पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशाचे किमान वय निश्चित करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक दहा मार्च 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय शासन निर्णय दि. १८ सप्टेंबर, २०२० नुसार प्ले ग्रुप, नर्सरी, इ. १ली पूर्वीचा तिसरा वर्ग किमान वय ३+ व याबाबत मानीव दिनांक डिसेंबर व इयत्ता पहिलीसाठी ६+ वयाबाबत मानीव दिनांक ३१ डिसेंबर हा निश्चित करण्याचे निर्देश आहेत परंतु माहिती अधिकार नागरी समूह या संस्थेने दिनांक ०३-०२-२०२५ नुसार उपरोक्त शासन निर्णयाचे पुणे जिल्हयातील शाळा पालन करत नसल्याचे तक्रार दाखल केल्या आहेत.
तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने व शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय याची अंमलबजावणी करणे बाबत शाळांना सक्त ताकीद देण्यात यावी शाळा शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसतील तर शाळांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी.
सोबत :- माहिती अधिकार नागरिक समूह यांचा तक्रार अर्ज,
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत :- अध्यक्ष, ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह वडगाव शेरी, पुणे
सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दि १०/०१/२०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशा नुसार पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१, दि. २५-०७-२०१९
२. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दि. १८-०९-२०२०.
उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. १८-०९-२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानवीन दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. संदर्भीय शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चत करण्यात येत आहे.
प्रवेशाचा वर्ग
किमान वय वर्ष
वयाबाबत मानीव दिनांक
प्ले ग्रुप / नर्सरी (इ. १ली पूर्वीच्या ३ रा वर्ग)
३+
३१ डिसेंबर
इयत्ता १ ली
६+
३१ डिसेंबर
शासन निर्णय दि. २५-०७-२०१९ नुसार शाळा प्रवेशासाठीचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे. तरी उपरोक्त प्रमाणे आरटीई २५ टक्के सन २०२५-२६ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून निर्गमित दिनांक 22 फेब्रुवारी 2014 रोजीच्या परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत परिपत्रक पुढील प्रमाणे.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या श निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्ष नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनां डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय
नर्सरी मध्ये प्रवेश घेण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत बालकाचे वय तीन वर्षे पूर्ण असावे.
ज्युनिअर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाची वय 31 डिसेंबर 2024 पर्यंत चार वर्ष पूर्ण असावे.
सिनियर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत पाच वर्षे पूर्ण असावे.
तर इयत्ता म्हणजेच वर्ग पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत सहा वर्षे पूर्ण असावे.
प्राथमिक शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी यांचे सहिनिशी सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेली आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
तर इयत्ता म्हणजेच वर्ग पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत सहा वर्षे पूर्ण असावे.
ReplyDeleteYes!
Delete