बदलती मानसिकता शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी..

बदलती मानसिकता शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी 

(भाग एक)

आजकाल सर्रास बोलले जाणारे वाक्य "लोकांची मानसिकताच बदलली आहे...", "त्यांची मानसिकताच राहिली नाही..." मानसिकतेला इंग्रजीत Mindset असं आपण म्हणतो. आता ही मानसिकता हा Mindset जर खरोखर बदलला असेल तर मग शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांची देखील मानसिकता Mindset बदलला असावा...

आणि जर बदलला असेल तर मग याचा शिक्षण या प्रक्रियेवर देखील परीणम झाला असेलच की..!!


मग चला तर पाहूया बदलती मानसिकता शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक..

सर्वप्रथम आपण विचार करुया तो पालकाच्या मानसिकतेचा कारण मूल/विद्यार्थी स्वतः ठरवत नाही की त्याला कोणत्या शाळेत कोणत्या शिक्षकाकडे शिकायला जायचं ते?

आता पालकाची मानसिकता शाळा निवडतांना कशी बदलली आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी शाळा निवडतांना कोणत्या गोष्टीकडे ते पाहतात..

शाळेची फी किती आहे जेवढी जास्त फी शाळा तितकी चांगली..

शाळेचे माध्यम इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे कल जास्त..

शाळा कोणत्या मंडळाशी संलग्न आहे.. (state board/cbsc/icse etc.)

शाळेची इमारत कशी आहे? परिसर कसा आहे?

शाळेचा ड्रेस, येण्याजाण्याची व्यवस्था, सहशालेय उपक्रम...

सर्वात महत्त्वाचं कोणत्या शाळेत टाकले असता माझा मुलगा या शाळेत शिकतो हे सांगताना स्टेटस् म्हणून सांगता येईल..


पालकांसाठी दुय्यम ठरणारे काही मुद्दे..

शाळेत शिकवणारे शिक्षक कसे आहे?

शिकवणारे शिक्षक किती चांगले प्रशिक्षीत आहे?

विद्यार्थी मानसशास्त्र शिक्षकांना किती माहीत आहे?

शाळेत आनंददायी शिक्षण पद्धती रचानावादी आहे का?

प्रत्येक मूल हे एकमेव अद्वितीय असते आणि त्याची शिकण्याची पद्धत आणि गती वेगवेगळी असते हे जाणून मुलांना शिकण्याची संधी शाळा उपलब्ध करून देते का?

आणि शाळा निवडली जाते....

विद्यार्थ्याचा शाळेत प्रवेश होतो नसेल होत तर शुल्का व्यतिरिक्त डोनेशन देऊन देखील प्रवेश घेतला जातो....

मग पालकांसाठी शाळा ही एक एखादं प्रॉडक्ट तयार करणारी फॅक्टरी होऊन जाते..

शाळेकडून आणि विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. मुलांना शाळेत किती समजते, यापेक्षा पाठांतर त्यांचे हस्ताक्षर यावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं जातं. मुलं त्यालाच शिक्षण समजत आणि काही मुलं त्यात निपुण देखील होतात पण पुढे जाऊन त्याला कळते की संकल्पना समजुन घेणे, मिळवलेल्या ज्ञानाच उपयोजन करणे, नवनिर्मिती, संशोधन ई.देखील तेवढंच महत्त्वाचं होत, मग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुन्हा त्याला वेगळा अभ्यास करावा लागतो, वेगळे व्यावसायिक कोचिंग क्लास लावाववे लागतात..

समाजाची अजुनही न बदललेली मानसिकता "कुठं शिकून कलेक्टर होणार आहे?" शिकून फक्त नोकरी मिळते. नोकरी मिळवण्यासाठीच शिकायचं असतं.

मग सर्व खटाटोप सुरू होतो ज्या शिक्षण संस्थेतील अधिकात अधिक विद्यार्थी नोकरीला लागले अशाच शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश मग ती एन केन प्रकारेण कोणत्याही प्रकारे त्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा, चढाओढ.. ती शिक्षण संस्था जर खाजगी मालकीची असेल तर भरमसाठ फी आकारून नफेखोरी.. जर सरकारी मालकीची असेल तर लग्गेबाजी.. गैरप्रकारांनी गुण वाढवणे.. असले अनेक प्रकार..

ही मानसिकता एका दिवसात तयार झाली नसून ती हळूहळू टप्प्या टप्प्याने तयार झाली आहे. 

अर्थात शिक्षण म्हणजे कारकून तयार करण्याचा कारखाना नसून एक सृजनशील कर्तव्यदक्ष नागरिक घडवण्यासाठी तयार केलेली एक प्रक्रिया आहे हे समाजाच्या गळी उतरवन्यासाठी काही काळ जावा लागेल.https://youtube.com/c/pradipjadhao

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.