सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना दिनांक 3 जुलै 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
महोदय,
शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.२१.६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये सन २०२२ च्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधिन ठेऊन जशी पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्राम विकास विभागाने करावी. त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णतः बंद करण्याची तरतुद ग्राम विकास विभागाने त्यांच्या बदली धोरणात करावी, असे नमुद करण्यात आले होते.
२. उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सन २०२२ च्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेऊन जशी पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संदर्भ क्र. २ येथील शासन पत्र दि.२३.८.२०२३ अन्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या होत्या.
३. तद्नंतर, सन २०२२ च्या बदली प्रक्रियेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही शासनाच्या संदर्भ क्र. ३ येथील दि.३१.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सुरु करण्यात आलेली होती. तसेच तद्नंतर सन २०२३ करीता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली आहे. या बाबत सर्व जिल्हा परिषदांना वेळोवेळी संदर्भ क्र. ३ येथे नमुद पत्रांन्वये सूचित करण्यात आले होते. सद्यःस्थितीत पवित्र पोर्टलव्दारे नवीन शिक्षकांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२५ करीता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
४. या विभागाच्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीव्दारे राबविण्यात येते. त्यानुसार या विभागाच्या दि.२८.२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सन २०२५ करीता आंतरजिल्हा बदली बाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच सन २०२२ च्या प्रतिक्षाधिन शिक्षकांकरीता व सन २०२३ च्या पात्र शिक्षकांकरीता संदर्भ क्र. ३ येथे नमुद पत्रांन्वये सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तथापि, संदर्भ क्र. २ येथील दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने राबवावी, याबाबत संदिग्धता निर्माण होत असल्याचे आढळून येते. ही वस्तुस्थिती विचारात घेता, या विभागाकडून संदर्भ क्र. २ येथील दि.२३.८.२०२३ रोजी निर्गमित केलेले पत्र रद्द करण्यात येत आहे.
आपली,
(नीला रानडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत :- शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).
वरील आदेशानुसार रद्द करण्यात आलेला आदेश पुढीलप्रमाणे.
आंतरजिल्हा बदली बाबत या अगोदरचे आदेश
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी आंतर जिल्हा बदली 2024 25 बाबत आदेश निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन २०२४-२५ राबविण्याकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदा व मे. विन्सीस आयटी सव्हीसेस प्रा. लिमिटेड यांनी करावयाची कार्यवाही
शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे
दि.१० मार्चपर्यंत
जिल्हा परिषदांनी बिंदुनामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदुनामावल्या व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे. (यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि, संबंधित जिल्हा परिषदांकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत,)
दि.११ मार्च ते १३ मार्च
शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे
दि.१४ मार्च ते २० मार्च
अर्जाची पडताळणी करणे.
दि.२१ मार्च ते २५ मार्च
न्यायालयीन प्रकरणे/विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे.
दि.२६ मार्च ते २७ मार्च
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे.
दि.२८ मार्च ते ६ एप्रिल
२. उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत. २.१ यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि, संबंधित जिल्हा परिषदांकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत.
२.२ दि.२३.५.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी.
२.३ ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील, अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शविण्यात यावी.
आपली,
(ज्योत्स्ना अर्जुन)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 12 जून 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतर जिल्हा बदलासाठी सुधारित धोरणामध्ये बदल करण्यासाठी पुढील प्रमाणे शासन शुद्धिपत्रक प्रसिद्ध केली आहे.
वाचा :
जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक: आंजिब-२०२३/प्र.क्र. ११७/आस्था-१४ २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-४०० ००१, दिनांक : १२ जून, २०२४.
१) शासन निर्णय क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र. ११७/आस्था-१४, दिनांक २३.०५.२०२३.
शासन शुद्धीपत्रक :
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण वाचा क्र. १ येथील ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. आंजिब-२०२३/ प्र.क्र. ११७/ आस्था-१४ नुसार निश्चित करण्यात आलेले आहे.
सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४ येथील
"वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील"
या ऐवजी
"वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे प्रकरणपरत्वे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने निकाली काढण्यात येतील." असे वाचावे.
सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२४०६१२१४२७०७१९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
(पं. खं. जाधव)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.
संदर्भित शासन निर्णयानुसार शासनाने शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या यानंतर होणार नाही मागील बदली प्रक्रियेत ज्यांनी अर्ज केला आहे अशा शिक्षकांच्या प्रतीक्षा यादी तयार करून त्यांना ऑफलाइन बदली देण्यात येईल असे म्हटले होते.
परंतु आता आजच्या शुद्धिपत्रकानुसार ऑनलाइन बदल्या देखील होऊ शकतात.
संपूर्ण शासन शुद्धिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments