भव्य पेन्शन परीषद - बुलडाणा

 भव्य पेन्शन परीषद - बुलडाणा

जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती द्वारा आयोजीत पेन्शन संघर्ष यात्रा २२ जिल्ह्यांचा दौरा करत बुलडाणा येथे पोहचली बुलडाणा जिल्ह्याचे/विदर्भाचे प्रवेशद्वार मलकापूर येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर यात्रा बुलडाणा येथे पोहचली बुलडाणा येथील बालाजी मंदिर तेथे संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले व तेथून मोटारसायकल व चारचाकी गाड्यांनी संघर्ष रॅलीला सुरवात झाली सर्व बुलडाणा शहर एकच मिशन! जुनी पेन्शन! या नाऱ्याने गजबजले, शहर पार करुन रॅली आराध्या लॉन बुलडाणा येथे पोहचली व भव्य दिव्य अशी पेन्शन परीषद सुरु झाली.


 बुलडाणा संघर्ष रॅलीची काही क्षणचित्रे



पेन्शन परिषदेला अध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती चे निमंत्रक व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर हे होते त्यांचे सोबत संघर्ष यात्रेत महाराष्ट्रभर फिरत असलेले संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील, राज्य सचिव गोविंद उगले, अमरावती विभाग अध्यक्ष मिलिंद सोळंके, शिक्षक संघटना समन्वयक मधुकर काठोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरावात झाली. सर्व पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली.

पेन्शन परिषदेला उपस्थित पेन्शन शिलेदार

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई शेळके यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून सभेल संबोधित केले. व पक्षाकडे कर्मचाऱ्यांची मागणी पोहचवण्याची ग्वाही दिली. तदनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सभेला उपस्थिती लावून सभेला संबोधित केले व जोपर्यंत २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना सर्व कर्माऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे संबोधन

बुलडाणा जिल्हा परिषद उपाध्यक्ष कमलताई बुधवत यांनी देखील पेन्शन परीषदेला उपस्थिती लावून सभेला संदेश दिला. यामधे प्राजक्त झावरे याचे भाषण सर्व कर्मचाऱ्यांना एक नवी प्रेरणा देउन गेले. गोविंद उगले, सुनील दुधे, मिलिंद सोळंके, मधुकर काठोळे यांची देखील सभेला मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करताना राज्याध्यक्ष वितेष खांडेकर यांनी त्यांच्या भाषणातून सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जुन्या पेन्शनसाठी पुन्हा पेटून उठून क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. व यानंतर होणाऱ्या पेन्शन संघर्ष आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

प्रत्येक भाषणानंतर हॉल

एकच मिशन! जुनी पेन्शन!

पेन्शन आमच्या हक्काची! नाही कुणाच्या बापाची!

या घोषणांनी दुमदुमत होता!


मुरली टेकाळे यांनी सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना पेन्शन लढ्याची शपथ दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे राज्य सहकोषध्यक्ष मुरली टेकाळे व मनजितसिंग राजपूत यांनी केले. व बुलडाणा जिल्हा अध्यक्ष नंदू सुसर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर पेन्शन परीषद यशस्वी करण्यासाठी बुलडाणा जिल्हा कार्यकारणी, सर्व तेराही तालुक्याचे तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


अशी ही न भूतो न भविष्य अशी भव्य पेन्शन परीषद बुलडाणा नगरीने अनुभवली.

शेवटी पेंशन यात्रेत सहभागी पेन्शन शिलेदारांना पुढील अकोला सभेसाठी निरोप देण्यात आला.




आपलाच एक

जुनी पेन्शन वंचित बांधव..

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.