शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे! शासन निर्णय ३०/१२/२०२५

 शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


वाचा :

आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/प्राथ १०६/पवित्र-पोर्टल- पदभरती/२०२५/१५०३६०९, दि.१९.१०.२०२५.

प्रस्तावना :

आयुक्त (शिक्षण) कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे. सन २०१७ पासून या कार्यालयांतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पदभरतीची कार्यवाही वेळोवळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्व-प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देणे, जाहिराती स्विकारणे त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय, प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या-त्या प्रवर्गासाठीचा कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात. त्यामुळे आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचा बहुतांशी वेळ या कामासाठी खर्च होत आहे. परिणामी इतर महत्वांच्या धोरणांच्या व निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरित परिणाम होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळले आहे. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरुप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेणेबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे सुकाणू समितीचे गठन करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे -

अ.क्र.

पदनाम 

सुकाणू समितीतील पदनाम

१. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे अध्यक्ष

२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे सदस्य

३. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व सदस्य प्रशिक्षण परिषद, पुणे

४. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) सदस्य शिक्षण संचालनालय, पुणे

५. शिक्षण संचालक, (प्राथमिक) शिक्षण सदस्य संचालनालय, पुणे

६. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे सदस्य-सचिव

२. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चचाणी सन २०२५ नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपविण्यात येत असून, उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे.

३. पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप व त्यानुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१२३०११३११६२२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


Digitally signed by ABASAHEB ATMARAM KAWALE Date: 2025.12.30 11:33:02 +05'30'

(आबासाहेब कवळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

वरील संपूर्ण शासन आदेश PDF स्वरूपात करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.