भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि. प. शाळा, वरखेड चा कोरोना काळातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अमरावती विभाग स्तरावर सन्मान!!

 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि. प. शाळा, वरखेड चा कोरोना काळातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अमरावती विभाग स्तरावर सन्मान!!


राज्य शासनाने कोरोना काळात ज्या शाळांनी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केले अशा शाळेतील एका शिक्षकाला आपल्या शाळेच्या कामाचे सादरीकरण करण्याची संधी तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर उपलब्ध करून दिली होती.

याअंतर्गत वरखेड आंतरराष्ट्रीय शाळा येथील शिक्षिका उर्मिला शेळके/बावस्कर यांनी शाळेचे सादरीकरण केले या उपक्रमात तालुका स्तरावर शाळेचा प्रथम क्रमांक आला, जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक येऊन विभाग स्तरावर देखील सादरीकरणाची संधी शाळेला मिळाली. 

विभाग स्तरावर शाळेचा दिनांक ०३/०१/२०२२ रोजी बालिका दिनाचे औचित्य साधून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

हा सन्मान सोहळा अमरावती विभागाचे शिक्षण उसंचालक अमरावती विभागीय विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य मिलिंद कुबडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सन्मान स्वीकारण्यासाठी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका उर्मिला शेळके/बावस्कर व संजय बावस्कर सर हे उपस्थित होते.
धन्यवाद!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.