SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत Holing Account उघडणेबाबत MPSP चे निर्देश २०/०८/२०२५

 SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत Holing Account उघडणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ने दि २०/०८/२०२५ रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 



भारत सरकारच्या दि.13.07.2023 च्या Office Memorandum नुसार केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमलबजावणीकरिता SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार भारत सरकारच्या दि.19.02.2025 च्या पत्रानुसार आणि PM SHRI करिता दि.21.04.2025 रोजी संपन्न झालेल्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकातील परिच्छेद क्र.6.9 नुसार दि.01.04.2025 पासून SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने PM SHRI व STARS या दोन्ही योजनांकरिता SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच दि.01.11.2025 पासून इतर सर्व केंद्र पुरस्कृत योजनांसाठी SNA-SPARSH प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे संदर्भ क्र.4 अन्वये नमूद करण्यात आले आहे.

या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णय दि.30.07.2025 नुसार SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-क नुसार केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत सर्व योजनांचे एकच Holding Account उपडण्याचाबत पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. होल्डिंग खाते उघडणी सर्व राज्य संलग्नित योजना एकत्रित हाताळण्यासाठी एकच होल्डिंग खाते उघडणे आवश्यक (विशेष सूचना-होल्डिंग खात्यात फक्त वजावटीसबंधित रक्कम वर्ग करणे, इतर कोणतीही रक्कम वर्ग करू नये।

तरी यानुरूप आपणास कळविण्यात येते की, समग्र शिक्षा, STARS, PM SHRI, PM JANMAN व इतर केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत SNA-SPARSH प्रणालीच्या अंमलबजावणीकरिता आपल्या अधिपत्याखालील सर्व अंमलबजावणी यंत्रणा (Implementing Agencies) म्हणजेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, BRC, URC, CRC, SMC, KGBV, नेताजी सुभाष आवासी विद्यालय इ. करिता कोणत्याही Nationalized/Schedule Conunercial कित Holding Account उपहुण्याबाबतची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याचाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.


 (संजय यादव, भा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी,

1 विभागीय शिक्षण उप संचालक, मुंबई विभाग, मुंबई.

2. उप संचालक (प्रकल्प/प्रशा), मप्राशिप, मुंबई,

3. मुख्य अभियंता (प्रकल्प), मप्राशिप, मुंबई.

4. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

5. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.