इंग्रजी भाषेचे महत्त्व (बहुभाषिक अध्ययन अध्यापन या संदर्भात)

इंग्रजी भाषेचे महत्त्व व बहुभाषिक अध्ययन अध्यापन

      भारतात इंग्रजी मातृभाषा असणारे लोक खूप कमी प्रमाणात आहेत. परंतु जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढत असलेले इंग्रजीचे महत्त्व पाहता आज इंग्रजी ही ज्ञानभाषा व संभाषण भाषा बनली आहे. व इंग्रजी भाषा शिकणे काळाची गरज झाली आहे. कारण ही जगातील बहुतांश अज्ञान हे मूळ इंग्रजीत लिहिलेल्या गेले आहे किंवा इंग्रजीत भाषांतर केल्या गेलेले आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा बनलेली असल्यामुळे इंग्रजी शिकणे ही काळाची गरज बनली आहे. 
      भारतीय परिस्थिती लक्षात घेता ९०% पेक्षा जास्त लोकांची इंग्रजी मातृभाषा नाही. परंतु इंग्रजी शिकण्यासाठी शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे असे मुळीच नाही. सर्वप्रथम विद्यार्थ्याने एक भाषा म्हणजे त्याची मातृभाषा ती कुठलीही असो ती योग्य रित्या आत्मसात करावी असे शिक्षण तज्ञांचे मत आहे व ते १००% संशोधन करून त्यांनी मांडले आहे.
      जर वरील मत योग्य असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मातृभाषा योग्य रित्या आत्मसात करण्यास सहाय्य करणे हे त्याच्या पालकाची व शिक्षकाची जबाबदारी आहे. आता विद्यार्थ्याची मातृभाषा हीच जर शिक्षणाचे माध्यम असेल तर इथे हा प्रश्नच येत नाही किंवा त्याला अशा परिस्थितीत त्याची मातृभाषा योग्य रित्या आत्मसात करता येते. परंतु त्या विद्यार्थ्यांचे काय ज्यांची मातृभाषा हे त्याच्या शिक्षणाचे माध्यम नाही....?
     अशा परिस्थितीत विद्यार्थी स्वतःची मातृभाषा किंवा कुठलीही एक भाषा योग्य रित्या आत्मसात करू शकत नाही. कदाचित आपण अशा बालकाचा अनुभव घेतला असेल जो सुरवातीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो व नीट इंग्रजीही बोलता येते नाही व मराठी नीट बोलता येत नाही. हे सगळे एक भाषा योग्य रित्या आत्मसात न केल्यामुळे होते. हे टाळायचे असेल तर त्याला त्याची मातृभाषा योग्य रित्या आत्मसात करू द्यावी वा त्याच्या मातृभाषेचे सहाय्य घेऊन मग इतर कोणतीही भाषा शिकवावी.
       आदिवासी बोलीभाषा व इतर काही बोलीभाषा बोलणारी विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेमके हेच घडते. जरी त्यांच्या घरी त्यांच्या बोलीभाषा बोलल्या जातात परंतु त्या फक्त ऐकण्या व बोलण्या च्या स्वरूपात असतात त्या बोलीभाषा भाषा म्हणून योग्य रित्या आत्मसात होण्यासाठी त्यांचे लेखन व वाचन हे शाळेत व्ह्यायला पाहिजे ते खूप कमी ठिकाणी किंवा होतच नाही असे आढळून येते. जे मातृभाषा माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. व ते नंतर इंग्रजीसह कोणतीही भाषा नंतर सहज रित्या आत्मसात करू शकतात. अर्थात येथेही इंग्रजी शिकवताना बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी विचार होणे गरजेचे आहे.
(बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी झी २४ तास वर आलेली बातमी https://youtu.be/jgvgq36NfNM)
        बोली भाषिक विद्यार्थ्यांना जर आपल्याला इंग्रजी व इतर कोणतीही भाषा शिकवायची असेल तर त्यांना त्यांची भाषा योग्य रित्या आत्मसात असावी व त्या बोलीभाषेचे लेखन वाचन घेण्यासाठी 'बहुभाषिक अध्ययन अध्यापन' याविषयी शिक्षकांनी जाणून व समजून घेणे गरजेचे आहे!
     
      क्रमशः....

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.