Bharatiya Rhyme and Poem Competition Baalpan ki Kavita - बालपणीच्या कविता स्पर्धा सहभागी होण्यासाठी लिंक SCERT सूचना

 बालपन कि कविताएँ (बालपणीच्या कविता) संग्रह तयार करण्यासाठी सर्व स्तरावर आवाहन करणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

बालपणीच्या कविता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लिंक.

https://innovateindia.mygov.in/baalpan-k-kavita

प्रति,

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व जिल्हे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, सर्व जिल्हे.

विषयः बालपन कि कविताएँ (बालपणीच्या कविता) संग्रह तयार करण्यासाठी सर्व स्तरावर आवाहन करणेबाबत

संदर्भ: स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शास्त्री भवन, नवी दिल्ली, शिक्षा मंत्रालय भारत सरकार कार्यालयाचे पत्र, D.O No.- १-१/२०२५-१९.१३ दि.२७.०५.२०२५

उपरोक्त विषयान्वये, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), २०२० नुसार शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DOSE & L) बालपन कि कविताएँ (बालपणीच्या कविता) उपक्रम: लहान मुलांसाठी भारतीय गाणी /कविता पुनसंग्रहित करणे यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. प्रस्तुत उपक्रमाचा उद्देश पायाभूत टप्प्यातील शिक्षणासाठी भारतीय कवितांचा संग्रह तयार करणे असा आहे. प्रस्तुत उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी देशभरातील साधारण २२ प्रमुख भाषांमध्ये तयार असणारे लोकसाहित्य, विविध स्तरावर (वयोगटानुसार) तयार केल्या जाणाऱ्या बालसाहित्यातील कविता, लोकगीते किंवा स्वलिखित कविता सादर करणे तसेच जुन्या कविता व गीते संबंधित लेखकांच्या नावासह एकत्रित करण्यासाठी नमूद संदर्भानुसार आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक भाषेतून उत्स्फुर्तपणे अनेक कवितांचे संग्रह तयार होऊ शकतील. कविता पुढील तीन स्तरांसाठी संकलित करावयाच्या आहेत.

१. पूर्व-प्राथमिक (वय ३-६)

२. इयत्ता १ (वय ६-७)

३. इयत्ता २ (वय ७-८)

सदर उपक्रमात सहभाग घेण्यासाठी

१. कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

२. MyGov वेबसाइट

 https://innovateindia.mygov.in/baalpan-k-kavita

वर नोंदणी करावी.

३. कविता वेबसाइट 

https://innovateindia.mygov.in/baalpan-ki-kavita/ 

वर सबमिट करावी.

४. निवड समितीद्वारे अंतिम प्रवेशिकांना योगदानाचे प्रमाणपत्र, योग्य रोख बक्षीस दिले जाईल.

५. सदर कविता पाठविण्याची मुदत दि. ३०.६.२०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

६. स्पर्धेची इतर माहिती MyGov वेबसाइटवर पाहता येईल.

तदनुसार उपरोक्त उपक्रमाची अंमलबजावणी करत असताना सदर कविता संग्रहासाठी महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठी सोबतच इंग्रजी व इतर भाषांमध्ये देखील कविता सादर करण्यात याव्यात. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, कवी, लेखक यांच्यापर्यंत सदर उपक्रमाच्या माहितीचा व्यापक प्रसार आणि प्रचार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तपत्रांद्वारे करण्यात यावा. प्रत्येक शाळेतून उपरोक्त प्रत्येक गटासाठी शक्य होतील तेवढ्या स्वलिखित कविता, गाणी, लोकसाहित्यात लोकप्रिय असलेल्या विद्यमान कविता (लेखकाच्या नावासह) सादर करण्यासाठी आवाहन करावे, बालकांसाठी भारतीय कविताचा एक उत्कृष्ट संग्रह तयार करण्यासाठी संबधित घटकांना प्रोत्साहित करावे.

सदर आदेशानुसार आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्यात यावी व कार्यवाहीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा.

सोबत : संदर्भ पत्र


Signed by

Rahul Ashok Rekhawar Date: 20-06-2025 16:48:18

राहूल रेखावार (भा.प्र.से.) 

संचालक,

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०

प्रत माहितीस्तव

मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य


सबमिशनच्या श्रेणी

या कविता निसर्ग, प्राणी, पक्षी, सण, कुटुंब, समुदाय मदतनीस, ऋतू, पाणी, अन्न, आरोग्य आणि स्वच्छता वाहतूक, दैनंदिन जीवन, देशभक्ती, नाटके/खेळ/खेळ इत्यादींबद्दल असू शकतात.

कविता/यज्ञ आनंददायी, मनोरंजक, वाचण्यास सोप्या आणि आकर्षक असाव्यात.

कविता/यज्ञ खालील वयोगटासाठी असू शकतात:-

प्री-स्कूल/बालवाटिका - (३-६ वर्षे)

ग्रेड १- (६-७ वर्षे)

ग्रेड २- (७-८ वर्षे)

यमक/कवितांची लांबी ४-१२ ओळींमध्ये ३०-१०० शब्दांची असावी जे शिकण्यास सोपे असतील.

यमक/कविता मूळतः लिहिलेल्या, स्थानिक संस्कृतीत लोकप्रिय असलेल्या किंवा लोककथेत असलेल्या किंवा दुसऱ्याने लिहिलेल्या असू शकतात. जर दुसऱ्याने लिहिले असेल तर पाठवणारा त्याचे श्रेय देऊ शकतो.

निवडक यमक/कविता NCERT/DOSE&L/MyGov/KVS/NVS/CBSE/SCERTS प्लॅटफॉर्म आणि इतर शैक्षणिक पोर्टलवर प्रदर्शित केल्या जातील, ज्यामुळे देशभरातील सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना फायदा होईल.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.