काही बोलीभाषा व बोलीभाषिक विद्यार्थी

काही बोलीभाषा व बोलीभाषिक विद्यार्थी
          एका आकडेवारी नुसार भारतात एकूण ७५० बोलीभाषा बोलल्या जातात. भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला असता बोलीभाषा म्हणजे अशा भाषा ज्यांना लिपी नाही त्या फक्त बोलल्या जातात त्यामुळे या बोलीभाषा मध्ये लेखी साहित्य हे दुर्मिळ आहे. परंतु प्रत्येक बोलीभाषेत मोठ्या प्रमाणावर पारंपरिक साहित्य त्या बोली भाषिक व्यक्तींकडे आहे. हे साहित्य व बोलीभाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे पारंपरिक साहित्य लीपिबद्ध व ध्वनिमुद्रित करणे आवश्यक आहे. यामुळे दुहेरी फायदे होतील एकतर या बोली भाषांचे जातं व संवर्धन होण्यास मदत होईल व हे साहित्य या बोलीभाषा ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा आहे त्यांना लेखन वाचन शिकवण्यासाठी त्या त्या शाळेवर कार्यरत शिक्षकांना या साहित्याचा वापर करता येईल.
      महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातही अनेक बोलीभाषा बोलल्या जातात या बोलीभाषा पैकी १८ अशा बोलीभाषा आहेत की ज्या त्या त्या विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. व या बोली भाषिक विद्यार्थ्यांना शिकवताना मराठी भाषिक शिक्षकाला काही विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातही ज्या बोलीभाषा हिंदी/मराठीच्या बोली नाहीत उदा. कोरकु, कोलामी, माडिया, गोंडी ई. या बोली भाषिक विद्यार्थ्यांना जेव्हा ते शाळेत दाखल होतात तेव्हा मराठी भाषेशी त्यांचा काही एक संबंध नसतो त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिक अध्ययन व अध्यापन या दृष्टिकोनातून शिक्षकाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. या विद्यार्थ्यांच्या साठी मराठीतून शिकवणे म्हणजे मातृभाषेतून शिकवणे असे लागू होत नाही कारण त्यांची भाषा ही मराठीपेक्षा अगदी वेगळी आहे. कोलाम या आदिवासी बोली भाषिक विद्यार्थ्यासाठी काही प्रयोग करत आहोत हे प्रयत्न आपण https://youtu.be/EoFTyCgrcMk या लिंक वर पाहू शकता. 


क्रमशः...

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.