सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ : १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक ३०.०५.२०२५
२. शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टिएनटी-२, दिनांक १५.०३.२०२४
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येत आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे. त्यानुसार युडायस प्लस पोर्टल वरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी. संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यु-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक ३०.०५.२०२५ रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या.
२/-सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून संच मान्यता करण्यात येणार आहेत. दिनांक ३०.०९. २०२५ नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राहय धरण्यात येणार नाही.
३/- सन २०२५-२६ या वर्षाची संच मान्यता करताना ३० सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरुप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी.
४/-शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेर किंवा दिनांक ३०.०९.२०२५ च्या तत्पुर्वी पूर्ण करण्यात यावेत. अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी.
(महेश पालकर)
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक
महाराष्ट्र राज्य, पुणे.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे,
प्रत : मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई ३२ यांना माहितीस्तव सविनय सादर
प्रतः मा.आयुक्त शिक्षण, आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर
प्रत: विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (सर्व) कार्यवाहीस्तव
वरील आदेशानुसार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर आधार व्हॅलिड असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच 2025 26 ची संचमान्यता होणार आहे!
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments