पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण- २०२५/प्र.क्र. ९३३ (१)/टीएनटी-१ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक: २० जानेवारी, २०२६.
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. पीआरई-१७१३/(८६/१३)/प्राशि-५, दि. १९.०६.२०१३.
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र. १४९/टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९.
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र. १०६/टीएनटी-१, दि. १०.११.२०२२.
४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ५०९/टीएनटी-१, दि. १३.१०.२०२३.
प्रस्तावना :
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपध्दती संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. यातील बहुतांशी तरतूदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पध्दतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या. तथापि, काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतूदी अधिक्रमित करुन सुधारित तरतूदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :
खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीशी संबंधित तरतूदी अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतूदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
१. शासन निर्णय
दि. १३.१०.२०२३ मधील परिच्छेद क्र.२
करावयाची लागू करावयाची सुधारित तरतूद
विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पर्दासाठी पात्र राहील. उमेदवारास पुर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल.
उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल
शासन निर्णय, दि. ०७.०२.२०१९ मधील परिच्छेद ५.७
इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन सात दिवसाच्या आत्त अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करुन प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील.
इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या आपल्या दिनांकापासून अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करुन प्राधान्यक्रम देऊ शकतील.
अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि, उमेदवारास त्याच्या सोईनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल
शासन निर्णय १०.११.२०२२ मधील परिच्छेद ३.१
पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल.
४. शासन निर्णय १९.०६.२०१३ दि. मधील परिच्छेद १ (३)
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरीता (इ. १ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-आरटीई-२०१०/प्र.क्र. ५७२/प्राशि-१, दि. १३ फेब्रुवारी, २०१३ मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पध्दती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील..
इयत्ता १ ली ते ५ वी, इयत्ता ६ वी ८ वी व इयत्ता ९ वी १० वी या गटांसाठी त्या त्या माध्यमांच्या शाळांकरीता शिक्षक उपलब्ध करुन देतांना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या त्या शाळांचे माध्यम जसे की, मराठी, पूर्व, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी.
इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरीता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र १२ वी विज्ञान किंवा बी.ए./एम.ए. इंग्रजी किंवा बी.एस्सी/एम.एस्सी अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे.
२. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ नुसार करावयाच्या पदभरतीसंदर्भातील स्विकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी, तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी नुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील.
३. संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयातील तरतूदी तसेच या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतूदी ह्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करु इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१२०१२३९०२९५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by ABASAHEB ATMARAM KAWALE Date: 2026.01.20 12:40:33 +05'30'
(आबासाहेब कवळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करणे बाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
प्रस्तावनाः
सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्हयात काम करावे लागते. तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते. तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शुन्य सेवाजेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांना स्वतः च्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करुन देणे आवश्यक आहे. जेणेकरुन, विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन, शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल, या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करुन जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करुन शिक्षक भरतीची उचित कार्यपध्दती सूचविण्याकरीता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे:
शासन निर्णयः
राज्यात जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे अभ्यास गट गठीत करण्यात येत आहे:-
१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
अध्यक्ष
२. उपसचिव (शिक्षक व शिक्षकेत्तर), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
:- सदस्य
३. संबधित उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
:- सदस्य
. संबधित उपसचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ४
:- सदस्य
५. संबधित उपसचिव, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, मंत्रालय, मुंबई
६. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
:- सदस्य
७. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
:- सदस्य सचिव
आयुक्त, शिक्षण यांना सदर अभ्यासगटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील.
०२. समितीची कार्यकक्षाः-
प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करुन विभाग वा जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरीता आयुक्त (शिक्षण) यांनी सूचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करुन सुयोग्य कार्यपध्दतीची शिफारस करणे.
०३. कालावधी :-
अभ्यास गटाने आपला अहवाल १ महिन्यात शासनास सादर करावा.
०४ खर्चासाठी तरतूद :-
सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवावा.
०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८२०१६१०२६८६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र राज्य
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments