बालिका दिवस - सावित्रीबाई फुले यांची जयंती

 बालिका दिवस - सावित्रीबाई फुले यांची जयंती..


महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांना कृतीत मूर्त रूप देणाऱ्या, प्रसंगी समाजाचा विरोध पत्करून लोकांच्या फक्त शिव्या शापच नव्हे तर दगड, गोटे, शेणाचा मार सोसून देखील मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या पाहिल्या महिला शिक्षिका, पाहिल्या मुख्याध्यापिका, तमाम भारतीय समाजाच्या अर्ध्या समाजाची शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, दृढ निश्चयी, तमाम भारतीय सुशिक्षित महिलांचा प्रेरणास्रोत यांची आज जयंती..

फक्त महिलाच नव्हे तर संपुर्ण मानवी समाजाने ज्यांचेसमोर नतमस्तक व्हावे कारण माझी आई, बहीण, मला लाभलेल्या शिक्षिका शिक्षित झाल्या त्या या एका महिलेमुळे कारण जर तेंव्हा त्यांनी हे क्रांतिकारी पाऊल उचलले नसते तर कदाचित आजही अर्धा भारतीय समाज रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यामुळे अशिक्षित व अडाणी राहून अंधारात खितपत पडला असता. अर्थातच याचा परिणाम संपुर्ण मानवी समाजावर झाला नसता तर नवलच.

आज आपण म्हणतो की महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. याचे मुळ कारण जर आपण शोधायचे ठरवले तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे नाव त्या कारणांच्या यादीमध्ये सर्वप्रथम जोडावच लागेल.

स्वतः अशिक्षित असून सम्पूर्ण स्त्रियांना शिक्षित करण्याचे व्रत हाती घेणाऱ्या आणि त्यासाठी स्वतः सर्वप्रथम शिक्षित झालेल्या असल्यामुळे त्यांना सर्वप्रथम विद्यार्थीनी, शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा मानही त्यांचाच. आणि जेव्हढा मान मोठा तेवढ्या त्यांना झालेल्या यातनाही तेवढ्याच जास्त. 

म्हणूनच महिला शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले...

अशा या महान शैक्षणिक क्रांतिकारी विचाराच्या पाईक सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आमच्या शाळेत देखील साजरी करण्यात आली. त्याचे क्षणचित्रे..


https://youtube.com/c/pradipjadhao

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.