालेल त्यानंतर आपल्या शाळेच्या स्टुडंट पोर्टल चा यूजर आयडी आणि पासवर्ड एवढ्यात दोन गोष्टी जरी आपल्याकडे असल्या तरी आपण आपल्या मोबाईल वरुन देखील विद्यार्थ्यांची आधार अपडेट स्टुडंट पोर्टल वर करू शकतो.


पापड्या टप्प्याटप्प्याने विद्यार्थी आधार सरल पोर्टल वर आपल्या मोबाईल वरुन अथवा आपल्या कम्प्यूटर वरुन कसे अपडेट करायचे.

आपल्या मोबाईलचा डेटा ऑन असलेच ची खात्री करा आणि आपल्या मोबाईल मध्ये असलेले गुगल एप्लीकेशन ओपन करा.

गुगलच्या सर्च बारमध्ये student portal Maharashtra असे टाइप करून सर्च वर क्लिक करा.


पहिल्या आलेल्या सजेशन वर क्लिक करा त्यानंतर खालील विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमच्या शाळेचा यु डायस नंबर त्यालाच येथील यूजर आयडी असे म्हणतात तो यूजर आयडी म्हणून टाका व व पोर्टल वर सेट केलेला पासवर्ड टाकून खालील कॅपच्या जसाचा तसा टाइप करून लॉगइन वर क्लिक करा.. 


वरील विंडोज लोगिन सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला खालील विंडो ओपन होईल त्यावरील सूचना काळजीपूर्वक वाचून please click here क्लिक करा.. 

त्यानंतर खालील विंडो ओपन होईल त्या बिल्लू च्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या आडव्या तीन रेषांवर क्लिक करा तुम्हाला संपूर्ण मेनू ओपन होईल.. 


ओपन ओपन झालेल्या मेन्यु मधून student entry खालील Update student detail वर क्लिक करा.. क्लिक  


वरील प्रमाणे क्लिक केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल खालील विंडो मधील चालू academic year निवडा वर्ग निवडा stream निवडा Division निवडा व त्या समोरील Go वर click करा.. तुमच्या वर्गा तील विद्यार्थी यादी आलेली दिसेल त्या मधुन ज्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करायचे आहे तो विद्यार्थी शोधा.. 

खालील विंडो मध्ये आलेल्या विद्यार्थ्याचे नाव शोधल्यानंतर त्याच्या नावात समोरील Update वर क्लिक करा.
विद्यार्थ्यांच्या नाव समोरील अपडेट वर क्लिक केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आपल्याला त्यावर दिसते जर विद्यार्थ्यांची आधार यापूर्वी टाकलेले असेल तर पोर्टलवर अगोदर भरलेली माहिती ती व आधार वरील माहिती जुळते का ते पहा यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाची स्पेलिंग, त्याच्या वडिलांच्या नावाची स्पेलिंग, आडनावाची स्पेलिंग आईच्या नावाचे स्पेलिंग, जन्मतारीख, स्त्री आहे की पुरुष ही सर्व माहिती ती आधार वरील माहिती आणि पोर्टल वरील माहिती एकमेकांशी जुळते का ते पहा यापैकी जर एखादी किंवा एकापेक्षा जास्त गोष्टी जुळत नसतील तर त्या दुरुस्त करण्याचे दोन मार्ग एक तर विद्यार्थ्याला बोनाफाईड देऊन त्याच्या आधार वरील चूक दुरुस्त करणे किंवा आधार वरील माहिती जर योग्य असेल आणि 
स्टुडन्ट पोर्टल वर दिलेली माहिती ती विसंगत असेल तर पोर्टल वरील माहिती दुरुस्त करणे. जर आधार वरील माहिती पोर्टल वरील माहिती शी जुळत नसेल तर आधार कार्ड वर दिलेली माहिती किंवा पोर्टल वर दिलेल्या माहितीमध्ये योग्य ती दुरुस्ती करून सर्वात शेवटी असलेल्या save वर क्लिक  करून माहिती अपडेट करा.
जर आधार आर ची नोंद पोर्टलवर केलेलीच नसेल तर आधार कार्ड वरील माहिती ती भरून सेव केल्यास आपले स्टुडंट पोर्टल वरील आधार नोंद देखील आपण याच पद्धतीने करू शकतो.

दुसरा विद्यार्थ्याची आधार नोंद करण्यासाठी अथवा अपडेट करण्यासाठी आपणास पुन्हा वर्ग निवडीपासून सुरू करून टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करता येईल.. 

वरील प्रमाणे सरल पोर्टल वरील आधार नोंद किंवा आधार अपडेट आपण आपल्या मोबाईल वरून देखील करू शकतो त्यासाठी क्रोम या ब्राउझर मधील डेक्सटॉप मोड ऑन करावी म्हणजे अधिक सोयीचे होईल.. 

सरल पोर्टल वरील इतर कामे आपल्या मोबाईल वरुन पैसे खर्च न करता कशी करावी याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नियमित भेट द्या pradipjadhao.com ला.. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 


Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.