स्वच्छोत्सव विशेष मोहिम २०२५ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगकाम (White Washing/Painting work) करुन घेणेबाबत

 स्वच्छोत्सव विशेष मोहिम २०२५ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगकाम (White Washing/Painting work) करुन घेणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ :- केंद्र शासनाचे दि.२९/०९/२०२५ रोजीचे प्राप्त ईमेल पत्र.

उपरोक्त विषयी केंद्र शासनाचे दि.२४/०९/२०२५ रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वच्छोत्सव विशेष मोहीम ५.० चा भाग म्हणून राज्यातील शाळांना दि.३१/१०/२०२५ पर्यंत दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण करणेबाबत सूचना दिल्या असून या विषयी संदर्भीय पत्रान्वये कळवीले आहे.

या संदर्भात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या शाळांना आवश्यकतेनुसार दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण दि.३१/१०/२०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात यावे. याकरिता लागणारा निधी शासनाच्या इतर योजनेतून, CSR निधीतून, जिल्हा वार्षिक योजनेतून, संयुक्त शाळा अनुदान मधून उपलब्ध करुन कामे दि.३१/१०/२०२५ पर्यंत करुन घेण्यात यावीत, ही विनंती.


(गोविंद कांबळे)

राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन), म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रतः- माहिती व उचित कार्यवाहीस्तव.

१) शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, सर्व जिल्हे.

२) प्रशासनाधिकारी (शिक्षण), महानगरपालिका सर्व.

३) प्रशासनाधिकारी, सर्व नगरपालिका / नगरपरिषद/नगरपंचायत.

४) कार्यकारी अभियंता, समग्र शिक्षा, सर्व जिल्हे.

५) शहर अभियंता, महानगरपालिका सर्व


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.