स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व केंद्रप्रमुख सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त विषयांन्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता यु-डायस प्लस प्रणाली मधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे. युडायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉगिन मधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरीता विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणिकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांची आहे. या करीता पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. यामध्ये अनियमितता झाल्यास तशी जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (बीट) व गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात येईल.
मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुख लॉगिनला फॉरवर्ड करण्यात आली आहे. यु-डायस प्लस कडील स्टुडंट पोर्टलवर प्राप्त झालेली माहिती केंद्रप्रमुख यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असलेली विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिल्या असल्यास त्या दिवशीची दैनिक उपस्थिती या सर्वांचा विचार करुन केंद्रप्रमुखांनी त्यांच्या लॉगिनमधून बनावट विद्यार्थी किंवा सतत गैरहजर असणारे किंवा केवळ शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढविलेले पट इ. सारखे विद्यार्थी संच मान्यते करीता फॉरवर्ड होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
प्रणालीवरील प्रवेशित विद्यार्थी पैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाले असल्याचे निदर्शनास आल्यास असे विद्यार्थी केंद्रप्रमुखांनी कमी करून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला फेरफडताळणीसाठी वर्ग करावेत.
गटशिक्षणाधिकारी यांनी फेरफडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुनश्चः पडताळणी करून व नमूदविद्यार्थी यांची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करण्यात यावी. जो विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहेत, असे विद्यार्थी कमी करावेत. सदरची पडताळणी दिनांक १५.१२.२०२५ पूर्वी अंतिम करणे आवश्यक आहे.
राज्यस्तरावरुन राज्यात एकाचवेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याने सदर पडताळणीअंती अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 21-1922:10
शिक्षण संचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar
Date 20:31:47 '
शिक्षण संचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक
संचमान्यता सन 2025-26 मुख्याध्यापक यांनी करावयाची कार्यवाही
टप्पा क्र. 1 - शाळा लॉगीन
https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4
मुख्याध्यापक यांनी सरल पोर्टल वर शाळा लॉगीन करून प्रत्येक इयत्तेचे मेडीयम, सेमी इंग्रजी प्रकार, अनुदान प्रकार टाकून एक एक इयत्ता अंतीम करावी व शेवटी सर्व इयत्ता भरणे झाल्यास ती स्क्रिन अंतीम करावी.
टप्पा क्र. 2 - Student Login
https://student.maharashtra.gov.in/studentportal/users/login
मुख्याध्यापक यांनी सरल पोर्टल वर Student लॉगीन करून Forward Sanchmanyta या टॅब वर जावून इयत्ता निहाय विदयार्थी संख्या UDISE Portal वरून प्राप्त झालेली असेल त्याची खात्री करून ती Forward करावी.
टप्पा क्र. 3 - Sanchmanyta portal Login
https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
मुख्याध्यापक यांनी सरल पोर्टल वर Sanchmanyta लॉगीन करून
Step no 1 - Basic Sanchmanyta या टॅब वर जावून प्रथम Basic Information या टॅब वर शाळेचा खालचा वर्ग, शाळेचा वरचा वर्ग, उपलब्ध वर्गखोली 1 ते 5 उपलब्ध वर्गखोली 6-8 या बाबत खात्री करावी यात दूरूस्ती आवश्यक असेल तर शाळेच्या UDISE PORTAL वर आवश्यक ती दुरूस्ती करावी. सदरील दुरूस्ती UDISE PORTAL वर झाल्यानंतर काही तासांनी ती माहिती या ठिकाणी अपडेट होईल त्यानंतर ती अंतीम करावी.
Step no 2- याच पोर्टल वरील 02 री टॅब Working post मध्ये Fetch Data करावा या ठिकाणी शाळेच्या शालार्थ पोर्टल वरील कार्यरत शिक्षक संख्या घेतली जाईल त्याची खात्री करावी व बरोबर असल्यास Finalize करावी.
यात जर चुकीची कार्यरत संख्या दाखवत असेल तर आपले शालार्थ समन्वयक यांचेशी संपर्क करावा व Post mapping पक्रिया पूर्ण झाल्याची खात्री करावी.
