विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय केला आहे.
वाचा :-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र. १३१/ एसडी-१, दि. ०७.०२.२०२४.
शासन शुध्दिपत्रक :-
संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे:-
"सदर बाबीसाठी "मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८०० इतर खर्च, (००) (१०) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे (२२०२६७९), (कार्यक्रम), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)" आणि "मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, (०२) (५१) ई-गर्व्हनन्स (कार्यक्रम) २२०२एच४५४, ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)" या लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल."
याऐवजी
"सदर बाबीसाठी "मागणी क्र. ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१-प्राथमिक शिक्षण, ००१, संचालन व प्रशासन (००) (००) (०१) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, (२२०२८०६६) या लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल.", असे वाचण्यात यावे.
२. सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०९२३१२०३५७१९२१ असा आहे. हे शासन शुध्दिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by Aniruddha Avinash Kulkarni Date: 2025.09.23 15:04:35 +05'30'
(अ. अ. कुलकर्णी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र. १३१/ एसडी-१, दि. ०७.०२.२०२४ संदर्भित शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
प्रस्तावना :
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची राज्यात एप्रिल, २०१० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक मुलांस गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी राज्यात दिनांक २२ जुन, २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. त्यानुसार वर्गातील शैक्षणिक वातावरण उत्साही, आनंदी आणि सतत क्रियाशील ठेवणारे तसेच वर्गामध्ये फक्त श्रवणावर भर न देता प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून प्रात्यक्षिकरुपाने शैक्षणिक साहित्य माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील उद्दीष्टे साध्ये करण्यात येत असुन विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी शासनाची आहे. शाळांना उत्कृष्ट भौतिक/पायाभूत सुविधांसह आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देऊन मुलांना २१ व्या शतकातील प्रमुख कौशल्यांवर आधारीत सर्वांगीन विकास करणे व त्यांना सर्वगुणसंपन्न व्यक्ती घडविण्यावर भर आवश्यक आहे. या अनुषंगाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कृतियुक्त अध्ययन-अध्यापन पध्दती, सराव परीक्षा/कल चाचण्या, मुल्यमापन, संगणकीय शिक्षण, प्रशिक्षण व ई-गर्व्हनन्स अंतर्गत कामकाजासाठी IDEAL Center (Interactive Digital, Experimental, Administration & Learning Center) विकसीत करण्यात आलेले आहे. सदर IDEAL Center हे शाळा व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
प्रस्तुत बाब विचारात घेऊन शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भाधीन दिनांक २४/०४/२०२३ च्या पत्रान्वये IDEAL Center (Interactive Digital, Experimental, Administration & Learning Center) शाळांमध्ये स्थापित करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव निविदा प्रारुपासह मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या दिनांक २९/१/२०२४ रोजी संपन्न झालेल्या १७१ व्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सबब, शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी प्रस्तावित केल्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने IDEAL center स्थापित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक केंद्र शाळा आदर्श शाळा आणि पीएमश्री शाळा मिळून एकुण १५०० शाळांमध्ये IDEAL Center (Interactive Digital, Experimental, Administration & Learning Center) स्थापित करण्यास व यासाठी रुपये ४८० कोटी इतक्या मर्यादेत निधी उपलब्ध करुन देण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. शाळेची पटसंख्या विचारात घेवून शासन स्तरावरून शाळांची निवड करण्यात येईल.
२. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक १ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयातील नमूद तरतुदींचे व विहीत खरेदी नियमावलीचे पालन करुन सदर IDEAL Center करीता ई-निविदा प्रक्रिया राबवावी.
३. सदर बाबीसाठी "मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८००-इतर खर्च, (००) (৭০) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे (२२०२५६७९), (कार्यक्रम) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)" आणि "मागणी क्र.ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, (०२) (५१) ई-गर्व्हनन्स (कार्यक्रम) २२०२एच४५४, ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. वित्त विभागाचे निर्देशानुसार अर्थसंकल्प कार्यासनामार्फत प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत निधीचे वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. वित्त विभागाने परिपत्रक दिनांक १२.०४.२०२३ अन्वये निधी वितरण व खर्चासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
४. यासाठी उपसचिव/सहसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना "नियंत्रक अधिकारी" आणि कक्ष अधिकारी/अवर सचिव (रोख शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना "आहरण व संवितरण अधिकारी" म्हणुन घोषित करण्यात येत आहे. संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरचा निधी कोषागारातून आहरीत करुन शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अंमलबजावणीसाठी सुपूर्द करावा व सदरचा निधी हा दिलेल्या उद्देशासाठीच खर्च करण्यात यावा.
५. सदरचा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील भाग पहिला उपविभाग-३, अनुक्रमांक-४ परिच्छेद क्र.२७ (२) (ब) व वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३ दिनांक १२.०४.२०२३ अन्वये विभागाला प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे
६. सदर अनुदान सशर्त अनुदान असुन त्याच्या अटी व शर्ती या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. २ ते ५ प्रमाणे आहेत. तसेच यापुर्वी वितरीत केलेल्या निधीचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले आहे.
19. सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असुन त्याचा संकेतांक २०२४०२०७१७०५५९९९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
RAMDAS GANPAT DHUMAL
(रामदास धुमाळ)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ डाउनलोड
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती साठी Subscribe करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments