राज्य शासनाने तिसरी भाषा अनिवार्य करणेबाबत अभ्यास गट नेमला आहे या पार्श्वभूमीवर या अगोदर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेले नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत परिपत्रकात सुधारणा करून दि. 3 जुलै 2025 रोजी पुढील प्रमाणे सुधारित परिपत्रक निर्गमित केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) 2024 व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र.02 येथील परिपत्रक दिनांक 05/10/2017 अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.
संदर्भ क्र.1 अन्वये निर्गमित करण्यात आलेले दि. 18/06/2025 रोजीचे या कार्यालयाचे परिपत्रक यादद्वारे रदद करण्यात येत आहे, संदर्भीय शासन निर्णयांना अनुसरुन नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने इयत्ता पहिली व दुसरीसाठी सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सुधारित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
अ. विषययोजना-
पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 नुसार विषययोजना (इयत्ता पहिली व दुसरी)
उपरोक्त संदर्भाना अनुसरुन सुधारित अभ्यासक्रमासाठी इ. 1 ली साठी विषय निहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे. तसेच एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्यासाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे.
इ. शालेय वेळापत्रक (सूचना)
1. सदर निर्देश हे इ.1 ली साठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच अंमलात येतील. इ.2 री साठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील.
2. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल. इतर वर्गासाठी त्यांच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी.
3. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक है एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.
4. वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी 2 तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे.
5. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.
6. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.
7. दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (AEP) तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त / विद्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत.
8. AEP ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तथापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.
9. आनंददायी शनिवार मधील उपक्रम, एका सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.
सोबत परिशिष्ट-अ-1,2 विषयनिहाय तासिका, परिशिष्ट-ब-1,2 नमुना वेळापत्रक.
Signed by
Rahul Ashok Rekhawar
Date: 03-07-2025 13:20:44
(राहूल रेखावार आ.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 18 जून 2025 रोजी नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तयार करण्यात आलेला आहे. सहास्थितीत संदर्भ क्र.०२ येथील परिपत्रक दिनांक ०५/१०/२०१७ अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.
संदर्भ क्र.३ येथील दि.१६/०४/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०२५-२६ पासून टण्या टप्याने करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सन. २०२५-२६ पासून इ.एली साठीच्या नवोन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संदर्भ क्र.३ येथील दि. १७/०६/२०२५ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरुन इयत्ता पहिलीसाठी (नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने) सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व केळापत्रकाषायत पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्पात येत आहेत.
सदर तरतुदी सन. २०२५-२६ पासून लागू असतील,
अ. विषययोजना-
पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ नुसार विषययोजना (इयत्ता पहिली व दुसरी)
कार्यानुभव विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल.
बनी (स्काऊट / गाईड) हा उपक्रम शाळांसाठी ऐच्छिक राहील.
आ. विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी-
इयत्ता पहिली व दुसरीसाठी वार्षिक दिवस व कालावधीची विभागणी पुढीलप्रमाणे असेल,
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ (NCT-FS) च राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ (SCE-FS) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, संदभिय शासन निर्णयांना त्याचवरोबर अस्तित्वात असणाऱ्या सूचनांना अनुसरुन सुधारित अभ्यासक्रमासाठी इ.एली साठी विषय निहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे. तसेच एकाच सत्रात भरणान्या शाळा व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्यासाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे. या स्तरासाठो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ (NCF-FS) नुसार वार्षिक ९९० तास अध्ययन होणे या बाचीची पुर्तता होण्यासाठी पाप्रमाणे वेळेचे नियोजन लागू करणे आवश्यक आहे.
इ. शालेय वेळापत्रक (सूचना)
१. सदर निदेश हे इ.१ली साठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच अंमलात येतील. इ. ररी साठी नवीन फठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील.
२.इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल, इतर वर्गासाठी त्यांच्या विधयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी. यासोचत नमुन्यादाखाल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या
क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही,
वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी २ तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी प्रात्यक्षिक-संराय असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे,
पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणान्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.
६. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्याध्यौना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.
दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (ALP) तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेष्यतिरिक्त विद्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयास करावेत.
८. AEP ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तचापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.
९. आनंददायी शनिवार मधील उपक्रम, एका सत्रात मरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणान्या शाळांना
शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.
सोबत परिशिष्ट-अ विषयनिहाय तासिका,
परिशिष्ट-अ नमुना वेळापत्रक.
Rahul Ashok Rekhawar
Date: 18-06-2025 23:23:47
(राहूल रेखावार)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments