राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू! आदेश

 राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत शिक्षण संचालक योजना, संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी संयुक्तपणे दिनांक 14 मे 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 


क्रमांक-शिसंयो/२०२६/अनुकंपा/खाप्रशा/आस्था-का-३ दिनांक १४/०५/२०२६.

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२. शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद सर्व.

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व.

४. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व.

५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर) बृहन्मुंबई.

विषय- राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत.

संदर्भ - १. शासन निर्णय क्रमांक अकंपा२०२५/प्र.क्र.८२९/ टीएनटी-१, दिनांक २७/१/२०२६. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई-३२.

२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) म.रा. पुणे यांचे पत्र क्रमांक शिसंमा/२०२५अनुकंपा/टि-४१७१२६१८, दिनांक १०/२/२०२६.

३. शिक्षण संचालक (योजना) म.रा. पुणे यांचे पत्र क्रमांक शिसंयो/२०२६/अनुकंपा/खाप्रशा/आस्था-का३, दिनांक २६.२.२०२६/६.३.२०२६. 

४. शिक्षण संचालक (प्राथमिक) म.रा. पुणे यांचे पत्र.क्रमांक प्राशिसं/अनुकंपा/योजना/२६/टे-५०२/१८५४८४३,दिनांक २०/४/२०२६.

५. मा.आयुक्त-शिक्षण, म.रा. पुणे तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य) यांचे समवेत दिनांक ७/५/२०२६ रोजी झालेली चर्चा.

संदर्भ-१ वरील शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र.२, ३ व ४. नुसार या बाबत आवश्यक त्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

या संदर्भात मा.आयुक्त शिक्षण, म.रा. पुणे तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य) व शिक्षण संचालक (योजना) यांच्या दिनांक ७/५/२०२६ रोजी झालेल्या चर्चेनुसार असे कळविण्यात येते की, दिनांक २७/१/२०२६ पासून सुधारित धोरण अंमलात आले असल्याने, या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक २७/१/२०२६ पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर यांपूर्वीच्या धोरणानुसार संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचेस्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक आहे.

सदर बाब विचारात घेता अनुकंपा नियुक्ती बाबत दिनांक २७/१/२०२६ पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी उचित कार्यवाही करावी. असे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (योजना) यांचेकडे प्राप्त झाले असल्यास त्यांनी ते संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे परत पाठवावेत. तसेच दिनांक २७/१/२०२६ नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर शिक्षणाधिकारी (योजना) यांनी संदर्भिय शासन निर्णयातील निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी.

संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाने संदर्भिय शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार संस्था/शाळांकडून शिफारशीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करुन, प्रस्ताव अचूक असल्यास संबंधित उमेदवाराच्या नियुक्तीबाबत स्वयंस्पष्ट शिफारस संस्थेकडे/शाळेकडे करावी. तसेच सदर शिफारस पत्राची एक प्रत संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवावी.

प्रस्तावांवर वेळेत कार्यवाही न झाल्याने न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी शिफारशीसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) यांची राहील आणि मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील, याची नोंद घ्यावी.


Digitally signed by

Krishnakumar Bhaskarrao Patil 

शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे १.

Digitally signed by Mahesh Madhukar Palkar

Date: 15-05-2026 10:31:12

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 15-05-2026 11:3 

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे १.

प्रत-मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांना माहितीस्तव सविनय सादर. 

प्रत-मा.आयुक्त-शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.