प्रजासत्ताक दिनानिमित्त 'असाक्षर मुक्त गावाची शपथ'/ 'साक्षरता शपथ' घेणेबाबत आदेश २२/०१/२०२६

 प्रजासत्ताक दिनानिमित्त 'असाक्षर मुक्त गावाची शपथ' घेणेबाबत राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाने दिनांक 22 जानेवारी 2019 रोजी पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. 

प्रति,

1) शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

2) शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : प्रजासत्ताक दिनानिमित्त 'असाक्षर मुक्त गावाची शपथ' घेणेबाबत...

संदर्भ: 1 

) शासन निर्णय क्रमांक: नभासाका-0322/प्र.क्र.39/ एस.डी.2, मंत्रालय, मुंबई -32 दि. 14 ऑक्टोबर, 2022.

2) शासन निर्णय क्रमांक: नभासाका 0322/प्र.क्र.39/ एस.डी.2, मंत्रालय, मुंबई 32 दि. 25 जानेवारी, 2023.

उपरोक्त संदर्भ क्र. 1 नुसार, केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क्र. 2 नुसार, सन 2022 ते 2027 पर्यंत चालणाऱ्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / गटस्तरीय / शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दि. 26 जानेवारी, 2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत 'असाक्षर मुक्त गावाची शपथ घेतल्यास 100% साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे.

तरी सदर 'असाक्षर मुक्त गावाची शपथ' प्रत्येक विद्यार्थ्याने घेण्याबाबत आपण आपल्या अधिनस्त यंत्रणेस आदेशित करावे. सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मेडिया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिद्धी देण्यात यावी.

सोबत : 'असाक्षर मुक्त गावाची शपथ'

(कृष्णकुमार पाटील)

शिक्षण संचालक 

शिक्षण संचालनालय (योजना) म.रा.पुणे

 सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.


"असाक्षर मुक्त गावाची शपथ" / "साक्षरता शपथ"


मी___________________

अशी शपथ घेतो/घेते की, माझे संपूर्ण कुटुंब, गाव, २६ जानेवारी २०२७ पर्यत साक्षर करेल, मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही.

मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करणेसाठी प्रचार-प्रसार करील.

मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील. राज्याचे १०० टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन.

मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल.


जय हिंद !

जय महाराष्ट्र ! !

जय उल्लास ! ! !


महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.

ई-मेल - doesecondary1@gmail.com

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२२४९१

क्र.शिसं/संकीर्ण/असाक्षर मुक्त गावाची शपथ/ए-२/विद्याशाखा/5866

दि.२२/०१/२०२६ 122 JAN 20261

महत्वाचे /कालमर्यादित/ई-मेल व्दारे

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व,

३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

विषय :- प्रजासत्ताक दिनानिमित्त "असाक्षर मुक्त गावाची शपथ" घेणेबाबत...

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्रमांक नभासाका ०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.२, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक १४/१०/२०२२

२. शासन निर्णय क्रमांक नभासाका ०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.२, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक २५/०१/२०२३

३. शिक्षण संचालक, योजना तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. शिसंयो/यो-३/नभासाका/प्र.दि. शपथ/२०२५-२६/२०९६ दिनांक २२/०१/२०२६

उपरोक्त संदर्भ क्रमांक १ नुसार केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क्रमांक २ नुसार, सन २०२२ ते २०२७ पर्यंत चालणाऱ्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/गटस्तरीय/शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत "असाक्षर मुक्त गावाची शपथ" घेतल्यास १०० टक्के साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे.

तरी सदर "असाक्षर मुक्त गावाची शपथ" प्रत्येक विद्यार्थ्याने घेण्याबाबत आपण आपल्या अधिनस्त यंत्रणेस आदेशित करावे. सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मिडीया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. असे संदर्भ क्रमांक ३ च्या योजना संचालनालयाच्या पत्राव्दारे कळविण्यात आलेले आहे. (सोबत संदर्भ क्रमांक ३ चे पत्र व "असाक्षर मुक्त गावाची शपथ" / साक्षरता शपथेचा नमुना जोडला आहे.)

त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रातील सूचना निदर्शनास आणून "असाक्षर मुक्त गावाची शपथ" घेणेबाबत संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.


 (डॉ. महेश पालकर)

 शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत : १. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. यांना माहितीस्तव सविनय सादर.

२. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीसाठी सादर.


वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.