स्विफ्ट चॅटबोट / SwiftChat मध्ये Live Reports (MH) चॅटबोट ऍड करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा:
1️⃣ सर्वप्रथम SwiftChat अॅप ओपन करा.
2️⃣ अॅपच्या उजव्या वरच्या कोपऱ्यातील “Scan & Chat” हा पर्याय निवडा.
3️⃣ दिलेला QR कोड स्कॅन करा.
4️⃣ QR कोड स्कॅन होताच तुमच्या SwiftChat मध्ये Live Reports (MH) चॅटबोट आपोआप ऍड होईल.
5️⃣ त्यानंतर आपल्या शाळेचा UDISE कोड आणि स्वतःचा शालार्थ आयडी प्रविष्ट करा.
यानंतर आपण आपल्या वर्गाची संपूर्ण माहिती सहज पाहू शकता.
⚠️ कृपया वरील प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करा.
संकलित १ (PAT २) च्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे n ने दि १७/०२/२०२६ रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
डिजिटली स्वाक्षरीत दिनांक
प्रति,
१. प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
४. प्रशासन अधिकारी (म.न.पा. व न.पा. सर्व)
विषय : संकलित१ (PAT २) च्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेबाबत.
संदर्भ: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० (NEP-२०२०)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र या कार्यालयामार्फत दरवर्षी तीन वेळा नियतकालिक चाचण्या (Periodic Assessment Test - PAT) घेण्यात येतात. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना संकलित चाचणी १ (PAT २) चा विद्यार्थ्यांचा वर्ग व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) SwiftChat App वर पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या Live Report च्या आधारे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील त्रुटी व बलस्थाने ओळखता येतील. अध्ययन निष्पत्तीनिहाय इ. २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या उपचारात्मक अध्यापनासाठी व पुढील अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करण्यास मदत होईल. शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती या पर्यवेक्षकीय यंत्रणेने वर्ग भेटीदरम्यान सदरील अहवालानुसार विद्यार्थ्यांची संपादणूक पडताळणी करावी.
SwiftChat App मध्ये सदरील Live report पाहणे अथवा Download करण्यासाठी Bot Link / QR Code व User Manual सोबत देण्यात येत आहेत. सदरील बाब सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी.
User Manual - https://tinyurl.com/LiveReportUsermanual
Bot Link: https://links.swiftchat.ai/v7VpX7
QR Code:
Digitally signed by HEMANT SHARACHCHANDRA VASEKAR Date: 17-02-2026 14:21:50
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments