राज्यातील इ.१ ली ते १२ वी मध्ये शिकणा-या एकल मातांच्या मुलांची माहिती Google Sheet मध्ये भरुन तात्काळ सादर करणेबाबत आदेश

 राज्यातील इ.१ ली ते १२ वी मध्ये शिकणा-या एकल मातांच्या मुलांची माहिती Google Sheet मध्ये भरुन तात्काळ सादर करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 07/11/2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ :

- १) शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-३८२५/प्र.क्र. ०१/एसडी-२. दि.१३ ऑक्टोबर, २०२५ (सहपत्रांसह)

२) शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आशिका-२०२५/आस्था-क-माध्यमिक, दि.३१/१०/२०२५

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भिय पत्रांचे अवलोकन करावे. (प्रती संलग्न)

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये महाराष्ट्रातील एकल मातांची आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. सदर महिला या मजुरी करुन जगतात व त्यांच्या मुला मुलींची शिक्षण करतांना त्यांना खुप कठीण जाते. त्यामुळे अनेकदा या महिला त्यांच्या मुला-मुलींना शाळेतून काढून घेतात. त्यामुळे शिक्षण विभागातील या मुला-मुलींची संख्या संकलित करुन या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

करीता आपल्या स्तरावरुन इ. १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुला मुलींची संख्या मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या निर्देशानुसार संकलित करुन सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार शासनास करावयाची आहे. तरी राज्यातील इ.१ ली ते १२ वी मध्ये शिकणा-या एकल मातांच्या मुलांची माहिती सोबत देण्यात आलेल्या Google Sheet मध्ये भरुन (Soft Copy) तसेच Hard Copy स्वाक्षरीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ संचालनालयास सादर करावी. माहिती भरण्यासाठी Google Sheet ची Link खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

https://docs.google.com/spreadsheets/d/1kzGfxs65G_0kJzGxujzwgkL57jK_0Azr1PglJhm0KE8/edit?gid=0#gid=0


सहपत्र - संदर्भिय पत्र Google Sheet च्या लिंकसह


Digitally signed by

Sharad Shankargiri Gosavi Date: 07-11-2025 14:54:44 

(शरद गोसावी) 

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे प्रत माहितीस्तव कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई


वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.