समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीवरून Model-3 to Model-1 मध्ये Integration करण्यासाठी शाळास्तरापर्यंत प्रशिक्षण देण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयाने दिनांक 2 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीवरून Model-3 to Model- 1 मध्ये Integration करण्यासाठी शाळास्तरापर्यंत HDFC बँकेमार्फत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुसार दि.26/06/2025 ते 02/07/2025 या कालावधीमध्ये वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, गडचिरोली, नंदुरबार व पुणे जिल्हयांतर्गत जिल्हा/मनपा BRC/URC तसेच सदरील 7 जिल्हयांतर्गत एकूण 13728 शाळांमधील मुख्याध्यापक / अध्यापक यांना PFMS Model -1 कार्यप्रणालीबाबत Google Meet App वरुन ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तसेच दि. 03/07/2025 ते दि.24/07/2025 कालावधीमध्ये वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, गडचिरोली, नंदुरबार व पुणे वगळता उर्वरित सर्व जिल्हयांतर्गत जिल्हा/मनपा, BRC/URC आणि जिल्हयांतर्गत मुख्याध्यापक / अध्यापक यांना Google Meet App वरुन HDFC बँकेचे प्रतिनिधी श्री. अक्षय रणनवरे (मो. नं.9552269963) यांच्यामार्फत PFMS Model -1 कार्यप्रणालीबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोबत-ऑनलाईन प्रशिक्षणाचे वेळापत्रक व लिंक जोडली आहे.
तरी आपणास कळविण्यात येते की, आपल्या स्तरावरुन समग्र शिक्षा या योजनेशी संबंधित जिल्हा / मनपा, BRC/URC स्तरावरील अधिकारी/कर्मचारी तसेच संबंधित शाळेतील मुख्याध्यापक / सहाय्यक अध्यापक यांना सोबत जोडलेल्या वेळापत्रक व लिंक नुसार ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याबाबत निर्देशीत करण्यात यावेत, ही विनंती.
सोबत - प्रशिक्षणाबाबतचे वेळापत्रक व लिंकची प्रत.
(गोविंद कांबळे)
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन).
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
संपूर्ण प्रशिक्षणाबाबतचे वेळापत्रक व लिंक ची प्रत पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments