संवर्ग एक व संवर्ग दोन बदली पोर्टलवर होकार व नकार दिलेल्या शिक्षकांच्या अर्जांची पडताळणी करणे साठी शासन निर्णयानुसार आवश्यक संवर्गनिहाय कागदपत्र

 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०२५

जिल्हा परिषद बुलढाणा

विशेष संवर्ग भाग । साठी आवश्यक कागदपत्रे

विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 मधील प्रकार

आवश्यक कागदपत्रे

1.8.1 पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट

2) ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किया चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र

3) दवाखान्याची उपचार घेत असलेली फाईल

४) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र.

1.8.2 दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14.1.2011 मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक

विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) स्वतःचे दिव्यांगत्वाबाबतचे प्रमाणपत्र,

3) मुलाचे मानसिक विकलांगतेचे / दिव्यांग प्रमाणपत्र.

4) जोडीदाराचे मानसिक विकलांग / दिव्यांग प्रमाणपत्र

5) पती-पत्नी असल्याचा पुरावा.

6) पालकत्व स्विकारले बाबतचे प्रमाणपत्र,

यापैकी जे लागू असेल ते द्यावे

सूचना-दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईनयुडी-आयडी असलेले आवश्यक.

1.8.3 हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट

2) त्या दवाखान्यामध्ये द्वदय शस्त्रक्रिया झालेली आहे त्या दवाखान्याच्या वेद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व उपचाराबाबतचा फाईल

 3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र


1.8.4 एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले /मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस शिक्षक.

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र 

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र


1.8.5 यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग होकारपत्र / नकारपत्र प्रिंट

2) ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र 

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र.


1.8.6 कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र

 3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र


1.8.7 मेंदूचा आजार झालले शिक्षक.

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग होकारपत्र/ नकारपत्र प्रिंट.

2) ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किया चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आमागसंबंधी प्रमाणपत्र 

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र


1.8.8 थलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase deficiency व इतर आजार) (पालक) महणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक. 

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहत किया चालू आहेत त्या दवाखान्याच्या वेद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र

4) पालकत्व स्विकारले बाबतचे प्रमाणपत्र.

5) आई-वडिलांचे कॅन्सरवरील उपचार ज्या दवाखान्यामध्ये चालू आहेत त्या दवाखान्याच्या वेद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र सूचना यापैकी जे लागू असेल ते द्यावे.


1.8.9 माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा.

१) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

२) आजी सैनिक / अर्धसैनिक कार्यरत प्रमाणपत्र.

3) माजी सैनिक सेवानिवृत्त प्रमाणपत्र

४) पती-पत्नी असल्याचा पुरावा

५) विधवा कर्मचारी बाबतीत पतीचे मृत्यु प्रमाणपत्र

सूचना यापैकी जे लागू असेल ते द्यावे.


1.8.10 विधवा शिक्षक.

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग होकारपत्र/ नकारपत्र प्रिंट.

2) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र

3) पती-पत्नी असल्याचा पुरावा.


1.8.11 कुमारिका शिक्षक

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग 1 होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) कुमारिका असल्याचे सध्या कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत/ नगरपालिका / महानगरपालिका दाखला

3) कुमारिका असल्याचे मूळ रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायत/नगरपालिका / महानगरपालिका दाखला . 


1.8.12 परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक. 

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) परित्यक्त्या असल्याचे प्रमाणपत्र किंवा पुरावा तसेच मा. न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यास याचिका

3) घटस्फोटीत असल्याचे मा. न्यायालयाचे प्रमाणपत्र किया पुरावा.


1.8.13 वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक.

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) सेवापुस्तकाचे पहिले पान.

३) आधार कार्ड झेरॉक्स.


1.8.14 स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मूलगों /नानू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिट

2) स्वातंत्र्य सैनिक हयात असलेले प्रमाणपत्र / स्वातंत्र्य सैनिक होत याबाबत सक्षम प्राधीका-याचे प्रमाणपत्र

3) मुलगा // नालू / नात असल्यास प्रमाणपत्र.


