नव नियुक्त शिक्षक यांचेबाबत पवित्र पोर्टलच्या HM Login वरून शाळास्तरावर Post Creation आणि
Shalarth ID याबाबतच्या कार्यवाहीचे टप्पे
कार्यपद्धतीमध्ये बदल केल्यामुळे पवित्र पोर्टलच्या निवड प्रक्रियेतून नव्याने सेवेत रुजू होत असलेल्या शिक्षण सेवक यांना वेळेत वेतन सुरु होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शालार्थ आयडी (Shalarth ID) तयार होत आहे.
पवित्र पोर्टल व शालार्थ पोर्टल यांच्यातील API मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, त्यामुळे हि प्रक्रिया खाली नमूद केल्यानुसार :
१. डेटा नोंदवणे (Data Insert)
पवित्र प्रणाली 'Add New Employee Record कडे कर्मचाऱ्यांची माहिती पाठवते. सर्व पडताळण्या (validations) यशस्वी झाल्या तरच माहिती जतन (save) केली जाते.
२. रिक्त पदाची तपासणी (Vacant Post Check)
शालार्थ प्रणालीमध्ये DDO कडे रिक्त पद उपलब्ध आहे का हे तपासते, जर रिक्त पद उपलब्ध असेल, तर ते कर्मचाऱ्याचे सध्याचे पद (CURRENT_POST) म्हणून शालार्थ आयडी (Shalarth ID) वापरले जाते.
३. शालार्थ प्रणालीमध्ये रिक्त पद नसल्यास संचमान्यतेच्या माहितीवरून पद तयार करणे (Post Creation from Sanch Manyata Data):
पवित्र प्रणालीमधून CURRENT_POST मधील मूल्य Blank पाठवणे आवश्यक आहे. जर DDO कडे कोणतेही रिक्त पद आढळले नाही, तर प्रणाली DDO ची संचमान्यतेची माहिती तपासते, त्यानुसार एकूण मंजूर पदे व एकूण कार्यरत पदे विचारात घेऊन रिक्त पदे असल्यास मंजूर मर्यादेत (approved limit) मंजूर पद उपलब्ध असल्यास, पद (Post Creaction) आपोआप (automatically) प्रणालीद्वारे तयार केले जाते.
४. शालार्थ आयडी तयार होणे (Shalarth ID Generation)
पद (Post Creaction) उपलब्ध झाल्यावर कर्मचाऱ्याचा शालार्थ आयडी तयार होतो व त्याप्रमाणे DDO च्या शालार्थ Login मध्ये उपलब्ध होईल.
नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांसाठी शालार्थ आयडी तयार झाल्यानंतर संबंधित बिल ग्रुप मध्ये जोडून (Attach) करून वेतन पथक कार्यालयाकडे बिल सादर करणे.
५. शालार्थ आयडी तयार Error येत असल्यास करावयाची कार्यवाही
शालार्थ आयडी तयार करताना उमेदवारांचे पवित्र पोर्टलवरील नाव व आधार कार्ड वरील नावात तफावत असल्यास UID Error येतो. त्यासाठी उमेदवाराच्या नावात बदल झाला असल्याचे पुरावे पुरावे उदा. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे शासन राजपत्र अन्य पुरावा तसेच उमेदवार एकच असल्याचे हमीपत्र यासह मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करतील. शिक्षणाधिकारी पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर करतील व संबंधित विभागाचे शिक्षण उपसंचालक उमेदवार एकच असल्याची पडताळणी करतील व त्यांचे पवित्र पोर्टलवरील लॉगिन करून आधार कार्ड असलेले नाव नोंद करून submit करतील त्यानंतर शालार्थ आयडी तयार होईल.
६. नव्याने देयकात नाव समाविष्ट होत असल्याने वेतन पथक यांचेकडे सादर करावयाची कागदपत्रे :
बिल ग्रुपमध्ये नव्याने शिक्षण सेवक रुजू झाल्याने सध्याच्या कर्मचारी बिलामध्ये ज्यादाचे नाव समाविष्ट होत असल्यामुळे वेतन पथक यांना देयक पारित करण्यासाठी बदल होत असलेल्या पहिल्या देयकासोबत खालील कागदपत्र जोडावीत.
१. मुलाखतीसह निवड यादीतील सर्वसाधारण गुणवत्ता यादी.
२. संस्थास्तरावर मुलाखतीसह निवड यादी (Selection List)
३. संस्था नियुक्ती आदेश
४. खाजगी शाळेच्या बाबतीत शिक्षणाधिकारी यांनी संबंधीत शिक्षण सेवक यांच्या पात्रतेबाबत पोर्टलवर अपलोड केलेली NOC
५. शाळास्तरावर रुजू अहवाल
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 टिप्पण्या