वाक्यांचे प्रकार (Types of Sentences)

वाक्यांचे प्रकार (Types of Sentences)


वाक्यांचे एकूण चार मुख्य प्रकार पडतात..


i)विधानात्मक वाक्य (Statemen/Declarative)

सर्वसामान्यपणे आपण विधानार्थी वाक्य वापरतो ज्यामधे आपण माहिती देण्यासाठी विधान करतो. 

विधानार्थि वाक्यांचे दोन प्रकार पडतात १) होकारार्थी (assertive)  २) नकारार्थी (negative)

I am writing him a letter at my home.

I am not writing him a letter at my home.

 जर आपण विधानार्थी वाक्याचे सूत्र तयार करायला गेलो तर

S + v + o + c +.

S = subject (कर्ता) v = verb (क्रियापद) o = object (कर्म) c = complement (पूरक वाक्य) . =  Full Stop पूर्ण विराम

विधानार्थी वाक्यात माहिती दिली जाते, विधान केले जाते, एखाद्या गोष्टीचे कथन केले जाते.


ii)प्रश्नात्मक (Introgative)

एखादी गोष्ट माहिती करून घेण्यासाठी विचारला जातो तो प्रश्न. 

प्रश्नांची दोन प्रकार पडतात verbal questions आणि wh questions.

ज्या प्रश्नांची उत्तरे हे हो किंवा नाही असे असते अशा प्रश्नांना verbal questions असे म्हणतात त्यांची सुरावात सहाय्यकारी क्रियापदाने होते.

For example.

Do you live here?

Is that your school? Etc.

ह्या प्रश्नांचे सूत्र तयार करायला गेलो तर त्यांचे सूत्र

Hv(helping verb)+ s + v + o + c + ?


What, where, when, why, which, who, whom, how ह्या शब्दांनी सुरू होणाऱ्या प्रश्नांना wh questions असे म्हणतात ह्याचे उत्तर सविस्तर मिळते.

Where do you live?

What is your name?

How did you know that?

When are you coming back from Mumbai?

Why didn't you study yesterday?

Which is your pen?

Who is your favourite hero?

Wh(word) + hv + s + v + o + c + ?


iii)विस्मयबोधी (Exclamatory)

मनातील उत्कट भावना दर्शविणाऱ्या वाक्यांना विस्मायाबोधी वाक्य असे म्हणतात.

How wanderful!

What a beautiful flower it is!

उद्गारवाचक वाक्य how किंवा what ने सुरू होतात किंवा काही उद्गरार्थी शब्द वापरून त्यासमोर उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. व अधिक माहितीसाठी विधनात्मक वाक्य वापरले जाते.

For example!

1)Oh! It was very bad.

2) Wah! You got it.


iv)आज्ञार्थी (Imperative) 

अज्ञा(order) देण्यासाठी, सूचना(suggestion) देण्यासाठी, विनंती(request) करण्यासाठी व इच्छा (wish) व्यक्त करण्यासाठी जी वाक्यरचना वापरली जाते त्या वाक्यरचनेच्या वाक्याला अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. 

आज्ञार्थि वाक्याची सुरवात क्रियापदाने होते.

Come in.

Bring me a glass of water pleas.(request)

Call Abhishek and tell him to bring laptop to with him.(order)

Look at me. (Suggestion)

Read carefully. (suggestion)

Wish you all the best.(wish)

आज्ञार्थी वाक्याचे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल..

V + o + c +.


विद्यार्थ्यांसाठी सूचना

वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत ते वाक्य तुमच्या वहीत लिहून त्यासमोर वाक्याचा प्रकार लिहा त्याचा फोटो काढून मला माझ्या ९७६५४८६७३५ या whatsapp नंबरवर पाठवा .

किंवा

कॉमेंट करून सांगा..


संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला.


वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट दया

https://youtube.com/c/pradipjadhao या YouTube चॅनल ला.


धन्यवाद!

Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.