1.8.15 हृदय शस्त्रक्रिया झालेले.

) विशेष शिक्षक संवर्ग भाग होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) नोडीदाराची ज्या दवाखान्यामध्ये हृदय शस्रक्रिया झालेली आहे स्था दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व उपचाराबाबतची फाईल

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र

4) पती पत्नी असल्याचा पुरावा. 


1.8.16 एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले /मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले. 

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट

2) जोडीदाराचे ज्या दवाखान्यामध्ये उपचार सुरु आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व उपचाराबाबतची फाईल

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र 

4) पती पत्नी असल्याचा पुरावा.


1.8.17 यकृत प्रत्यारोपण झालेले. 

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) जोडीदाराचे ज्या दवाखान्यामध्ये यकृत प्रत्यारोपण झालेले आहे त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व उपचाराबाबतची फाईल

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र

4) पती पत्नी असल्याचा पुरावा


1.8.18 कॅन्सरने (कर्करोग) आजारी.

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग। होकारपत्र / नकारपत्र प्रिंट 

2) जोडीदाराचे ज्या दवाखान्यामध्ये कॅन्सरवर उपचार सुरु आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व उपचाराबाबतची फाईल 

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र 

4) पती पत्नी असल्याचा पुरावा


1.8.19 मेंदूचा आजार झालेले

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग । होकारपत्र / नकारपत्र प्रिंट.

2) जोडीदाराचे ज्या दवाखान्यामध्ये मेंदूच्या आजारावर उपचार सुरु आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व उपचाराबाबतची फाईल

3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र

4) पती पत्नी असल्याचा पुरावा.


1.8.20 थलेसेमिया विकारग्रस्त असलेले. 

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग होकारपत्र / नकारपत्र प्रिंट..

2) जोडीदाराचे ज्या दवाखान्यामध्ये बॅलेसेमिया या आजारावर उपचार सुरु आहेत त्या दवाखान्याच्या वेद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र व उपचाराबाबतची फाईल

 3) जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र

 4) पती पत्नी असल्याचा पुरावा.


जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०२५

जिल्हा परिषद बुलडाणा

विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मधील प्रकार

विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 साठी आवश्यक कागदपत्र.

1.9.1 पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर,

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग २ होकारपत्र (ऑनलाईन भरलेला अर्ज। 

2) जोडीदाराचे कार्यरत असलेबाबत संबधित कार्यालयाचे सध्याचे प्रमाणपत्र

3) कार्यकारी अभियंता सार्वजनिक यांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांचा अर्जदार व जोडीदार यांच्या कार्यालयातील सर्वात जवळच्या मार्गान अंतराचा दाखला. 

4) पती-पत्नी असल्याचा पुरावा.


1.9.2. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दूसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग २ होकारपत्र, (ऑनलाईन भरलेला अर्ज। 2) जोडीदाराचे कार्यरत असलेबावत संबधित कार्यालयाचे सध्याचे प्रमाणपत्र

3) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी ऑभरांना जिल्हा परिषद बांधकाम यांचाअर्जदार व जोडीदार यांच्या कार्यालयातील सर्वात जवळच्या मार्गाने अंतराचा दाखला. 

4) पती-पत्नी असल्याचा पुरावा


1.9.3 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग २ होकारपत्र. (ऑनलाईन भरलेला अर्ज ।

 2) जोडीदाराचे कार्यरत असलेबाबत संबधित कार्यालयाचे सध्याचं प्रमाणपत्र

3) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांचा अर्जदार व जोडीदार यांच्या कार्यालयातील सर्वात जवळच्या मार्गाने अंतराचा दाखला. 

4) पती-पत्नी असल्याचा पुरावा.


1.9.4 पत्ती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दूसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका.

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग २ होकारपत्र. (ऑनलाईन भरलेला अर्ज। 2) जोडीदाराचे कार्यरत असलेबाबत संबधित कार्यालयाचे सध्याचे प्रमाणपत्र

3) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांचाअर्जदार व जोडीदार यांच्या कार्यालयातील सर्वात जवळच्या मार्गाने अंतराचा दाखला,

4) पती-पत्नी असल्याचा पुरावा.


1.9.5 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दसरा राज्य अथवा कद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.

2) विशेष शिक्षक संवर्ग भाग २ होकारपत्र (ऑनलाईन भरलेला अर्ज। 

2) जोडीदाराचे कार्यरत असलेबाचत संबंधित कार्यालयाचे सध्याचे प्रमाणपत्र

3) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांचा अर्जदार व जोडीदार याच्या कार्यालयातील सर्वांत जवळच्या मार्गाने अंतराचा दाखला. 

4) पती-पत्नी असल्याचा पुरावा.


1.9.6 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग २ होकारपत्र. (ऑनलाईन भरलेला अर्ज ।

2) जोडीदाराचे कार्यरत असलेबाबत संबधित कार्यालयाचे सध्याचे प्रमाणपत्र

3) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद वांधकाम यांचा अर्जदार व जोडीदार यांच्या कार्यालयातील सर्वात जवळच्या मार्गाने अंतराचा दाखला.

4) पती-पत्नी असल्याचा पुरावा.

5) संस्था अनुदानित असलेबाबतचे पत्र.

6) वैयक्तिक मान्यता.


1.9.7 पती-पत्नी दोघांपैकी एक / दोघेही शिक्षणसेवक / तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर,

1) विशेष शिक्षक संवर्ग भाग २ होकारपत्र. (ऑनलाईन भरलेला अर्ज)

2) जोडीदाराचे कार्यरत असलेबाबत संबधित कार्यालयाचे सध्याचे प्रमाणपत्र

3) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांचा अर्जदार व जोडीदार यांच्या कार्यालयातील सर्वात जवळच्या मार्गाने अंतराचा दाखला.

4) पती-पत्नी असल्याचा पुरावा.


पडताळणी समितीस आवश्यक असल्यास इतर कागदपत्र सादर करावे लागतील. त्यामुळे इतर आवश्यक कागदपत्र सोबत ठेवावेत.





वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी दिनांक 9 जून 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत बदली पोर्टलवर होकार व नकार दर्शविलेल्या शिक्षकांच्या विनंती अर्जाची पडताळणी करणे बाबत गटशिक्षणाधिकारी यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

शासन निर्णयातील विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत १.८.१ ते १.८.२० मधील तरतुदीचा लाभघेवून बदली पोर्टलवर बदलीसाठी होकार व नकार नोंदविलेल्या शिक्षकांचे बदली पोर्टलवरील अर्ज व १.८.१ ते १.८.२० मधील लाभ घेतलेल्या मुद्यांची कागदपत्रे पुरावे तालुकास्तरावर स्विकारुन त्याची तालुकास्तरावरील त्रिस्तरीय समितीने पडताळणी करावी. तसेच विशेष संवर्ग भाग-२ चा लाभ घेण्यासाठी बदली पोर्टवर अर्ज सादर केलेल्या शिक्षकांच्या अर्जाचीही पडताळणी करण्यात यावी. उक्त दोन्ही संवर्गाच्या आर्जाच्या अर्ज पात्र अपात्रतेचा त्रिस्तरीय समितीने खालील नमूद कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्यात यावा.


विशेष संवर्ग भाग-१ तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे स्विकृती-२ प्रती


१) ई मेल / बदली पोर्टलवरील अर्जाची प्रत


२) १.८.१ ते १.८.२० मधील लाभाचे पुरावे


३) ५३ वर्षे वयासाठी सेवापुस्तिकेतील पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी.


४) आजाराच्या संदर्भातील जोडेलेले पुरावे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या प्रतीस्वाक्षरीचे असावेत.


