विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत शिक्षण संचालक आदेश

 SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक एक नोव्हेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

क्र.शिसंमा./संकीर्ण/ प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ /२०२६/विद्या शाखा/ए-२/

प्रदूषण मुक्त दीपावलीची शालेय विद्यार्थ्यांना शपथ

दिनांक. स्वाक्षरीचे खाली नमूद असलेप्रमाणे

महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेल व्दारे

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,

२) शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषदा सर्व,

३) शिक्षण निरीक्षक (बृहन्ममुंबई) (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

४) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, सर्व महानगरपालिका


विषय :- SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत..

संदर्भ :- १. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे पत्र दि. २२.१०.२०२६ २. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२५८ (ई-१९०५७१३)/एस.डी.४ दि.२८ ऑक्टोबर, २०२६

उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन पत्रांच्या प्रती या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक २ च्या शासन पत्रान्वये शासनाने "मा. उच्ब न्यायालय, मुंबई येथे दाखल SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी व पर्यावरणीय प्रदूषणाबाबत जनजागृती करावयाची आहे. त्या अनुषंगाने दीपावली पूर्वी राज्यातील सर्व शाळांमध्ये /महाविद्यालयांमध्ये प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्याबाबत शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात यावा. यासाठी परिपाठाच्या वेळेचा उपयोग करता येऊ शकेल. शपथेचा मसुदा पुढीलप्रमाणे-


प्रदूषण मुक्त दीपावलीची शालेय विद्यार्थ्यांना शपथ

दिवाळी हा आनंद उत्सव आहे आणि या आनंद उत्सवात सभोवतालचे पर्यावरण प्रदूषित होणार नाही. यासाठी आम्ही शपथ घेत आहोत. फटाक्यांमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते, ते आरोग्याला अपायकारक आहे याची आम्हाला जाणीव आहे. प्रदूषणाचा लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण, पशु-पक्षी यांना खूप त्रास होतो. आम्ही आज सर्वजण संकल्प व निश्चय करतो की यावर्षीच्या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही. तसेच आमचे मित्र मंडळी, नातेवाईक, कुटुंबीय यांना देखील फटाके न वाजवण्यासाठी प्रवृत्त करू. वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी शपथ मी घेत आहे.


मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपरोक्त शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना तातडीने निर्गमित कराव्यात," असे संचालनालयास सूचित करण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय वांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या शासनाच्या सूचना निदर्शनास आणून SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत सर्व संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.


Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 01-11-2026 15:57:18

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे.

प्रत माहितीस्तव :-

१. मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सविनय सादर.

२. श्री. संजय जगताप, कार्यासन अधिकारी, (एस. डी. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

३. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई.



प्रदूषण मुक्त दीपावलीची शालेय विद्यार्थ्यांना शपथ

दिवाळी हा आनंद उत्सव आहे आणि या आनंद उत्सवात सभोवतालचे पर्यावरण प्रदूषित होणार नाही. यासाठी आम्ही शपथ घेत आहोत. फटाक्यांमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते, ते आरोग्याला अपायकारक आहे याची आम्हाला जाणीव आहे. प्रदूषणाचा लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण, पशु-पक्षी यांना खूप त्रास होतो. आम्ही आज सर्वजण संकल्प व निश्चय करतो की यावर्षीच्या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही. तसेच आमचे मित्र मंडळी, नातेवाईक, कुटुंबीय यांना देखील फटाके न वाजवण्यासाठी प्रवृत्त करू. वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी शपथ मी घेत आहे.


Eco-Friendly Diwali Pledge for School Students

Diwali is a festival of joy, and in this celebration, we will ensure that our surrounding environment does not get polluted. For this, we take a pledge. We are aware that firecrackers cause air and noise pollution, which is harmful to health. This pollution causes immense distress to young children, elderly citizens, patients, animals, and birds. Today, we all resolve and determine that we will not burst firecrackers during this year's Diwali. Furthermore, we will also motivate our friends, relatives, and family members not to burst firecrackers. I take a pledge that we will remain committed to celebrating all festivals and occasions throughout the year in a pollution-free manner.


स्कूली छात्रों के लिए प्रदूषण मुक्त दीपावली की शपथ

दिवाली आनंद का उत्सव है और इस खुशी के त्योहार में हमारे आस-पास का पर्यावरण प्रदूषित नहीं होगा, इसके लिए हम प्रतिज्ञा (शपथ) लेते हैं। हम इस बात से भली-भांति परिचित हैं कि पटाखों से वायु और ध्वनि प्रदूषण होता है, जो स्वास्थ्य के लिए हानिकारक है। इस प्रदूषण से छोटे बच्चों, वृद्ध व्यक्तियों, मरीजों और पशु-पक्षियों को बहुत परेशानी होती है। आज हम सभी संकल्प और निश्चय करते हैं कि इस वर्ष की दिवाली में हम पटाखे नहीं जलाएंगे। साथ ही, हम अपने मित्रों, रिश्तेदारों और परिवार के सदस्यों को भी पटाखे न जलाने के लिए प्रेरित करेंगे। मैं शपथ लेता/लेती हूँ कि हम वर्ष भर के सभी त्योहारों और उत्सवों को प्रदूषण मुक्त तरीके से मनाने के लिए प्रतिबद्ध रहेंगे।


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.