VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 - इयत्ता 6 वी ते 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी VIKSIT BHARAT अंतर्गत BUILDATHON 2025 Registration Link

विकसित भारत बिल्डॅथॉन २०२५

मेगा इव्हेंट

13 ऑक्टोबर,

सकाळी १० ते दुपारी १२


शाळांसाठी चेकलिस्ट

डिजिटल पायाभूत सुविधा

i लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी स्थिर इंटरनेट आणि एव्हीची खात्री करा


भौतिक पायाभूत सुविधा

i. VBB ब्रँडिंगसह परिसर स्वच्छ करा; लाईव्ह स्ट्रीममध्ये पोस्टर दृश्यमान

ii. उपक्रम आयोजित करण्यासाठी मध्यवर्ती वर्ग/हॉल


प्रकल्प गुणवत्ता

i. विशेषतः स्पॉटलाइट शाळांसाठी चांगल्या दर्जाच्या प्रकल्पांना पाठिंबा द्या; आवश्यक साहित्य आणि उपकरणे व्यवस्थित करा.


सहभाग

मी. सकाळी १०:०० वाजता शेअर केलेल्या वेबिनार लिंकमध्ये सामील व्हा.

ii. विद्यार्थ्यांनी आयडिया किंवा प्रोटोटाइप या दोन्ही ट्रॅकपैकी कोणत्याही एका ट्रॅकवर काम करावे.

iii. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक आणि आरोग्यसेवा तज्ञांना आमंत्रित केले जाईल.


सोशल मीडिया पोस्टिंग

i. प्रकल्पाचे व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा

सबमिशन

i. portal-vbb.mic.gov.in वर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कल्पना किंवा नमुना सादर करणे.



शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राज्यातील शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गात विकसित भारत अंतर्गत BUILDATHON 2025 अभियान राबविणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे


संदर्भ: १. केंद्र शासनाच्या दिनांक ३०.०९.२०२५ रोजीच्या व्ही.सी. मधील सूचना. २. संचालनालयाचे पत्र क्रमांक ४८२५ दिनांक ०१/१०/२०२५.

३. मा.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे

पत्र जा.क्र.मप्राशिप/सशि/एटीएल/२०२५-२६/२९९६ दि.०६/१०/२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये केंद्रशासनामार्फत शिक्षण मंत्रालय व अटल इनोव्हेशन मिशन यांचा संयुक्त उपक्रम विकसित भारत या अभियान राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांने विकसित भारत अंतर्गत BUILDATHON 2025 साठी नवे विचार मांडणेविषयी तसेच VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५आहे. याची विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. असे सूचित करण्यात आलेले होते.

तथापि, संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रासोचतच्या केंद्रशासनाच्या सहपत्रान्वये VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढीसह अंतिम दिनांक १९ ऑक्टोबर, २०२५ पर्वत देण्यात आलेली आहे.

१. VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अंतर्गत Atmanirbhar Bharat, Swadeshi, Vocal for Local, and Samriddh Bharat या चार संकल्पनांवर आधारित आहे.

२. अभियानामध्ये ५ ते ७ विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. सदरील विद्यार्थी इयत्ता ६ वी ते १२ बोच्या वर्गातील असावेत.

३. सदरील स्पर्धा २ प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.

४. 1. Idea Submission: कल्पना (२ मिनिटांचे लघु व्हिडिओ)

4.2.Prototype Submission: प्रोटोटाईप/मॉडेल (व्हिडिओ स्वरूपात)

व्हीडीओमध्ये विद्याच्यांनी जगातील वास्तव आव्हानांवर मात करण्यासाठी विविध संकल्पना सुचवाव्यात.

६. व्हीडीओमध्ये विद्याथ्यांनी फिजिकल व डिजीटल बाबत काम करण्यासाठी आपल्या संकल्पना सुचवाव्यात.

७. सदरील अभियानामध्ये शिक्षकांनी आपल्या शाळेतील अभियानामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नोंदणी व प्रकल्प अपलोड मदत, विद्यार्थ्यांना थीम समजावणे.

८. सदरील अभियानामध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अभियानामध्ये प्रोत्साहन देणे, नोंदणी/प्रकल्प सादरीकरण मार्गदर्शन करणे, स्पर्धा व उपक्रम आयोजित करणे.

९. VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढीसह अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर, २०२५ देण्यात आलेली आहे. याची विद्याथी, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.

१०. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आपल्या जिल्हयातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना सदरील अभियान १०० टक्के शाळांनी नोंदणी सहभाग करणेसाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना सूचना देणे, सहभागाचे निरीक्षण करणे, प्रचार उपक्रम राबविणे.

११. सदरील अभियानामध्ये जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर, राष्ट्रीयस्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

१२. अभियानामध्ये पुढीलप्रमाणे टप्पे देण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी.

▶ २३ सप्टेंबर, २०२५ ते ०६ ऑक्टोबर, २०२५ नोंदणी

१३ ऑक्टोबर, २०२५, Live Innovation Event

▶ १३ ऑक्टोबर, २०२५३१ ऑक्टोबर, २०२५ प्रकल्प नोंदणी व सादरीकरण.

> नोव्हेंबर-डिसेंबर मूल्यमापन

➤ जानेवारी २०२६ निकाल व विजेत्यांचा सत्कार

१३. मूल्यमापन निकष-

* कल्पनेची नवीनता व मौलिकता

* विस्तारक्षमता व उपयुक्तता

*शाश्वतता व सामाजिक परिणाम

* प्रत्यक्षात अंमलबजावणीची शक्यत्ता

Atmanirbhar Bharat, Swadeshi, Vocal for Local, and Samriddh Bharat या चार संकल्पनांशी सुसंगतला.

राष्ट्रीय स्तरावर १० विजेते तसेच राज्यस्तरावर १०० विजेते घोषित केले जाणार आहेत.

तसेच जिल्हा, तालुका आणि शालेय पातळीवर या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, पुढील पाऊल म्हणजे यासंदर्भात राष्ट्रीय पातळीवर सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुका नोडल ऑफिसर्स आणि या कार्यक्रमाचे अंमलबजावणी करणारे सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक/शिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. सदर मार्गदर्शन सत्र यापूर्वी कळविल्याप्रमाणे दि.०७/१०/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आलेले होते. परंतु हे मार्गदर्शन सत्र आता दि.०८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता पुढे ढकलण्यात आले आहे. या मार्गदर्शन सत्राची लिंक खालीलप्रमाणे आहे.

दिनांक व वेळ ०८/१०/२०२५-४,००

मार्गदर्शन लिंक- https://youtube.com/live/WziJRbHUE?feature=share तरी आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थी यांची शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये मुदतवाढीसह अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन घेण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे. तरी विद्याथ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी व सक्रिय सहभाग नोंदवावा.

नोंदणी लिंक- https://schoolinnovationmarathon.org/ip/index.html


(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


 प्रति, 

1) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

2) शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व 

3) शिक्षण निरीक्षक बृन्हमुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

4 ) प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व 

5 ) उपशिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सर्व

6) मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये. 

 विषय :- राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी VIKSIT BHARAT अंतर्गत BUILDATHON 2025 अभियान राबविणेबाबत...

उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय व अटल इनोव्हेशन मिशन यांचा संयुक्त उपक्रम विकसित भारत या अभियान राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी च्या प्रत्येक विद्यार्थ्याने विकसित भारत अंतर्गत BUILDATHON 2025 साठी नवे विचार मांडणेविषयी सूचित करण्यात आलेले आहे.

यानुसार,

1) VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अंतर्गत आत्मनिर्भर भारत, स्वदेशी Vocal for Local, आणि  समृध्द भारत या चार संकल्पना वर आधारित आहे. 

2) यामध्येत 5 ते 7 विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग नोंदवणे आवश्यक आहे सदरील विद्यार्थी हे *इयत्ता 6 वी ते 12 वीच्या* वर्गातील असावेत.

3)  सदरील स्पर्धा दोन प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे

1. Idea Submission: कल्पना (२ मिनिटांचे लघु व्हिडिओ)

2.Prototype Submission: प्रोटोटाईप/मॉडेल (व्हिडिओ स्वरूपात)

4) व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांनी जगातील वास्तव आव्हानांवर मात करण्यासाठी विविध संकल्पना सुचवाव्यात.

