आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील (प्राथमिक शिक्षक / माध्यमिक शिक्षक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक) पदे "पवित्र" (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिनांक 9 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला.
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्र. MTD-३६०२४/७९/२०२५-MTD (Desk१५)
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२.
दिनांक: ०९ जून, २०२६.
वाचा:-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५ / प्र. क्र. १४९ /टीएनटी-१, दिनांक २३/०६/२०१७.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५ / प्र. क्र. १४९ /टीएनटी-१, दिनांक २०/०६/२०१८.
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५ / प्र. क्र. १४९ /टीएनटी-१, दिनांक ०७/०२/२०१९.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०१८ /प्र. क्र. ३९७ /टीएनटी-१ दिनांक २५/०२/२०१९.
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/ प्र. क्र. १०६ /टीएनटी-१, दिनांक १०/११/२०२२.
६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३ / प्र. क्र. ५०९ /टीएनटी-१, दिनांक १३/१०/२०२३.
७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अधिसूचना क्र. संकीर्ण- २०२३/प्र. क्र. ३०२ / टीएनटी-१, दिनांक १२/०२/२०२५.
८) शासन पत्र क्रमांक MTD-३६०२४/७९-२०२५-MTD (Desk-१५), दिनांक १२/१/२०२६.
९) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५ / प्र. क्र. ९३३ (१) /टीएनटी-१, दिनांक २०/०१/२०२६.
१०) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५ / प्र. क्र. ९३३ (२) /टीएनटी-१, दिनांक २०/०१/२०२६.
११) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. संकीर्ण-२०२५ / प्र. क्र. ९३३ (१) / टीएनटी-१, दिनांक ०२/०४/२०२६.
१२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय बीसीसी-२०२३/प्र. क्र. ५४ / आरक्षण-५ दिनांक ११/०२/२०२६.
प्रस्तावनाः
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ अन्वये राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करतांना सर्व उमेदवरांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती "अभियोग्यता बुद्धीमत्ता चाचणी" उच्चतम गुण प्राप्त उमेदवारामंधून "पवित्र" (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे निवड करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली असून, सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे.
२. आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक पदावर निवड करतांना सर्व पात्र उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होऊन, शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यादृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक २३/०६/२०१७ व दिनांक ०७/०२/२०१९ अन्वये लागू करण्यात आलेल्या "पवित्र" (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3. उपरोक्त शासन निर्णयांतील तरतुदी व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयांच्या धर्तीवर शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी "पवित्र" (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे, सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयांच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी "पवित्र" (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
२. शिक्षक संवर्गातील पदभरती कार्यपद्धतीः
१) शासकीय आश्रमशाळेवर आकृतीबंधानुसार शिक्षक संवर्गाच्या मंजूर पदांपैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करुन, संबंधित अपर आयुक्त त्यांच्या विभागातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करतील.
२) सर्व शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदुनामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संबंधित उप आयुक्त, अपर आयुक्त
कार्यालय हे "पवित्र" या संगणकीय प्रणालीमध्ये भरतील. त्यानुसार, अपर आयुक्त, आदिवासी विकास हे विभागनिहाय जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करतील. आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडून करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. बिंदुनामावली ही प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणे आवश्यक राहील.
३) सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास तसेच आयुक्त, आदिवासी विकास यांना स्वतंत्र Login (User name, Password) उपलब्ध करुन दिला जाईल. अपर आयुक्त कार्यालयातील सदस्य सचिव (उप आयुक्त) यांनी Login वर संबंधित माहिती भरावी. तद्नंतर, संबंधित अपर आयुक्त हे सात कार्यालयीन दिवसांत, जाहिरातीतील माहिती बरोबर असल्याची खात्री करतील व माहिती बरोबर असल्यास मान्य करतील. माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणांसह अमान्य करतील.
४) अपर आयुक्त यांनी सात कार्यालयीन दिवसांच्या विहित कालमर्यादेत कार्यवाही न केल्यास त्याबाबतची सद्यस्थिती आयुक्त, आदिवासी विकास यांच्या Login वर दर्शविली जाईल. आयुक्त, आदिवासी विकास यांच्या Login वर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने तीन कार्यालयीन दिवसांत आयुक्त, आदिवासी विकास हे संबंधित अपर आयुक्त यांना कार्यवाही करण्याबाबत कळवतील. त्यानुसार, संबंधित अपर आयुक्त यांनी विहित मुदतीत जाहिरात परवानगी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास, त्यांच्या गोपनीय अहवालात याबाबतची नोंद घेण्यासंदर्भात आयुक्त, आदिवासी विकास हे कार्यवाही करतील.
