महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज
प्रकटन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इ. १० वी व इ. १२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रमिष्ट करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी/ शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा
१ फेब्रु मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (४. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इः १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व नियमित शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.
शुकवार दि. ०१/०८/२०२५ ते
रविवार दि. ३१/०८/२०२५.
२ खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेभभरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाबाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार नाही, यायी
नोंद घ्यावी ३ खाजगी विद्यार्थ्यांनी इ. १०वी/इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा/
कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा दयावयाची आहे, त्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयान जाऊन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतिक कमांक, विषय योजना, माध्यम, शाखा (Stream) व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी.
नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Student Corner या option चा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
५ विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रन व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतः जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
६ कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (pdf) काढून ने upload करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
७ विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत.
खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे
इ.१०वी :- रु.१११०/- नाव नोंदणी शुल्क रु.१००/-
प्रक्रिया शुल्क (Processing Fee)
रु. १००/- विलंब शुल्क प्रति विद्यार्थी
३१२वी :- रु.१११०/- नाव नोंदणी शुल्क रु.१००/- प्रकिया शुल्क (Processing Fee)
रु. १००/- विलंब शुल्क प्रति विद्यार्थी
९ इ. १०वी/इ. १२वी फेब्रु मार्च २०२६ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील, ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोहोचपावती विद्यार्थी / संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या Login मध्ये प्राप्त होईल.
१० अ) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील (Current Address) जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार, त्यास माध्यमिक शाळांची यादी दिसेल, त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्याथ्यर्थान करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षेचे आवेदनपत्र, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
ब) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील (Current Address) जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यम व शाखेनुसार (Stream), त्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल, त्यामधील एका उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्याध्यनि करावयाची आहे. या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षेचे आवेदनपत्र, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
११ दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्र / UDID Card ची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/माध्यमिक शाळा/कानिष्ठ महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.
१२ महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. ५वी किंवा इ. ८वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. १० वी साठी (१७ नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल.
१३ ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत Website वर दिलेल्या Helpline वर संपर्क साधावा.
१४ पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Earollment Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Form) मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.
दिनांक ३०/०७/२०२५
(देविदास कुलाळ) सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क. १७) होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सद्यस्थितीत फक्त फेब्रु. मार्च च्या परीक्षांसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तथापि अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष बाया जाते. शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून यावर्षी प्रथमच जुलै-ऑगस्ट २०२५ च्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणीसाठी संधी देण्यात येत आहे.
तेव्हा जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्जाबाबतची कार्यवाही दिनांक १५/०४/२०२५ पासून सुरु करण्यात येत असून सदरील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरुन भरावयाचे आहेत.
जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा
मंगळवार दि.१५/०४/२०२५ ते
गुरूवार दि. १५/०५/२०२५
खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी फेब्रु. मार्च २०२५ च्या परीक्षेचेवेळी ज्या अटी व शर्ती निर्धारित केलेल्या होत्या त्याच अटी व शर्ती जुलै-ऑगस्ट २०२५ च्या परीक्षेसाठी कायम राहतील.
सदर अर्ज फक्त नियमित शुल्काने घ्यावयाचे असून याकरिता मिलंग/शतिविलंब शुल्काची मुदत असणार नाही. व कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबत विभागीय मंडळ स्तरावरून सर्व संबंधितांना फळवावे.
विद्याथ्यांनी त्यांचे अर्ज व मूळ कागदपत्रे शाळा/कनिष्ठ महाविधालयांमध्ये जमा करावयाची आहेत, याबाबतची कार्यपध्दती खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे विभागीय मंडल स्तरावर खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज Maker / Checker पध्दतीने तपासावयाचे आहेत. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रापा झालेले अर्ज नेमून दिलेल्या जिल्हा / तालुका नुसार संबंधित कर्मचाच्याला (Desk1 user) यांचे Login मध्ये उपलब्ध होतील.
२ संबंधित कर्मचाऱ्यांनी online पध्दतीने प्राप्त अर्ज तसेच कागदपत्रांची पडताळणी करुन स्वतःच्या अभिप्रायासह पात्र/अपात्र/अपूर्ण (Eligible / Non-eligible /Incomplete) असा शेरा ऑनलाईन पध्दतीने देऊन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावयाचे आहेत.
३ वरील प्रमाणे कार्यवाही केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याच्या Login मध्ये कार्यवाही पूर्ण केलेल्या अर्जाची एकत्रित प्राप्त यादीतील (pdf) काढण्याची सुविधा दिलेली आहे. शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांनी त्यांच्या Login मधून प्राप्त यादीतील (pdf) सर्व नावनोंदणी अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करुन सदर यादीवर आपले अभिप्राय नोंदवावे व पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावे, त्यानंतर वरिष्ठ अधिकाच्यांनी त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या सर्व अर्जाबाबत अंतिम निर्णय पात्र/अपात्र (Eligible/Non-eligible) असा शेरा ऑनलाईन पध्दतीने देऊन अर्ज निकाली काढावयाचा आहे.
४ सदरची कार्यवाही दि.२५/०५/२०२५ पर्यंत सर्व विभागीय मंडळांनी पूर्ण करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना या पत्रासोबत जोडण्यात आलेल्या असून सदरील सूचना आपल्या स्तरावरुन संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास सादर करण्यात यावा.
(देविदास कुलाळ)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे कार्यालयातून निर्गमित दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी च्या प्रतिपत्रानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क. १७ अन्वये) होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेबाबत मंडळाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
मंडळामार्फत फेब्रु मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस खाजगीरित्या (अर्ज क. १७) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेबाबतचे प्रकटन या पत्रासोबत जोडलेले आहे. सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
आपली विश्वासू
(अनुराधा ओक)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे- ०४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज
प्रकटन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (५. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इ. १० वी व इ. १२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपात्रब्ध आहेत यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
१ फेब्रु-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
तपशील
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन
अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकाराण्याच्या तारखा
मंगळवार दि. २३/०८/२०१४
केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर सोमवार दि. ३०/०९/२०१८ नमूद केलेल्या शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे. विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी
मंगळवार दि. ०१/१०/२०२४
ते बुधवार दि. ३०/१०/२०२४
शुल्क जमा केल्याचाबत पोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.
२ खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज अऑनलाईन (online) पध्दतीनेय भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन (offline) अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद प्यावी
३ खाजगी विद्यार्थ्यांनी इ. १० वी १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा दयावयाची आहे, त्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक, विषय योजना, माध्यम, शाखा (Stream) व इतर आवश्यक माहिती घेऊनच नींदणी करावी.
४ नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Stalent Corner या option चा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या बानून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
५ विद्याध्यनि अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःया पासपोर्ट आकारातील फोटो स्वतः जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुष्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
६ कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॉनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (pdf) काढून ते upload करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्यावाचत पोचपावतीची प्रिंटआऊट मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत.
८ खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे
३ १०वी रु१०००/- नाव नोंदणी शुल्क रु.१००/- प्रकिया शुल्क (Processing Fee)
रु. १००/- विलंब शुल्क प्रति विद्यार्थी
रु.६००/- नाव नोंदणी शुल्क रु.१००/- प्रक्रिया शुल्क, Processing Fee)
रु. २५/- विलंब शुल्क प्रति विद्यार्थी
३.१२वी
९ इ.१०वी/१२वी फेब्रु मार्च २०२५ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील, ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोचपावती विद्यार्थ्यांला/संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या Login मध्ये प्राप्त होईल. १० अ) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनीदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील (Curent Address) जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार, त्यास माध्यमिक शाळांची यादी दिसेल, त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्याध्यनि करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुबंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
ब) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील (Current Address) जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यम व शाखेनुसार (Sucam), त्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल, त्यामधील एका उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्याथ्यनि करावयाची आहे. या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/तांडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.
११ दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट कावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्नालयाच्या प्रमाणपत्र/ UDID Card ची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.
१२ महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. ५वी किंवा इ. ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. १० वी साठी (१७ नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल,
१३ ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत Website वर दिलेल्या Helpline वर संपर्क साधावा
१४ पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र (Eligible) विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Form) मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.
दिनांक १२/०८/२०२४
(अनुराधा ओक) सचिव,
राज्य मंडळ, पुणे ०४
दिनांक 24 मे 2024 रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे जुलै ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी पुरवणी आवेदन पत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश व वेळापत्रक दिले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु मार्च २०२४ परीक्षेचा निकाल दिनांक २१/०५/२०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, III विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १२वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
1 Comments
dattatrymanep@gmail.com
ReplyDelete