नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतीकारी विचार राज्यातील जनतेला, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) कार्यलयाने दि ९ जानेवारी २०२६ रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
१. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.०५/एस.डी. ४ दिनांक ७/०१/२०२५
२. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/शा.प./२२७०५/२०२५ /००२२८ दि.१६/०१/२०२५
३. संचालनालयाचे पत्र क्र. शिसं/संकीर्ण/२०२५/ए-२/विद्या शाखा/३३५/दि.२२/०१/२०२५.
४. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.०५/एस.डी.४ दि. २४/१२/२०२५.
उपरोक्त संदर्भिय शासन पत्र क्रमांक ४ चे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करून राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता शासनपत्रातील सूचना संबंधितांच्या निदर्शनास आणून नियमानुसार उचित कार्यवाही करावी. असे संदर्भ क्रमांक १ च्या शासनपत्राव्दारे सूचित करण्यात आलेले होते.
संदर्भ क्रमांक ४ च्या पत्राव्दारे शासनाने सदर माहिती मागविलेली असून सदर माहिती सादर करण्यात यावी व त्याअनुषंगान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करुन राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता नियमोचित कार्यवाही करण्यात यावी.
(डॉ. सुचिता पाटेकर)
शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव :-
१. मा. आयुक्त, (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. श्रीमती. मृणाली काटेंगे, कक्ष अधिकारी, (एस. डी. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.




0 Comments