५) विधवा शिक्षकांच्या बाबतीत पतीचे मृत्यु प्रमाणपत्र किंवा सेवापुस्तिकेत मृत्युची नोंद घेतल्याच्या नोंदीची झेरॉक्स प्रत.

विशेष संवर्ग भाग-२ तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे स्विकृती-२ प्रती

१) ई मेल / बदली पोर्टलवरील अर्जाची प्रत

(बदली पोर्टलवर संवर्ग एक किंवा दोन साठी अर्ज भरला असेल आणि आपल्याला कन्फर्मेशन मेल आलेला नसेल म्हणजेच पीडीएफ अर्ज आलेला नसेल.

त्यासाठी आता पुन्हा एकदा आपला मेल चेक करावा.

उशिरा रात्रीपर्यंत ई-मेल प्राप्त झाले आहे.

कन्फर्मेशन ई-मेल आला नसेल तर. 

@ Email :- ottsupport@vinsys.com

या वरील ईमेलवर बदली पोर्टलवर जो आपला अधिकृत ई-मेल नोंदवलेला आहे त्या ईमेल आयडी वरून कन्फर्मेशन ई-मेल प्राप्त झाला नाही अशा आशयाचा ईमेल करावा आपल्याला कन्फर्मेशन ईमेल प्राप्त होतो.) 

२) कार्यकारी अभियंता यांचे ३० किमी पेक्षा जास्त अंतराचे प्रमाणपत्र.

३) पती/पत्नीच्या कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीचे सेवेचे प्रमाणपत्र, (पती बदली मागत असतील तर पत्नीच्या कार्यालय प्रमुखांचे तर पत्नी बदली मागत असेल तर पतीच्या कार्यालय प्रमुखांचे सेवेचे प्रमाणपत्र.)

४) पती/पत्नी असल्याचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा सेवापुस्तिकेत सेवानिवृत्ती वेतन किंवा अन्य बाबीसाठी नामनिर्देशीत केल्याची सेवापुस्तिकेतील नोंदीची झेरॉक्स प्रत.

उपरोक्त विशेष संवर्ग भाग-१ व भाग-२ चे अर्ज व पुरावे-१ प्रत, अर्ज पात्र/अपात्रतेची यादी व समितीचे इतिवृत्त जिल्हा कार्यालयास दि.१०/०६/२०२५ रोजी सायं ५.३० पर्यंत पाठविण्यात यावेत. त्या आधारे पात्र/अपात्र अर्जावर जिल्हा स्तरावर समितीला निर्णय घेता येईल.


 शिक्षणाधिकारी (प्राथमिक), 

जिल्हा परिषद, लातूर

प्रत. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांना माहितीस्तव सविनय सादर.

-sa-शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, लातूर



शिक्षणाधिकारी प्राथमिक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक नऊ जून 2025 रोजी संवर्ग एक व दोन चे अर्ज केलेल्या शिक्षकांचे ऑनलाईन अर्ज देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 
दिनांक 07, 08 जून 2025 रोजी संवर्ग 01 व संवर्ग 02 मध्ये सहभाग घेऊ इच्छित असलेल्या शिक्षकांना बदली पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याविषयी अवगत करण्यात आले होते त्यानुसार जिल्ह्यातील संवर्ग 1 मध्ये 1476 व संवर्ग 02 मध्ये 356 शिक्षकांनी नोंदणी केली आहे. दिनांक 09- जून 2025 रोजी पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

शासन निर्णय दिनांक 18-06-2024 मध्ये 4.2.8 मध्ये नमुद त्रिसदस्यीय समिती मार्फत संवर्ग 01 व संवर्ग 02 मध्ये भाग घेऊ इच्छित असलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करून पात्र व अपात्र शिक्षक आपण घोषित करावे.