५) अपर आयुक्त यांनी मान्यता दिल्यानंतर रिक्त पदांनुसार "पवित्र" पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल व विभागाच्या Login वर दिसेल. तसेच सदर जाहिरात https://mahateacherrecruitment.org.in व https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर प्रदर्शित होईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अपर आयुक्त सदर जाहिरात जास्त खपाच्या स्थानिक दोन वृत्तपत्रांमध्ये (किमान एक मराठी भाषेतील) प्रसिद्ध करतील. तसेच, विभागीय स्तरावर जास्तीत जास्त प्रसिद्धी देतील.
६) इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर निश्चित केलेल्या कालावधीच्या आत अर्ज करतील. उमेदवारांना संबंधित अपर आयुक्त विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांच्या रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेले गुण त्या चाचणीच्या आधारे पदभरतीचे जितके टप्पे राबविण्यात येतील, त्या सर्व टप्प्यांसाठी वैध मानले जातील.
७) शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्रत्येक रिक्त जागेसाठी मुलाखतीशिवाय १:१ या प्रमाणात उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती प्राधिकारी यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची एकदाच निवड होईल. या चाचणीच्या आधारे होणाऱ्या पदभरतीच्या पुढील टप्प्यात उमेदवाराचा विचार करता येणार नाही. उमेदवारास अन्य पदावर नियुक्ती पाहिजे असल्यास त्याला पुढील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्रविष्ट होऊन निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारात उमेदवारांना जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. यामध्ये शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागांच्या पदांचा देखील समावेश असेल. उमेदवारास यापैकी त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त १०० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.
८) संबंधित अपर आयुक्त निवडसूचीतील उमेदवारांच्या सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करतील. (शालान्त / उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी /पदविका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता) Non Creamy Layer प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता परीक्षा (इ.१ ली ते ८ वी करीता) / अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण (महिला / दिव्यांग / खेळाडू इ.) इत्यादी), त्या-त्या प्रवर्गात आवश्यक असलेल्या इतर सर्व कागदपत्रांची तपासणी करतील व पात्र उमेदवारांना आदेश देतील. पदभरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी खालील समिती करेल.
१ संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास.
अध्यक्ष
२ सहायक आयुक्त, अपर आयुक्त कार्यालय.
सदस्य
३ सहायक आयुक्त (शिक्षण) अपर आयुक्त कार्यालय.
सदस्य
४ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
सदस्य
५ उप आयुक्त, अपर आयुक्त कार्यालय.
सदस्य सचिव
९) नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे, त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्यांच्या सेवा त्वरीत समाप्त करण्यात येतील.
१०) नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे छाननीअंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल. त्यानुसार, उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल. यासंदर्भात उमेदवाराचा आक्षेप असल्यास तो सात दिवसांच्या आत पवित्र प्रणालीवर असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप संबंधित अपर आयुक्त यांना प्रणालीवर दिसेल. संबंधित अपर आयुक्त सात दिवसांच्या आत त्यावर निर्णय घेतील.
११) छाननीअंती मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना अपर आयुक्त सात दिवसांच्या कालावधीत ई-मेलद्वारे तसेच नोंदणीकृत डाकेने नियुक्तीपत्र पाठवतील.
१२) उमेदवाराने नियुक्ती पत्रास सात दिवसांच्या आत स्विकृती कळविणे बंधनकारक राहील. अशी स्विकृती दिल्यानंतर अपर आयुक्त यांनी संबंधितांना नियुक्ती आदेश देतील. संबंधित प्रकल्प अधिकारी त्या उमेदवारास रुजू करुन घेतील व तसा रुजू अहवाल अपर आयुक्त यांना सादर करतील. उमदेवारास नियुक्ती आदेश दिल्यानंतर पवित्र पोर्टलवरील पुढील बाबींची आवश्यक ऑनलाईन प्रक्रीया ही अपर आयुक्त यांनी पूर्ण करणे बंधनकारक राहील, जेणेकरुन पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रीया पूर्ण झाल्याचे विभागाच्या निदर्शनास येईल.
१३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, दिनांक ०७/०२/२०१९ मधील मुद्दा क्र. ५.८ नुसार "मुलाखतीशिवाय निवड प्रक्रीया" या प्रकारासाठी, उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यास अथवा अपात्र ठरल्यास रिक्त राहिलेल्या पदासाठी पुन्हा निवड प्रक्रीया राबविण्यात येईल. आयुक्त, आदिवासी विकास यांना पवित्र पोर्टलवरील माहिती पडताळणी / सुधारणा व अंतिम करण्याचा अधिकार असेल.
१४) उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र याबाबत अपात्र झाल्यास, संबंधित उमेदवाराची या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल. मात्र आवश्यक अर्हतेच्या पूर्ततेअंती याच किंवा सुधारित गुणाच्या आधारावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र असतील.
३. शिक्षण सेवकाच्या नियुक्तीचा कालावधीः प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळांमधील ज्या पदास शिक्षण सेवक कालावधी लागू आहे त्या पदाचा परिवीक्षाधीन कालावधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १३/१०/२००० व दिनांक २७/०२/२००३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षे राहील.
४. नियुक्तीचे माध्यमः शिक्षक संवर्गातील पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराने ज्या माध्यमासाठी अर्ज केला असेल, त्या माध्यमाच्या पदावर नियुक्ती देण्यात येईल.
५. वयोमर्यादा : शिक्षक संवर्गातील पदासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता ३८ वर्षे व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४३ वर्षे राहील. समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी विहित करील अशी वयोमर्यादा लागू होईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. त्यानुसार एका चाचणीच्या आधारे एकापेक्षा अधिक टप्यात पदभरती केली जाते. यास्तव, उमेदवाराच्या वयाची परिगणना शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास केली जाते. ही वयोमर्यादा संबंधित चाचणीच्या आधारे राबविल्या जाणाऱ्या पदभरतीच्या सर्व टप्प्यांसाठी वैध आहे.
६. अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस "पवित्र" प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रीया लागू राहणार नाही.
७. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदींनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी (इ. १ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक- आरटीई-२०१०/ प्र. क्र. ५७२/ प्राशि-१, दिनांक १३/०२/२०१३ मधील तरतुदींनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील.
८. इयत्ता १ ली ते ५ वी, इयत्ता ६ वी ८ वी व इयत्ता ९ वी १० वी या गटांसाठी त्या त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करुन देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या त्या शाळांचे माध्यम जसे की, मराठी, जूर्द, कन्नड इत्यादी विचारात घेऊन, उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांसाठी व्यावसायिक अर्हता
इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायीक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र १२ वी विज्ञान किंवा बी.ए./ एम.ए. इंग्रजी किंवा बी. एस्सी / एम. एस्सी. अशी अर्हता धारण केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा असेल.
९. शासकीय आश्रमशाळावंरील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास "नोडल अधिकारी" म्हणून काम पाहतील. त्यानुषंगाने, ते शिक्षण आयुक्त /शिक्षण संचालक, पुणे यांच्याशी समन्वय साधून यासंदर्भातील सर्व कामकाज पाहतील. आयुक्त, आदिवासी विकास यांनी राज्यातील सर्व संबंधित अपर आयुक्त यांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र Login (User name, Password) देण्याबाबत कार्यवाही करावी.
१०. शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे. तसेच, सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने वरील मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपद्धतीप्रमाणे संबंधित आयुक्त, आदिवासी विकास व संबंधित अपर आयुक्त यांनी कार्यवाही करावी.
११. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक निवडीसाठी "पवित्र" (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीसंदर्भात, भविष्यात वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय / परिपत्रक / नियम / तरतुदी / सुधारणा शासकीय आश्रमशाळांवरील शिक्षक निवडीसाठी लागू राहतील.
१२. सदरहू शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
१३. सदरहू शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक सांकेताक २०२६०६०९१८११०३५६२४ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,
AJAY MAHADEV SAKHARE
(अजय साखरे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई,
२) मा. सभापती / उप सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
३) मा. अध्यक्ष / उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
४) मा. विरोधी पक्ष नेता, विधान परिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
५) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments