जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असणेबाबत शिक्षण संचालक परिपत्रक १५/०५/२०२६

 शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 15 मे 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

जा.क्र.प्राशिसं/टे-३०१/२०२६

दिनांक- १५/५/२०२६

प्रति,

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, सर्व

विषयः- जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असणेबाबत

संदर्भ - मा. शालेय शिक्षण मंत्री व मा. महिला व बालविकास मंत्री यांच्या दि. १४/५/२०२६ च्या बैठकीतील निर्देश

महोदय,

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-२०२०) मधील तरतुदीनुसार भविष्यात पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडावे लागतील.

यासाठी ब-याच ठिकाणी जिल्हा परीषदेच्या शाळा व अंगणवाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्यांव्यतिरिक्त जास्तीची एखादी वर्गखोली सुस्थितीत असेल तर ती वर्गखोली अंगणवाडी साठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही तात्काळ करून अहवाल संचालनालयास पाठवावा


Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 15-05-2026 12:43:38

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे-१


प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा.आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे


प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव

१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.