Lesson Plan Update - दैनिक पाठ टाचण काढण्याची सक्ती न करणे बाबत शासन निर्णय, MSCERT चे परिपत्रक व शिक्षणाधिकारी यांची पत्रे

विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी दिनांक आठ जुलै 2025 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार पाठ टाचण लेसन प्लॅन सादर करण्याची सक्ती न करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ :-

मा. श्रीकांत देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य, माजी राज्यमंत्री दर्जा यांचे पत्र क्रमांक/एकसएमएलसी/बीबी-२७७१/७९६७/२०२५, दिनांक ०७.०७.२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन पाठ टाचण (लेसन प्लॅन) सादर करण्याची सक्ती न करणेबाबत मा. श्रीकांत देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य, माजी राज्यमंत्री दर्जा यांचे पत्र कार्यालयास प्राप्त झालेले आहे सदर पत्राची प्रत आपणांस पुरविण्यात येत असुन पत्रात नमूद शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी.


सहपत्र : वरील प्रमाणे


(निलीमा टाके)

शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग, अमरावती


प्रतिलीपी :-

मा. श्रीकांत देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य, माजी राज्यमंत्री दर्जा द्वारा तंत्र शिक्षण विद्यालय, वॉलकट कंपाऊंड, अमरावती यांना माहितीस्तव सादर.




दैनिक पाठ टाचण काढण्याची सक्ती न करणे बाबत शासन निर्णय, MSCERT चे परिपत्रक व शिक्षणाधिकारी यांची पत्रे.


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे सहसंचालक यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्याची सक्ती न करण्याबाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.

सदर परिपत्रकामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व यांना आपल्या अधिनिस्त सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मधील मुख्याध्यापक यांना अवगत करावे असे निर्देश देखील दिलेले आहेत.


वरील पाठ टाचण सक्तीचे न करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.

Download


वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या परिपत्रकात नमूद संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 13(1) ते मुद्दा क्रमांक 13(4) पुढील प्रमाणे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 22 जून 2015 रोजीच्या शासन निर्णयातील पाठ टाचण वार्षिक नियोजन व मानसिक नियोजन या संदर्भात पुढील प्रमाणे उल्लेख दिसून येतो.



महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 22 जून 2015 रोजीच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम बाबत संपूर्ण वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.

Download


वरील दोन्ही पत्रांचा संदर्भ घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी पाठ टाचण काढण्याची सक्ती न करणे बाबत पुढील प्रमाणे पत्रनिर्मित केले आहेत.

शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी वरील दोनही पत्रांचा संदर्भ देऊन दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्याची सक्ती न करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


वरील पत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी देखील सदर पत्र व शासन निर्णय यांचा संदर्भात येऊन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना काढण्याची सक्ती न करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.




वरील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्याची सक्ती न करणे बाबत पत्र संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांनी देखील शिक्षकांना काढण्याची सक्ती न करण्याबाबत दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


वरील शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांची पाठ टाचण सक्तीने करणे बाबतचे संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.