शुध्दीप्रत्रक! १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना (ABHA) कार्ड काढणे १०/०६/२०२६

राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढणेबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने दिनांक 10 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे शुद्धिपत्रक निर्गमित केले आहे. 

क्र.शिसंमा/२०२६/टि-७/आभा कार्ड/

दिनांक :-१० /०६/२०२६.

शुध्दीप्रत्रक

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, संबंधित सर्व.

३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.

४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) संबंधित सर्व.

विषय- राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढणेबाबत.

संदर्भ : १.

शासन पत्र क्रमांक: वैखप्र-१६२५/(१४९/२५)/ टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/टि-७/आयुष्यमान /६१५७ दिनांक ०५/०३/२०२६.

३. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र. शिसंमा/२०२६/टि-७/आभा/६८९३ दिनांक दिनां २२/०५/२०२६.

उपरोक्त संदर्भीय पत्र क्र ३ अन्वये राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत असलेले आरोग्य संरक्षणाचे अनुज्ञेय लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढण्याबाबत कळविण्यात आलेले होते.

सदरील पत्रातील परिच्छेद क्र ३ मध्ये नमूद "यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैदयकीय प्रतिपूर्तीचे देयक स्विकारले जाणार नाही" ही ओळ रदद करण्यात येत आहे.

करिता, विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्यामुळे आपले कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढण्याबाबत अवगत करण्यात यावे.

त्याअनुषंगाने हे कार्ड काढण्याची कार्यपध्दती तसेच व्हिडीयो लिंक या पत्रासोबत पुनःश्च जोडण्यात येत आहे.


Digitally signed by Eknath Shashikant Ambokar Date: 10-06-2026 16:26:12

(डॉ. एकनाथ आंबोकर)

शिक्षण उपसंचालक

अंदाज व नियोजन (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव सविनय सादर

मा. आयुक्त (शिक्षण), म. रा. पुणे


आभा (ABHA) कार्ड तयार करणे .[ Ayushman Bharat Health Account. }

आभा (ABHA) कार्ड (आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) काढण्यासाठी केंद्र सरकारच्या https://abdm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीने अगदी दोन मिनिटांत मोफत नोंदणी करता येते. हे १४ अंकी युनिक कार्ड तुमची सर्व वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवते.

मोबाईलवरून ऑनलाइन काढण्याची सोपी पद्धत:

१. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या ( https://abdm.gov.in )

तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरील ब्राऊझरमध्ये जाऊन ABHA (आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) पोर्टल उघडा.

२. नोंदणी (Registration) सुरू करा

होम पेजवर 'Create ABHA Number' (किंवा Create ABHA) या बटणावर क्लिक करा.

३. ओळखीचा पुरावा निवडा

आभा नंबर तयार करण्यासाठी 'Use Aadhaar' हा पर्याय निवडा (तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचाही वापर करू शकता).

४. ओटीपी (OTP) सत्यापित करा

तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा.

५. आभा ॲड्रेस आणि कार्ड निर्मिती

स्क्रीनवर तुमचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक पसंतीचा 'ABHA Address' (उदा. name@abha) तयार करायचा आहे. हे पूर्ण झाल्यावर तुमचे १४ अंकी आबा (ABHA) कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट करू शकता. 


Generate the ABHA Card

1. Visit the official https://abdm.gov.in  

2. Click on Create ABHA Number.

3. Enter your 12-digit Aadhaar number and complete the image captcha.

4. Enter the One-Time Password (OTP) sent to your Aadhaar-linked mobile number.

5. Provide your personal details and create a unique username (ABHA Address).(e.g. name@abha)

6. Your 14-digit ABHA ID and card will be generated. You can download it as a PDF off ABHA Card...


राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) कार्ड काढणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने दिनांक 22 मे 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

क्र.शिसंमा/२०२६/टि-७/आभा कार्ड/ 6893

दिनांक :- २२/०५/२०२६.

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, संबंधित सर्व.

३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.

४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) संबंधित सर्व.

विषय- राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) कार्ड काढणेबाबत.

संदर्भ

: १. शासन पत्र क्रमांक वैखप्र-१६२५/ (१४९/२५)/ टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.

२. प्रस्तूत कार्यालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/टि-७/आयुष्यमान /६१५७ दिनांक ०५/०३/२०२६.

उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचायांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली होती.

तथापि, याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासो नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वाना अवगत करण्यात यावे असे कळविण्यात आले होते.

त्याअनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपध्दती तसेच व्हिडीयो लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैदयकीय प्रतिपूर्तीचे देयक स्विकारले जाणार नाही


(डॉ. एकनाथ आंबोकर)

 शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन 

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), म. रा. पुणे


आबा (ABHA - आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड हे तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी एक १४ अंकी ओळखपत्र आहे. तुम्ही हे कार्ड ऑनलाइन (मोबाईल/कॉम्प्युटर) किंवा ऑफलाइन (रुग्णालय/CSC केंद्र) अत्यंत सोप्या पद्धतीने मोफत काढू शकता,


ऑनलाइन नोंदणी प्रक्रियाः

अधिकृत संकेतस्थळः नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या ABHA नोंदणी पोर्टलवर जा.