5) व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांनी फिजिकल व डिजिटल बाबत काम करण्यासाठी आपल्या संकल्पना सुचवाव्यात. 

6) सदरील अभियानामध्ये शिक्षकांनी आपल्या शाळेतील अभियानामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नोंदणी व प्रकल्प अपलोड मदत, विद्यार्थ्यांना थीम समजावणे.

7) सदरील अभियानामध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अभियानामध्ये प्रोत्साहन देणे, नोंदणी/प्रकल्प सादरीकरण मार्गदर्शन करणे, स्पर्धा व उपक्रम आयोजित करणे.

8) VIKSIT BHARAT BUILDATHON 2025 अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी अंतिम दिनांक 6 ऑक्टोबर 2025 आहे. याची विधार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी. 

9) जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख यांना सदरील अभियान 100 टक्के शाळांनी नोंदणी सहभाग करणेसाठी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आपल्या अंतर्गत येणार्याा सर्व शाळांना सूचना देणे, सहभागाचे निरीक्षण करणे, प्रचार उपक्रम राबवणे.

10) सदरील अभियानामध्ये जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर, राष्ट्रीयस्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. 

11) या अभियानामध्ये पुढीलप्रमाणे टप्पे देण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी 

२३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर: नोंदणी

१३ ऑक्टोबर: Live Innovation Event

१३ ऑक्टोबर – ३१ ऑक्टोबर: प्रकल्प नोंदणी व सादरीकरण

नोव्हेंबर–डिसेंबर: मूल्यमापन

जानेवारी २०२६: निकाल व विजेत्यांचा सत्कार

12) मूल्यमापन निकष-

कल्पनेची नवीनता व मौलिकता

विस्तारक्षमता व उपयुक्तता

शाश्वतता व सामाजिक परिणाम

प्रत्यक्षात अंमलबजावणीची शक्यता

Atmanirbhar Bharat, Swadeshi, Vocal for Local, and Samriddh Bharat या ४ थीम्सशी सुसंगतता.

राष्ट्रीय स्तरावर १० विजेते 

राज्यस्तरावर १०० विजेते 

घोषित केले जाणार आहेत.....

 तरी आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता सहावी ते बारावीच्या जास्तीत जास्त शाळांची नोंदणी करून घ्यावी व सक्रिय सहभाग नोंदवावा. 

नोंदणी लिंक 🔗

https://schoolinnovationmarathon.org/lp/index.html 

२. जिल्हा आणि शाळा पातळीवर या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, पुढील पाऊल म्हणजे जिल्हा शिक्षणअधिकारी (डीईओ), गटशिक्षणअधिकारी (बीईओ) आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अंमलबजावणी करणारे सर्व सहभागी शाळांसाठी ओरिएंटेशन सत्रांना उपस्थित राहणे. ही सत्रे भूमिका, प्रक्रिया आणि सुरळीत आणि प्रभावी अंमलबजावणीला समर्थन देण्यासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनांवर स्पष्टता प्रदान करतील.

३. या संदर्भात, सर्व शाळा/शिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी, जिल्हा आणि ब्लॉक नोडल अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय ओरिएंटेशन सत्र

खालीलप्रमाणे नियोजित करण्यात आले आहे:

दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजलेपासून

· सत्राची लिंक: 

https://youtube.com/live/_WziuJRbHUE?feature=share

४. या सत्रात उपस्थित राहिल्यानंतर, शिक्षणाधिकारी /गटशिक्षणाधिकारी, जिल्हा आणि ब्लॉक नोडल अधिकारी/शाळा पुढील गोष्टी करतील अशी अपेक्षा आहे:

● शाळा/जिल्हा स्तरावर विकसित भारत बिल्डथॉनसाठी संपर्काचा मुख्य बिंदू आणि सूत्रधार म्हणून काम करतील.

५.  आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी, जिल्हा आणि ब्लॉक नोडल अधिकारी/शाळा युट्युब वरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहावी आणि त्यांना पुढील उपक्रम सक्रियपणे राबविण्याबाबत सूचित करण्यात येत आहे.


(महेश पालकर)

शिक्षण संचालक

माध्यमिक व उच्च माध्यमिक

शिक्षण संचालनालय

महाराष्ट्र राज्य पुणे


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.