पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोबाईल वरुन शाळा कशी Register करावी? संपुर्ण माहिती

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोबाईल वरुन शाळा कशी Register करावी? संपुर्ण माहिती 

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहूया या सत्रासाठी पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेचे मोबाईल वरुन कसे registration करावं..

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील google application open करून त्यामध्ये msce pune सर्च करा व त्यामधे आलेल्या पाहिल्या suggestion वर क्लिक करा 👇


त्यानतंर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल 👇


त्या विंडो मधील लाल अक्षरात डाव्या बाजूला असलेल्या ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ वर क्लिक करा त्यानंतर खालील विंडो ओपन होईल 👇


वरील विंडो मधील शाळा नोंदणी/School Registration वर क्लिक करा त्यानंतर खालील विंडो ओपन होईल 👇 

वरील विंडो मध्ये SCHOOL UDISE CODE अचूक नोंदवा त्यानंतर SCHOOL NAME आपोआप येइल ते शाळेचे नाव बरोबर असल्यास त्याखालील Is this your school name खालील ड्रॉप डाऊन लिस्ट मधून "yes" हे opstion निवडा.

त्यानंतर खालील विंडो ओपन होईल 👇



वरील विंडो मध्ये तुमच्या शाळेचा Udise code व नाव आगोदरच आलेले असेल..

त्यानंतर शाळेचा व्यवस्थापन प्रकार निवडा...

शाळेचे क्षेत्र ग्रामीण अथवा शहरी निवडा...

शाळेचा वापरात असलेला ईमेल आयडी नोंदवा..

नंतर तोच ईमेल आयडी परत नोंदवा...

शाळेत इंटरनेट व्यवस्था आहे की नाही पर्याय निवडा..

शाळेचा पत्ता सर्वे क्र./वॉर्ड क्रमांक इतर नोंदवा..

गावाचे नाव नोंदवा..

तालुक्याचे नाव नोंदवा..

पिनकोड नोंदवा..

असल्यास landline number STD code सह नोंदवा/ नसल्यास मोबाईल नंबर अगोदर 0 लाऊन तो नोंदवा.

त्यानंतर मुख्याध्यापकाचे आडनाव 

नाव..

वडिलांचे नाव.. नोंदवा

मोबाईल नंबर अचूक नोंदवा..

तोच मोबाईल नंबर पुन्हा नोंदवा..

मुख्याध्यापकाचा वैयक्तिक ईमेल आयडी नोंदवा..

वरील सर्व माहिती अचूक असल्याची परत एकदा खात्री करा आणि शेवटी आसलेल्या Submit या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा..

आलेल्या डायलॉग बॉक्स मधील ok वर क्लिक करा...

आता तुमच्या मोबाईल नंबर वर व ईमेल आयडी वर तुम्हाला युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल.

तो वापरून लॉगइन करून विद्यार्थ्यांचे अर्ज कसे करावे यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com या website ला..

यानंतरच्या पोस्ट मध्ये विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज मोबाईल वरुन कसा करायचा हे पाहूया..

हे सर्व करत असताना जर काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क jadhaopg@gmail.com या ईमेल वर अथवा ९७६५४८६७३५ क्रमांकावर संपर्क साधावा आपणास नक्कीच मदत केली जाईल..



धन्यवाद!!




Post a Comment

2 Comments

  1. खूप छान पद्धतीने आणि योग्य माहिती योग्य वेळी पुरवली . धन्यवाद सर

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.