सन २०२५-२६ च्या (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक) संचमान्यता, स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल वर मुख्याध्यापक Loging वरुन माहिती अद्ययावत करणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त विषयांकित प्रकरणी सन २०२५-२६ ची प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक ऑनलाईन संचमान्यता निर्गमित करण्यासाठी इ १ ली ते १० वी व इ. ११ वी ते १२ वी च्या शाळा/वर्ग तुकडयांचे अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापनाबाबतची माहिती शाळांना स्कूल पोर्टलवर भरुन अद्ययावत करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना कळविण्यात येत आहे.
मुख्याध्यापक School Portel Loging करून शाळेचे मेडीयम व अनुदान प्रकार निश्चित करुन शाळा Forward करणे,
मुख्याध्यापक यांनी student Portal ला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या, अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संचमान्यतेसाठी Forward करणे,
केंद्र प्रमुख यांना Cluster मधील सर्व शाळांची माहिती दिसेल. केंद्रप्रमुख यांनी शाळा निहाय माहिती तपासणे., एखाद्या शाळेची माहिती मध्ये बदल करावयाचा असल्यास तो बदल करुन Cluster च्या शाळांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना forward करेल, बदल नसल्यास केंद्रातील शाळा Verify करुन संचमान्यतेसाठी Forward होतील
मुख्याध्यापक Loging ला Fetch बटन असेल त्यावर Click करुन शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी. सर्व तपशील बरोबर असल्यास Verity करावे.
मुख्याध्यापक यांनी Loging करुन Get School Information Button Click करावे. आलेली माहिती चेक करुनच वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे. आणि युडायस प्लस मधील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास माहिती दुरुस्त करावी.-
सन २०२५-२६ या वर्षाच्या संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित चर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीकडून घेतली जाणार आहे. एकपेक्षा अधिक
माध्यमाची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करावी. तसेच विनाअनुदानित तत्वावर वैयक्तिक मान्यता प्राप्त व कार्यरत असलेल्या प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळास्तरावर संचमान्यता पोर्टलला टॅब मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
उपरोक्त बाबतची कार्यवाही दिनांक ०७.११.२०२५ पर्यत पूर्ण करुन घेण्यात यावी. सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन २०२५-२६ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगीनवर उपलब्ध होणार नाहीत.
सदरची कार्यवाही न केल्याने एखादया शाळेची संचमान्यता उपलब्ध झाली नाहीतर त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी,
सोबत : User Manual जोडले आहे.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक प्राथमिक
शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे
सन 2025-26 च्या संच मान्यतांबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2019 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक गृहन्मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ:
1. शासन निर्णय दिनांक 15.03.2024
2. शासन पत्र दिनांक 21.02.2025 व दिनांक 26.03.2025
3. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दि.30.05.2025
4. एनआयसी पुणे यांचे समवेत बैठक दिनांक 13.08.2025 व दि. 14.08.2025
5. शासन पत्र क्र. एसएसएन-2015/(प्र.क्र.16/15) / टीएनटी-2, दि.14.10.2025
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, मा. प्रधान सचिव, (शालेय शिक्षण विभाग) यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दि.30.05.2025 रोजी सरल पोर्टलचे एकत्रिकरणांतर्गत सरल प्रणाली व यु-डायस प्लस प्रणालीचे एकत्रिकरणाबाबत प्राप्त निर्देशानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यू-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्याची कार्यवाही सुरु आहे.
शासन पत्र दि.14.10.2025 अन्वये प्राप्त निर्देशानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात दि.20.10.2025 रोजी यु-डायस प्लस पोर्टलवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे सन 2025-26 च्या संच मान्यता जनरेट करतेवेळी शा.नि.दि.25.08.2025 अन्वये अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापनामध्ये स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर व्यवस्थापन बदल करणे आवश्यक आहे.
