जिल्ह्यातील शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ने दि: 24 FEB 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळामार्फत (PAB) प्राप्त मंजुरीनुसार राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये (इयत्ता ९ वी ते १२ वी) व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.
तथापि, जिल्ह्यांतर्गत काही नवीन शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू न झालेल्या शाळांमध्ये ही योजना कार्यान्वित करावयाची आहे. सदर शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करणे अत्यावश्यक असून त्यासाठी पुढील बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे. व्यवसाय शिक्षणासाठी स्वतंत्र व योग्य वर्गखोली उपलब्ध असणे आवश्यक आहे. व्यवसाय शिक्षणाची निवड करताना हिंदी/समाजशास्र हे पर्यायी विषय असणार आहेत. एका सेक्टरसाठी किमान ४० विद्यार्थी आवश्यक असून, दोन सेक्टर राबवावयाचे असल्यास किमान ८० विद्यार्थ्यांची संख्या असणे आवश्यक आहे. उपलब्ध विद्यार्थी संख्या व शाळेच्या सुविधांचा विचार करून योग्य त्या व्यवसाय सेक्टरचा विकल्प निवड करण्यात यावा.
या अनुषंगाने, अशा शाळांसाठी जिल्हा स्तरावर गरजाधारित अभ्यास (Need Based Analysis) करून तसेच जिल्हा कौशल्य विकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधून व्यवसाय सेक्टर/विषय निवडीचे प्रस्ताव सादर करण्यात यावा.
शाळा व परिसराची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती
स्थानिक उद्योग, सेवा क्षेत्र व रोजगार संधी
विद्यार्थ्यांची मागणी, प्रवेश व उपस्थिती स्थिती
प्रस्तावित नवीन व्यवसाय विषयाची उपयुक्तता
आवश्यक पायाभूत सुविधा
तरी, जिल्हा/मनपा यांना शाळेत व्यवसाय शिक्षण सुरू करण्याबाबत आवश्यक माहिती, उपलब्ध वर्गखोली, विद्यार्थी संख्या, प्रस्तावित व्यवसाय सेक्टर विषय यांची माहिती तात्काळ संकलित करून सादर करावी, जेणेकरून जिल्हा/मनपातील शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ भविष्यात प्रभावीपणे घेता येईल. सदर माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच सदरची माहिती सोबतच्या https://forms.gle/kwVwUNTAmU3cxgNc8 लिंकद्वारे भरून सादर करावी. व्यवसाय शिक्षण अंतर्गत सेक्टर निहाय यादी सोबत पाठविण्यात येत आहे.
उपरोक्त माहिती दिनांक २२/०२/२०२६ पर्यंत mpspvocational@gmail.com या ईमेल वर उपलब्ध करून देण्यात यावी तद्नंतर येणारे माहितीचा विचार केला जाणार नाही.
(संजय डोलीकर)
उपसंचालक (प्रकल्प/प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


2 टिप्पण्या
27041105703
उत्तर द्याहटवाIata naresh morkhade
उत्तर द्याहटवा