बालचित्रकला स्पर्धा 2026 शाळेची ऑनलाईन नोंदणी लिंक वेळापत्रक परिपत्रक

 महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई कार्यालयातून निर्गमित दिनांक 19 जून 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार बालचित्रकला स्पर्धा 2026 बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहे. 


क्रमांक कशिमं/२०२६/पाच / 972

दिनांक : 19 JUN 2026

वाचावे: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक एडीआर-२०२५/CN-११८२७३२/प्र.क्र.७४/तांशि-६, दिनांक १४ जुलै, २०२५.

परिपत्रक

संदर्भीय शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या https://balchitrakala2026.msbae.in लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे.

गट

पहिला

पहिली व दुसरी

स्पर्धा प्रवेश शुल्क

दुसरा

तिसरी व चौथी

 तिसरा

पाचवी, सहावी व सातवी

चौथा

आठवी, नववी व दहावी

प्रति विद्यार्थी रु.२०/- या रक्कमेमधून ड्रॉईंग कागदाचा

(११ इंच X १५ इंच या आकाराचा) खर्च रु.५/- वजा करुन उर्वरीत रक्कम रु.१५/- प्रति विद्यार्थी मंडळाकडे ऑनलाईन जमा करावी.

शाळेची नोंदणी व विद्यार्थी नोंदणी कालावधी तपशील.

पासून

पर्यंत

बालचित्रकला स्पर्धेकरिता संबंधित केंद्र / शाळा ऑनलाईन नोंदणी

दि.०१.०७.२०२६

दि. ३१.०७.२०२६

बालचित्रकला स्पर्धेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याची नोंदणी

दि.०१.०७.२०२६ 

दि. ३१.०७.२०२६

ऑनलाईन पध्दतीने करणे. (संबंधित केंद्र / शाळा मार्फत)

३ परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने स्वीकारणे

दि.०२.०७.२०२६

दि. ३१.०७.२०२६

मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक ऑनलाईन नोंदणी शाळेमार्फत करावी. बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर भरावयचा आहे. सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय निदर्शनास आणावा.


(विनोद रं. दांडगे)

संचालक,

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

प्रति,

१) केंद्र प्रमुख (सर्व), शासकीय रेखाकला परीक्षा २०२६.

२) मुख्याध्यापक / प्राचार्य (सर्व), जिल्हा परिषद/नगरपालिका/महानगरपालिका/अनुदानित/ विनाअनुदानित

प्राथमिक व माध्यमिक शाळा.

प्रत :- माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

१) अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

२) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

३) सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

४) उप सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई/नागपूर/छत्रपती संभाजीनगर,

५) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे.

७) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

६) आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे.

८) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व).

९) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / (प्राथमिक), जिल्हापरिषद (सर्व)

१०) शिक्षणाधिकारी, नगरपालिका/महानगरपालिका (सर्व)

११) शिक्षण निरीक्षक (दक्षिण/उत्तर/पश्चिम), बृहन्मुंबई.

१२) प्राचार्य, संगीत आणि कला अकादमी, कला विभाग, बृहन्मुंबई महानगर पालिका, शिक्षण विभाग, मुंबई.

१३) निवड नस्ती


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.