महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ व २०२६ निकालातील विसंगती, CTET/TET पात्रता परीक्षा माहिती संकलन दिनांक ०१/०१/२०२६ च्या Cut-off Date नुसार कार्यवाही करण्याबाबत विनंती संदर्भात माननीय आमदार श्री प्रशांत बंब यांना पुढील प्रमाणे उत्तरे दिली आहे.
KP Exam संदर्भात MSCE कडून मा. आमदार यांना दिलेले उत्तर
प्रति,
मा. श्री. प्रशांत बंब सो., सदस्य महाराष्ट्र विधान सभा, मंत्रालय, मुंबई
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ व २०२६ निकालातील विसंगती, CTET/TET पात्रता परीक्षा माहिती संकलन दिनांक ०१/०१/२०२६ च्या Cut-off Date नुसार कार्यवाही करण्याबाबत विनंती.
१. पात्रता आणि कट-ऑफ तारीख (Cut-off Date) बाबत वाद
आक्षेप: परीक्षा अर्जाच्या लिंकमध्ये TET परीक्षेचे केवळ 'वर्ष' विचारले गेले होते, अचूक तारीख नाही. यामुळे कट-ऑफ तारीख (०१/०१/२०२६) उलटून गेल्यानंतर, म्हणजेच जानेवारी/फेब्रुवारी २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवारही पात्र ठरत आहेत, जे नियमांचे उल्लंघन आहे. तसेच ६ वी ते ८ वी च्या केंद्रप्रमुख पदासाठी TET पेपर-२ उत्तीर्ण असणे बंधनकारक असताना पेपर-१ उत्तीर्ण उमेदवारांनाही पात्र केले जात आहे.
परीक्षा परिषदेचे उत्तर: शासनाच्या २० फेब्रुवारी २०२६ च्या पत्रानुसार, जर उमेदवारांनी ०१/०१/२०२६ पूर्वी TET परीक्षा दिली असेल आणि तिचा निकाल त्यानंतर (जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये) लागून ते पात्र ठरले असतील, तर अशा उमेदवारांना निवड सूचीत समाविष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
TET पेपरबाबत स्पष्टीकरण: ग्रामविकास विभागाच्या नियमांनुसार, 'प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक)' संवर्गातील ज्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता पदवी (Degree) आहे, त्यांना या परीक्षेस बसण्याची परवानगी आहे. त्यांच्यासाठी व्यावसायिक अर्हता किंवा TET पेपर-२ च्या अटीबाबत मूळ अधिसूचनेत स्पष्ट भाष्य नसल्याने, TET पेपर-१ उत्तीर्ण असलेल्या अशा पदवीधर शिक्षकांचा समावेश अंतिम निवड सूचीत केला जात आहे.
२. निकाल आणि नॉर्मलायझेशन (Normalization) पद्धतीतील विसंगती
आक्षेप: ३ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शिफ्टमधील उत्तीर्ण उमेदवारांची संख्या अत्यंत कमी आहे, तर ४ फेब्रुवारीच्या शिफ्टमधील तब्बल ९०% उमेदवार निवडले गेले आहेत, ज्यामुळे निकाल संशयास्पद वाटतो. तसेच 'नॉर्मलायझेशन'चे निकष स्पष्ट नसून उमेदवारांना Response Sheet किंवा गुणपत्रिका स्पष्टपणे दाखवली गेली नाही.
परीक्षा परिषदेचे उत्तर: परीक्षा बहुस्तरीय सत्रांमध्ये (Multiple Sessions) आणि वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांद्वारे घेतली गेल्यामुळे काठिण्य पातळी समान करण्यासाठी इक्विपरसेंटाईल इक्वेटिंग' (Equipercentile Equating) या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या सांख्यिकीय नॉर्मलायझेशन पद्धतीचा वापर केला गेला आहे. हा निकाल 'IBPS' या गोपनीय व नामांकित संस्थेकडून तयार करण्यात आला आहे.
निकालाची आकडेवारी: परीक्षा परिषदेने आकडेवारी जाहीर करत ९०% चा दावा फेटाळला आहे. निवडणूक असलेल्या २२ जिल्ह्यांमध्ये सर्व ६ सत्रांचा सरासरी निकाल ४.०५% लागला आहे, तर उर्वरित १२ जिल्ह्यांमध्ये ३ सत्रांचा सरासरी निकाल ३.७२% लागला आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे पारदर्शक असून कोणताही गैरप्रकार झालेला नाही.
३. प्रश्न रद्द करणे आणि गुण वाटप (Dropped Questions)
स्पष्टीकरण: ३ फेब्रुवारीच्या पहिल्या सत्रातून ३ प्रश्न, दुसऱ्या सत्रातून २ प्रश्न आणि तिसऱ्या सत्रातून १ प्रश्न मूल्यांकनातून (Evaluation) वगळण्यात आला आहे. तर ४ सत्राच्या कोणत्याही शिफ्टमधून प्रश्न वगळलेले नाहीत. जे प्रश्न वगळण्यात आले, त्यांचे गुण त्या सत्रात उपस्थित असणाऱ्या सर्व उमेदवारांना नियमानुसार देण्यात आले आहेत. तसेच दृष्टिबाधित उमेदवारांना आकृती किंवा तार्किक क्षमतेच्या प्रश्नांऐवजी त्यांच्या उर्वरित कामगिरीच्या आधारावर प्रमाणशीर (Proportionate) गुण देण्यात आले आहेत.
४. Response Sheet आणि तक्रार निवारण
आक्षेप: उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याची संधी दिली नाही आणि गुण योग्य रितीने दाखवले नाहीत.
परीक्षा परिषदेचे उत्तर: विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार Response Sheet आणि Answer Key उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परीक्षा परिषदेच्या ईमेलवर आलेल्या उमेदवारांच्या तक्रारी 'IBPS' कडे पाठवून, त्यांच्याकडून आलेली अधिकृत उत्तरे संबंधित उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर पाठवण्यात आली आहेत.
५. परीक्षेसाठी अपुरा वेळ आणि अभ्यासक्रम
आक्षेप: परीक्षा अचानक जाहीर झाल्यामुळे शिक्षकांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते.
परीक्षा परिषदेचे उत्तर: या परीक्षेचे कामकाज २०२३ पासून सुरू होते. सेवा नियमांमधील दुरुस्ती (R.R. Amendment), न्यायालयीन प्रकरणे आणि प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा पुढे जात होती आणि अखेर ती ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आली. त्यामुळे शिक्षकांकडे अभ्यासासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होता.
परीक्षा परिषदेच्या संपूर्ण उत्तरांची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments