राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
राष्ट्रीय नशा मुक्ती जनजागृती अभियान आणि राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेबाबत...
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण-२०२६/प्र.क्र.१७१/एस.डी.-४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :-०४ ऑगस्ट, २०२६.
संदर्भ :- सचिव, मेडिकल विंग (RERF) ब्रह्मा कुमारीज यांचे दिनांक ३०.०७.२०२६ रोजीचे प्राप्त पत्र.
शासन परिपत्रक:-
भारत सरकारसोबत नशा मुक्त भारत अभियानांतर्गत झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) अनुषंगाने, मेडिकल विंग (Rajayoga Education & Research Foundation) यांच्यामार्फत दिनांक ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये देशव्यापी "नशा मुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा" आयोजित करत आहे, ज्याचा उद्देश ४ कोटी नागरिकांना - विशेषतः युवक/युवती आणि विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विरोधात प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे असा आहे.
विद्यार्थी आणि युवकांना ही प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करून, आपण एकत्रितपणे व्यसने, तणाव आणि जीवनशैलीतील आजारांपासून मुक्त समाज घडवू शकतो. एकत्रितपणे "Say No to Drugs, Say Yes to Life" (व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा) या संदेशासह राज्यातील या मोहीम कालावधीत प्रतिज्ञा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभागी होण्याकरिता आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात.
२. सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी शासनास सादर करावा. ३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८०४१५२१०५७२४९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ANIRUDDHA AVINASH KULKARNI
(अनिरूद्ध कुलकर्णी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
प्रतः
१. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव,
२. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव,
३. प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांचे स्वीय सहायक,
४. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे,
५. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई,
६. संचालक, राष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे,
७. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
८. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
९. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
१०. प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्था (सर्व),
११. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/निरंतर), जिल्हा परिषद (सर्व) / सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका,
१२. प्रशासन अधिकारी (महानगरपालिका/नगरपालिका) (सर्व),
१३. निवड नस्ती (कार्या.एस.डी.४).
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 टिप्पण्या