चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत - काळ व काळाचे प्रकार ( types of tenses) वाक्याचे प्रकार (Types of Sentences)

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत - काळ व काळाचे प्रकार ( types of tenses)

इंग्रजी भाषेची वाक्यरचना समजुन घेण्यासाठी आतापर्यंत आपण part of speech समजुन घेतले, part of sentences पण समजुन घेतले, मराठी आणि इंग्रजी भाषेतील वाक्य रचनेतील फरक देखील समजुन घेतला.


इंग्रजी भाषेची वाक्यरचना शिकण्यासाठी आपल्या काळ tense देखील समजुन घेणे गरजेचे आहेत..

मराठी प्रमाणेच इंग्रजी भाषेत देखील एकूण तीन काळ आहेत व त्या प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत. ते पुढीप्रमाणे...


मुख्य काळ

1) Present Tense (वर्तमान काळ)

2) Past Tense (भूतकाळ)

3) Future Tense (भविष्य काळ)


वरील प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत ते पुढीप्रमाणे.

 Present Tense (वर्तमान काळ)

i) Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

ii) Continues/Progressive Present Tense (अपूर्ण/चालू वर्तमान काळ)

iii) Perfect Present Tense (पूर्ण वर्तमान काळ)

iv) Perfect Continues Present Tense (पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ)


Past Tense (भूतकाळ)

i) Simple Past Tense (साधा भूतकाळ)

ii) Continues/Progressive Past Tense (चालू/अपूर्ण भूतकाळ)

iii) Perfect Past Tense (पूर्ण भूतकाळ)

iv) Perfect Continues Past Tense (पूर्ण अपूर्ण भूतकाळ)


Future Tense (भविष्यकाळ)

i) Simple Future Tense (साधा भविष्यकाळ)

ii) Continues/Progressive Future Tense (अपूर्ण/चालू भविष्यकाळ)

iii) Perfect Future Tense (पूर्ण भविष्यकाळ)

iv) Perfect Continues Future Tense (पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ)


वरील प्रत्येक काळात आपल्याला इंग्रजी भाषेत वाक्यरचना करता आली तर आपण सहज इंग्रजी भाषा बोलू, वाचू, लिहू, आणि समजू शकतो.


वाक्यांचे प्रकार (Types of Sentences)

i)विधानात्मक वाक्य (Statemen/Declarative)

ii)प्रश्नात्मक (Introgative)

iii)विस्मयबोधी (Exclamatory)

iv)आज्ञार्थी (Imperative)

या सर्व प्रकारची वाक्ये वरील सर्व काळामध्ये जेव्हा आपल्याला बोलता, लिहिता, वाचता व समजता आली म्हणजे आपण इंग्रजी भाषा शिकू शकतो.


वरील सर्व काळ व वाक्यांचे प्रकार आपण टप्प्या टप्प्याने अतीशय सोप्या भाषेत आणि मराठी माध्यमातून शिकणार आहोत..


त्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com 

किंवा Google search करा pradipjadhao.com


धन्यवाद!


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.