संकलित मूल्यमापन चाचणी 1 गणित मराठी व इंग्रजी विषयाची चाचणी दुबार न घेणे बाबत SCERT स्पष्ट आदेश 24/09/2025

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


संदर्भ : १. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२५-२६/SCERT ३८.०/२९/२०२५ § EVALUATION/१/१३१९४६९/२०२५ दिनांक ०९/०७/२०२५.

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा.-१ जिल्हा पत्र/२०२५-२६/SCERT ३८.०/७२/२०२५ - EVALUATION /१/१४४२६७३/२०२५ दिनांक २३/०९/२०२५.

उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्याथ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी -१ चे आयोजन दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी एकूण दहा माध्यमात घेण्यात येणार असून संकलित चाचणी १ करीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचणी पत्रिका राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत पुरविण्यात येत आहेत.

इयत्ता २ री ते ८ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.


Digitally signed by Kamaladevi Shridhar Awate Date: 24-09-2025 18:43:56


(डॉ. कमलादेवी आवटे) 

सहसंचालक

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


अर्थात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून होणारे इंग्रजी मराठी व गणित विषयाचे पेपर हेच संकलित मूल्यमापन चाचणी म्हणून ग्राह्य धरावे वेगळे पेपर न घेता हेच गुण प्रथम सत्र परीक्षा चे गुण म्हणून ग्राह्य धरावे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.