त्यानुषंगाने स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर सदर शाळांच्या व्यवस्थापनाबाबतची कार्यवाही आठ दिवसात करण्यात यावी. शासन निर्णय दि.25.08.2025 अन्वये अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापनाबाबतची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यास सदर शाळांच्या सन 2025-26 च्या संच मान्यता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी संच मान्यता उमेदवारी 2025 26 बाबत शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :-
१) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४
२) मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांना उद्देशून केलेले निवेदन जा.क्र.२२७५/२०२५
३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा /२०२५/टि-८/व्हीआयपी/ई-२२८३१२०, दि.०३.१०.२०२५
उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाकीत मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी यु-डायस प्लस मध्ये शिक्षक/शिक्षकेतर संच मान्यता निर्धारणासाठी विद्यार्थी पट ग्राह्य धरण्याच्या तारखेस मुदतवाढ मिळण्याबाबत मार्गदर्शनपर आदेश होण्याबाबत विनंती सदंर्भ क्र. ३ अन्वये प्राप्त झाली आहे.
२. त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येत आहे की, चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी संच मान्यता निर्धारणासाठी दि.३० सप्टेंबर रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येऐवजी, २० ऑक्टोबर रोजीची आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात यावी. तथापि, सदर सवलत ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी लागू असेल.
(आबासाहेथ कवळे)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
प्रत माहितीस्तव :
मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. श्रीकृपा कॉलनी, जगन्नाथ बाबा नगर, दाताळा रोड, ता. जि.
चंद्रपूर - ४४२ ४०१.
सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ : १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक ३०.०५.२०२५
२. शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टिएनटी-२, दिनांक १५.०३.२०२४
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येत आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे. त्यानुसार युडायस प्लस पोर्टल वरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी. संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यु-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक ३०.०५.२०२५ रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या.
२/-सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून संच मान्यता करण्यात येणार आहेत. दिनांक ३०.०९. २०२५ नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राहय धरण्यात येणार नाही.
३/- सन २०२५-२६ या वर्षाची संच मान्यता करताना ३० सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरुप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी.
४/-शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेर किंवा दिनांक ३०.०९.२०२५ च्या तत्पुर्वी पूर्ण करण्यात यावेत. अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी.
(महेश पालकर)
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक
महाराष्ट्र राज्य, पुणे.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे,
प्रत : मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई ३२ यांना माहितीस्तव सविनय सादर
प्रतः मा.आयुक्त शिक्षण, आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर
प्रत: विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (सर्व) कार्यवाहीस्तव
वरील आदेशानुसार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर आधार व्हॅलिड असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच 2025 26 ची संचमान्यता होणार आहे!
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.










4 Comments
मा.प्रदिप जाधव सर आपले मनापासून "अभिनंदन"..आपण देत असलेल्या दैनंदिन शैक्षणिक माहितीमुळे आम्हा शिक्षकांचे काम अगदी सोपे झाले आहे,संपूर्ण महाराष्ट्राला प्रदिप जाधव सर माहिती झाले आहेत,खरोखर आपल्या कार्याला आमचा "सलाम"....असेच सहकार्य मिळत राहो,हीच सदिच्छा!! कधी वेळ मिळाला तर "पिंपरी चिंचवड मनपा.विद्यानिकेतन निगडी शाळा क्र.१.निगडी पुणे ४४ या शाळेत या....आपला सन्मान करण्याची आम्हा शिक्षकांची इच्छा आहे....मुख्याध्यापक श्री.रामदास मेचे सर..!!मनापासून धन्यवाद व आपले आभार/अभिनंदन!!
ReplyDeleteThank you! 🙏
ReplyDeleteमा.प्रदिप जाधव सर आपले मनापासून "अभिनंदन"..आपण देत असलेल्या दैनंदिन शैक्षणिक माहितीमुळे आम्हा शिक्षकांचे काम अगदी सोपे झाले आहे,संपूर्ण महाराष्ट्राला प्रदिप जाधव सर माहिती झाले आहेत,खरोखर आपल्या कार्याला आमचा "सलाम"..
ReplyDeleteThank you! 🙏
Delete