शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांची थकबाकी देयके बाबत महत्त्वाचे परिपत्रक.

 शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांची थकबाकी देयके बाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

संदर्भ शासन पत्र क्र. वेतन-११२५/प्र.क्र.१०७/टिएनटी-३ दि. २६/९/२०२५

उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्राची प्रत सोबत जोडली आहे. उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्रान्वये शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांचे वेतन आयोगानुसार थकवाकी देयके, तासिका तत्वावरील/रजा कालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करण्याबाबत बहुतेकदा मार्गदर्शनार्थ प्रस्ताव शासनास प्राप्त होत असतात. २. याकोरता जिल्हानिहाय असे किती शालार्थ आयडी नसलेले कर्मचारी आहेत ज्यांचे वेतन आयोगानुसार थकबाको देयके, तासिका तत्वावरील/रजाकालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक/कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करावयाची आहे याची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव सादर

करणेवावत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहे. सवव संदर्भिय शासन पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विभागातील जिल्हानिहाय असे किती शालार्थ आयडी नसलेले कर्मचारी आहेत ज्यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील/रजाकालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक/कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करावयाची आहे याची कर्मचारी निहाय माहिती सोवतच्या विवरणपत्रामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आपल्या भागाची जिल्हानिहाय माहिती संकलित करून तात्काळ संचालनालयास सादर करावी. शासनास माहिती सादर करावयाची असल्याने प्रथम प्राधान्याने कार्यवाही करावी.


Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI 

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत :- माहितीस्तव.

१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

२. श्रीमती. स्नेहा चुरी, अवर सचिव, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२


शालार्थ आय. डी. नसलेल्या कर्मचा यांची थकबाकी देयके सादर करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

महोदय,

शालार्थ आय. डी. नसलेल्या कर्मचा-यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील / रजा कालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक / कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करण्यावावत बहुतेकदा मार्गदर्शनार्थ प्रस्ताव शासनास प्राप्त होत असतात.

२. याकरिता जिल्हानिहाय असे किती शालार्थ आय. डी. नसलेले कर्मचारी आहेत ज्यांचे उपरोक्त नमूद व तदनुषंगिक प्रकारांमध्ये ऑफलाईन देयके सादर करावयाची आहेत याची माहिती संकलित करणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने आपण तातडीने स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सविस्तर प्रस्ताव सादर करावा, ही विनंती.

आपली, सूरी

(स्नेहा चुरी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत - आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे


वरील दोन्ही परिपत्रके पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.