जनगणना कार्यात दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्यांना कामे न देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आयुक्तांनी दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
दिस आ. जनगणना ९०2
पुणे.
दि. ३०.०४.२०२६
प्रति,
१. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व)
२. आयुक्त महानगरपालिका (सर्व)
३ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
विषय : जनगणना कार्यात दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्यांना कामे न देण्याबाबत....
संदर्भ :-
१) राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना मुंबई ३२ यांचे दिनांक १३.०४.२०२६ रोजीचे निवेदन
२) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकोणं २०१० / मुमंस २०३/२.८.३३७/५, दिनांक २७ सप्टेंबर २०१०
उपरोक्त विषयर्यान्वये आपणांस कळविण्यात येते कि राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मबारी/अधिकारी संघटना मुबई ३२ पांचे १३.०४.२०२६ रोजीचे निवेदन या आयुक्तालयास प्राप्त झाले आहे. सदर निवेदनामध्ये शासनामार्फत जनगणना कार्यवाही सुरू होत असताना, महाराष्ट्र शासनाच्या वरील संदर्भ २ अन्वये दिव्यांग कमधारी अधिकान्यांना जनगणनेची कामे देऊ नयेत, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. ससंथ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींना भेदभावमुक्त व सन्मानपूर्वक वागणूक देगे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे.
तथापि, काही ठिकाणों या निर्देशांचे पूर्ण पालन होत नसल्याच्या तक्रारी अधूनमधून प्राप्त होतात. त्यामुळे दिव्यांग कर्म धागे/अधिकाऱ्यांना अनावश्यक त्रास होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
त्या अनुषंगाने वरील संदर्भाया सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या स्तरावरून संबंधितांना तसेच सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग कर्मचारी/अधिकाऱ्याला जनगणनेची कामे देण्यात येऊ नयेत व शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल केलेल्या कार्यवाहोचो एक प्रत संघटनेस अवगत करायी ही नम्र विनंती. अशी निवेदनात मागणी केली आहे. त्याअनुषंगाने सदर प्रकरणी शासन नियमानुसार उचित कार्यवाहो करावी.
30/4/2026
(सत्यजीत बडे भा.प्र.से.)
सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य, पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



2 Comments
उपयुक्त माहिती
ReplyDelete🙏💐🙏
Delete