सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम शासन निर्णय

सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 9 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


 प्रस्तावना :-

राज्य शासनाच्या विविध धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अधिकारी/कर्मचारी हे महत्वाची भूमिका पार पाडतात. या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी अद्ययावत असल्यास, अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासनाचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास प्रोत्साहन मिळेल, ही बाब विचारात घेता अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी विहित कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक ठरते.

अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी अद्ययावत ठेवण्याच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन, ही प्रगती गुणांकन प्रक्रियेद्वारे मोजल्यास निकोप स्पर्धा वाढीस लागून महत्वाच्या सेवाविषयक बाबी जसे सेवाप्रवेश नियम, आकृतीबंध इत्यादी बाबी अद्ययावत होतील, त्यामुळे पदोन्नती, सरळसेवा/अनुकंपा नियुक्ती इत्यादी बाबी कालबद्ध पद्धतीने पूर्ण होण्यास सहाय्यभूत ठरतील.

हा दूरगामी विचार करुन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात मंत्रालयीन प्रशासकीय विभागात टप्पा १ व टप्पा २ मध्ये, "सेवाविषयक बाबींच्या गुणांकनाचा सेवाकर्मी कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शासकीय कर्मचारी कार्यरत असलेल्या ९३ आस्थापनांचे ४७ सचिवनिहाय टप्पा १ प्राथमिक गुणांकन १ मे रोजी निश्चित करुन घोषित करण्यात आले आहे. याच धर्तीवर प्रत्येक प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बार्बीच्या सुधारणांकरीता १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम व आयोग यांचे स्तरावर राबविण्याच्या सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरीता गुणांकनाबाबत १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम (दिनांक ६ मे, २०२५ ते दिनांक २ ऑक्टोबर, २०२५) राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.

१) ४७ मंत्रालयीन विभागस्तरावरील गुणांकन कार्यक्रम :

सदर गुणांकन सामान्य प्रशासन विभागामार्फत खालील वेळापत्रकानुसार जाहिर करण्यात येईल.

१ मे २०२५

टप्पा-१ प्राथमिक गुणांकन

१५ ऑगस्ट २०२५

टप्पा-२ अंतरिम गुणांकन

२ ऑक्टोबर २०२५

अंतिम गुणांकन

गुणांकनात समाविष्ट बाबी खालीलप्रमाणे राहतील.

अ) टप्पा १:- गुणांकनामध्ये समाविष्ट बाबी (कालमर्यादा दिनांक १ मे, २०२५)

मुद्दा

गुण

आकृतीबंध

१५

सेवाप्रवेश नियम

१५

गट-अ व गट-ब संवर्गातील पदोन्नतीने नियुक्ती

१५

गट-अ व गट-ब सरळसेवा नियुक्ती

१५

अनुकंपा नियुक्ती

१०

गोपनीय अहवाल (महापार)

१०

IGOT पोर्टलवर रजिस्ट्रेशन

१०

विभागीय चौकशी

१०

एकूण गुण

१००

वरील मुद्दा क्र. १ ते ८ मध्ये समाविष्ट तपशीलाबाबत सविस्तर विवरणपत्र-१ सोबत जोडले आहे.

आ) टप्पा २ः गुणांकनामध्ये समाविष्ट बाबी (कालमर्यादा दिनांक १५ ऑगस्ट, २०२५)

विभागातील गट-अ, गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील पदोन्नती

२०

गोपनीय अहवाल (महापार)

२०

गट-अ, गट-ब संवर्गातील मागील ५ वर्षातील गोपनीय अहवाल digitise करून महापार प्रणालीवर Upload करणे.

IGOT पोर्टलवर कर्मचारी निहाय ५ प्रशिक्षण कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाण

१०

सेवा विषयक बाबींच्या डिजिटल पोर्टलवर सेवापुस्तक अद्ययावत करणे व ऑनबोर्डीग करणे.

५०

एकूण गुण

१००

वरील मुद्दा क्र.१ ते ४ मध्ये समाविष्ट गुणांच्या तपशीलाबाबत सविस्तर विवरणपत्र-२ सोबत जोडले आहे.

टप्पा-१ मधील १०० गुणांचे गुणांकन १ मे, २०२५ रोजी जाहीर करण्यात आले आहे. टप्पा-२ अंतर्गत टप्पा-१ मध्ये केलेल्या प्रगतीनुसार सुधारित गुणांकन व टप्पा-२ मधील बाबींचे गुणांकन अशा एकूण २०० गुणांचे विभागाचे गुणांकन दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल.

सेवाकर्मी कार्यक्रमाचे अंतिम गुणांकन १५ सप्टेंबर पर्यंतच्या प्रगतीनुसार २ ऑक्टोबर, २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल.

२) मंत्रालयाबाहेरील प्रशासकीय कार्यालयांसाठी राबविण्याचे सेवा विषयक गुणांकनः-(प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम व आयोग इ.)

सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या गुणांकनाच्या धर्तीवर प्रत्येक प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग यातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबींच्या सुधारणांकरीता त्यांचे स्तरावर गुणांकन कार्यक्रम राबवावा व प्रत्येक कार्यालय/आस्थापनानिहाय गुणांकन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावे.

अधिनस्त कार्यालये / आस्थापना यांच्या गुणांकनाकरीता समाविष्ट करावयाच्या बाबी 

आकृतीबंध

१०

सेवाप्रवेश नियम

१०

सर्व संवर्गाची अद्ययावत जेष्ठतासूची प्रसिद्ध करणे

१०

रिक्त पदी पदोन्नतीने नियुक्तीचे प्रमाण

१०

रिक्त पदी सरळसेवा नियुक्तीचे प्रमाण

१०

बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे

१०

अनुकंपा नियुक्ती (गट क व गट ड)

२०

IGOT रजिस्ट्रेशन आणि ५ कोर्स पूर्ण करणे

१०

सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटाईझ करणे.

एकूण गुण

१००

वरील मुद्दा क्र.१ ते ९ मध्ये समाविष्ट गुणांच्या तपशीलाबाबत सविस्तर विवरणपत्र-३ सोबत जोडले आहे.

३) १५० दिवसांच्या सेवाकर्मी पुरस्काराच्या कार्यक्रमांतर्गत गुणांकनात सरस ठरुन प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या विभागाच्या सचिव व संबंधित आस्थापनांना तसेच प्रत्येक क्षेत्रिय स्तरावर मुद्दा क्र. २ नुसार करण्यात आलेल्या गुणांकनानुसार प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या आस्थापना प्रमुखांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६०९१६४६२९८९०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


LEENA ASHISH SANKHE

(लिना संखे) 

उप सचिव, महाराष्ट्र शासन

वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.