Create ABHA Number: मुख्य पानावर 'Create ABHA Number' हा पर्याय निवडा,

आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सः नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करा。

ओटीपी पडताळणीः तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP (One Time Password) टाका。

आभा अॅड्रेस (ABHA Address) तयार कराः तुमचे नाव किंवा पसंतीचा युझरनेम टाका.

कार्ड डाउनलोडः यशस्वी नोंदणीनंतर तुमचे १४ अंकी आभा कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.


ऑफलाइन नोंदणी प्रक्रियाः

जर तुमच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊ शकता, तिथे तुमचे आधार कार्ड आणि ओळखपत्र दाखवून संबंधित कर्मचारी तुम्हाला आभा कार्ड तयार करून देतील.

टीप: हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य नसले, तरीही ते असल्यास नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी होते.


शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी सर्व महानगरपालिका आयुक्त सर्व व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ-

१. मा. सचिव २ सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र क्र. PHD/३७/२०२५-MJPJAY/AB-PMJAY दि. १३.०८.२०२५

२. जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदूर्ग यांचे पत्र क्र जिशचिसिं/ MJPJAY/आ. का/१५०९४-९७/२०२५-२६ दि. ३०.१०.२०२५

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत. यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड Beneficiary Login मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

२. वरिल सूचनानुसार दि. १६ ऑगस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.

३. आता संदर्भ २ च्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाजकल्याण कार्यालय इ. ठिकाणी शिबीरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे.

४. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांत सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचा-यांसह) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित कराव्यात. अशा कर्मचा-यांसाठी Beneficiary लॉगीनद्वारे कार्ड निर्माणाकरीता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजीत करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल सोबात जोडलेल्या प्रपत १ मध्ये या कार्यालयास सादर करावा अशी विनंती आहे.


सोबत प्रपत्र १


(आण्णासाहेब चव्हाण, भा.प्र.से.) 

मुख्य कार्यकारी अधिकारी 

राज्य आरोग्य हमी सोसायटी, महाराष्ट्र शासन


वरील संपूर्ण आदेश वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. कार्डवर रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठविली जाणार आहे.

आपले आधार कार्ड आपण आपल्या मोबाईलवरून सहजपणे काढू शकतो. यासाठी आपल्याकडे असणे आवश्यक आहे आपले आधार कार्ड व त्याशी संलग्न असलेला मोबाईल नंबर.


आभा कार्ड काढण्यासाठी आपल्या मोबाईल मधील गुगल ओपन करून त्यामध्ये पुढील प्रमाणे  आभा कार्ड असे इंग्रजीतून सर्च करा व सर्च केल्यानंतर सर्च लिस्ट मधून पहिल्याच लिंक वर क्लिक करा! 



पहिल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये क्रिएट युवर आभा नंबर युजिंग आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन असे दोन पर्याय मिळतील आपल्याकडे आधार कार्ड उपलब्ध असते त्यामुळे युसिंग आधार कार्ड वर टिक करावे नसेल तर युजिंग ड्रायव्हिंग लायसन वर क्लिक करावे.

व शेवटी दिलेल्या काळ्या रंगाच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.


त्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल  त्या विंडोमध्ये आपला आधार नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चा नंबर अचूक नोंदवावा त्याखाली असलेल्या सूचनानंतर आय ॲग्री वर टिक करावे कॅपच्या कोड मध्ये असलेल्या अंकांची बेरीज करून त्याखाली नोंदवावी व त्याखाली असलेल्या काळ्या रंगाच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.



वरील नेक्स्ट बटन वर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड सोबत संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर सहा अंकी ओटीपी येईल तो अचूक सहा डब्यांमध्ये नोंदवावा व नेक्स्ट बटन वर क्लिक करावे अचूक ओटीपी नोंदवल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्ड वरील माहिती पुढील प्रमाणे दिसून येते. ज्यामध्ये आपले नाव जन्मतारीख व पत्ता आपल्याला दिसतो त्या खालील काळ्या रंगाच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.


वरील नेक्स्ट बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल त्यामध्ये तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर अचूक नोंदवा व त्याखाली असलेल्या काळ्या रंगाच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करावे. 


आपण नोंदवलेल्या मोबाईल नंबर वर आपल्याला पुन्हा एक सहा अंकी ओटीपी मिळेल तो अचूक नोंदवून नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता आपला आभा नंबर तयार झालेला आहे.
आपल्या आभा अकाउंट चे युजर आयडी व पासवर्ड आपण तयार करू शकतो ते केलेच पाहिजे असे नाही किंवा हीच प्रोसेस आपण मोबाईल ॲप वापरून देखील करू शकतो.

किंवा पुन्हा होम पेजवर जाऊन आधार ओटीपी घेऊन आपल्याला कार्ड डाउनलोड करता येईल.






मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. Sir, you have provided nice information about this and you always provide information on different topics also. So thanks to you with best wishes.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.