दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करणेबाबत महत्त्वाचा आदेश व लिंक..

 दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करणेबाबत  महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला.


दिव्यांग सहाय्यक पोर्टल लिंक.

https://divyangsahayak.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र शासन

दिव्यांग सक्षमीकरण विभाग,

३१, ३२, ३५ए, मित्तल टॉवर, ए-विंग, तिसरा मजला, बॅरीस्टर रजनी पटेल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-०२१.

दूरध्वनी क्र.- ०२२-४०१४५१७६

Email ID: vinayak.baswant@nic.in

क्रमांक : संकिर्ण-२०२६/प्र.क्र. ०१/कार्यासन -३

दिनांक : १५ एप्रिल, २०२६


प्रति,

१. अध्यक्ष / सचिव, अनाथ मतिमंद बालगृहे, (सर्व)

२. प्रकल्प समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, (DDRC) (सर्व)

३. अध्यक्ष / सचिव, पुनर्वसन गृहे, (Half Way Home) (सर्व)

४. अध्यक्ष / सचिव, नमो दिव्यांग पुनर्वसन केंद्र, (सर्व)

विषय:- दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करणेबाबत.

२. राज्यात दिव्यांगांना विविध शासकिय योजनांचा लाभ देणे तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी उपरोक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येतात. सदर उपक्रमांमध्ये लाभ घेण्याऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रीत करणे आवश्यक आहे. विभागाकडुन दिव्यांगांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्याकरिता तसेच दिव्यांगांना सुलभतेने लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी "दिव्यांग सहायक" हे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रीत स्वरुपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रांमध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी दिनांक ३० एप्रिल, २०२६ पर्यंत सदर पोर्टलवर करण्यात यावी. तसेच आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनास उपलब्ध करुन देण्यात यावी, ही विनंती.


विबसवंत (वि. वि. बसवंत) 

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, ३ चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रकरणी माहिती संकलीत करुन सदर माहिती दिनांक ५ मे, २०२६ रोजीपर्यंत शासनास सादर करावी, ही विनंती.

२. सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, सर्व जिल्हे, आपणांस कळविण्यात येते की, उपरोक्त प्रकरणी आपल्या जिल्ह्यातील संबंधित कार्यालयांशी संपर्क साधून सदर माहिती दिनांक १ मे, २०२६ रोजीपर्यंत आयुक्तालयास उपलब्ध करुन द्यावी.

दिव्यांग सहाय्यक पोर्टल लिंक.

https://divyangsahayak.maharashtra.gov.in/



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.