ऑनलाइन अर्ज केलेल्या शिक्षकांच्या अर्जाची ऑनलाइन प्रत आपल्याकडे जमा करून घ्यावी व संबंधितांनी दिलेल्या कागदपत्रांनुसार त्याच संवर्गातून व उपप्रकारातून अर्ज केलेला आहे का? याची रीतसर पडताळणी करावी व जे शिक्षक संवर्ग 01 व 02 चा लाभ घेण्यास पात्र आहे अशा शिक्षकांची यादी या कार्यालयास दिनांक 10-06-2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यत सादर करावी. कोणताही अपात्र शिक्षक पात्र होणार नाही याची खबरदारी घ्यावी कोणतीही चूक या कामी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

बदलीमध्ये खोटी अथवा दिशाभूल करणारी कागदपत्र दाखल करून बदलीचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या शिक्षकाविरुद्ध बदलीचा शासन निर्णय दिनांक 18.06.2024 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी. वदलीमध्ये खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती भरुन बदलीचा लाभ घेत असल्याबाबतची बाब जिल्हा परिषद स्तरावर निदर्शनास आल्यास सदरच्या प्रकरणात आपणास व्यक्तीशः जबाबदार धरण्यात येवून नियमातील तरतुदीनुसार नियोमोचित कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी,

 जयश्री चव्हाण 
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर


गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बुलढाणा यांनी दिनांक 6 जून 2025 रोजी सर्व मुख्याध्यापक विषय शिक्षक व सहाय्यक अध्यापक संवर्ग एक व संवर्ग दोन यांना मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत ज्या मुख्याध्यापक, सहाय्यक अध्यापक व विषय शिक्षकांनी संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये ऑनलाईन होकार व नकार चे अर्ज भरले आहेत अशा शिक्षकांनी ऑनलाईन भरतांना दिलेल्या पर्यायाचा पुरावा सादर करायचा आहे

तरी अशा शिक्षकांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंट, मुळ कागदपत्रे तसेच झेरॉक्स प्रत घेऊन दि. १०/०६/२०२१६ रोजी सकाळी १०.३० वाजता समग्र शिक्षा कार्यालय, कारंजा चौक, बुलढाणा येथे उपस्थित रहावे.
सदर कागपत्रे तपासणीस उपलब्ध करुन न दिल्यास अथवा विहीत कागदपत्रे सादर न केल्याग आपणाविरुध्द नियमानुसार पुढील प्रशासकिय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

गटशिक्षणाधिकारी 
पंचायत समिती बुलडाणा


जिल्हांतर्गत बदल्या सन 2025 अंतर्गत संवर्ग-1 व 2 मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या बदली अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढी बाबत.

संदर्भ :-

1) ग्राम विकास विभाग शासन निर्णय जिपब-2023/प्र.क्र. 118/आस्था-14 दि. 18 जून 2024


2) WhatsApp नोडल अधिकारी शिक्षक बदली ग्रुप वरील दि. 09/06/2025 रोजीचा संदेश.

उपरोक्त संदर्भ-1 अन्वये शासन निर्णयानुसार शिक्षकांना विशेष संवर्ग-1 व 2 मधून बदलीसाठी अर्ज करण्यासाठी दि. 07/06/2025 ते 08/06/2025 असा कालावधी पोर्टलवरील वेळापत्रकात देण्यात आला होता तथापि तांत्रिक अडचणी मुळे शिक्षकांना ऑनलाईलन फॉर्म भरण्यासाठी असुविधा निर्माण झाल्याने संदर्भ क्र. 2 अन्वये आज दि. 09/06/2025 रोजी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत आपल्या गटातील सर्व शिक्षकांच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावे तद्नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

तसेच सदरील मुदतीअंती शासन निर्णयातील 4.2.8. नुसार गट स्तरावरील सिमिती मार्फत विशेष संवर्ग-1 व 2 मधून बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करावयाची असल्याने आवश्यक ती पुर्व तयारी आपल्या स्तरावर करण्यात यावी.


उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

 जिल्हा परिषद सिंधुदुर्ग



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.