दिनांक 25/06/2025
पवित्र पोर्टल मार्फत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील 'मुलाखतीसह' शिक्षक पदभरतीसाठी मार्गदर्शक सूचना
(व्यवस्थापन व मुलाखतीसाठी निवडपात्र उमेदवारांसाठी) (TAIT-2022 Phase-2)
अ) सर्वसाधारण सूचना
1) शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनानी/संस्थांनी निवडप्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
2) 'मुलाखतीशिवाय' शिक्षक पदभरती या प्रकारातील दिनांक 25/02/2024, 25/06/2024, दि.30/07/2024 व दिनांक 21/05/2025 आणि मुलाखतीसहसाठी दिनांक 08/08/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकारी यांच्यासाठीच्या सूचनांचे देखील अवलोकन करावे.
3) पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत उमेदवारांसाठी सूचना यामध्ये दिनांक 01/09/2023, दिनांक 05/02/2024 व दिनांक 10/03/2025 रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्याचेदेखील अवलोकन करावे.
(व्यवस्थापन व मुलाखतीसाठी निवडपात्र उमेदवारांसाठी) (TAIT-2022 Phase-2)
अ) सर्वसाधारण सूचना
1) शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनानी संस्थांनी निवडप्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
2) 'मुलाखतीशिवाय' शिक्षक पदभरती या प्रकारातील दिनांक 25/02/2024, 25/06/2024, दि. 30/07/2024 व. दिनांक 21/05/2025 आणि मुलाखतीसहसाठी दिनांक 08/08/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकारी यांच्यासाठीच्या सूचनांचे देखील अवलोकन करावे.
3) पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत उमेदवारांसाठी सूचना यामध्ये दिनांक 01/09/2023, दिनांक 05/02/2024 व दिनांक 10/03/2025 रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्याचेदेखील अवलोकन करावे.
4) पवित्र पोर्टलवर व्यवस्थापन व उमेदवार यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व सूचनांचे अवलोकन करून आवश्यक ती कार्यवाही करावी.
5) शिक्षक शिक्षण सेवक पदभरतीसाठी दिनांक 20/01/2025 ते दिनांक 15/04/2025 तसेच दिनांक 02/05/2025 ते दिनांक 05/05/2025 या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत बिंदुनामावली व रिक्त पदांच्या माहितीची नोंद करून पवित्र पोर्टलवर व वृतपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत.
6) पवित्र पोर्टलमार्फत टेट 2022 टप्पा-2 अंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. 'मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या व्यवस्थापनांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 25/06/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
7) उमेदवारास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 मध्ये प्राप्त गुण, पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, तसेच विविध न्याय निवाडे- आदेश, शासन निर्णय इत्यादी सर्व बाबींना एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झाली आहे.
8) सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीचे नियोजन संबंधित व्यवस्थापनांकडून दिनांक 26/06/2025 ते 30/06/2025 या कालावधीत करण्यात यावे. तसेच प्रत्यक्ष मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीची कार्यवाही दिनांक 01/07/2025 ते 21/07/2025 या कालावधीत करण्यात यावी.
9) मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उमेदवार निवडीची कार्यवाही (गुणवत्ता यादी) दिनांक 25/07/2025 पर्यंत अंतिम करावी. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी पवित्र प्रणालीमार्फत तयार होणार आहे, त्यामुळे उमेदवाराचा रुजू अहवाल पवित्र प्रणालीवर नोंद करणे आवश्यक आहे. सदरची संपूर्ण कार्यवाही दिनांक 14/08/2025 पर्यंत करावी.
10) गुणवता यादीनुसार नियुक्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित अधिकारी यांनी करावी. (उदाहरणार्थ, प्राथमिक शाळांतील पदांकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक), माध्यमिक शाळांतील पदांकरिता शिक्षणाधिकारी (माध्यमिक), उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पदांकरिता विभागीय शिक्षण उपसंचालक)
11) नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव 81 व्यवस्थापनाच्या एकूण 177 पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आलेली आहेत त्यामुळे सदर पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही. अशा व्यवस्थापनातील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे.
12) व्यवस्थापनांना https://tait2022 mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर लॉगिन करण्यासाठी संस्थेचा सरल पोर्टलवरील संस्था Code हा User ID असेल व जो यापूर्वी password सेट केला असेल तो वापरून लॉगिन करता येईल. पासवर्ड विसरला असल्यास, होम पेजवरील Forgot password या मेनूवर क्लिक करून योग्य ती माहिती नाँद केल्यानंतर, नोंदणीकृत (Registered) मोचाईलवर आलेल्या ओटीपीचा वापर करून नवीन पासवर्ड Reset करता येईल.
13) व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर दर्शविलेल्या संकेतस्थळावर लॉगिन केल्यानंतर Reports या मेनूअंतर्गत General Merit List दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर General Merit List/Post wise and Subject wise Merit List/ Category wise Merit List या कोणत्याही मेनूवर क्लिक केल्यानंतर व्यवस्थापनाने दिलेल्या जाहिरातीनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी दिसेल. General Merit List या मेनूवर क्लिक केल्यानंतर व्यवस्थापनाकडे शिफारस झालेल्या गुणवतेनुसार सर्व उमेदवारांची यादी उपलब्ध होईल.
14) व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र (Self Certified copy) लॉगिन केल्यानंतर View Applicant Self Certified Copy यावर क्लिक करून संबंधित उमेदवारांचा परीक्षा क्रमांक नौद करून submit यावर क्लिक केल्यानंतर उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
15) उमेदवाराची जास्तीतजास्त 10 प्राधान्यक्रमांवर गुणवत्तेनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
16) मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
17) प्रत्येक रिक्त जागेकरिता उमेदवारांच्या उपलब्धतेनुसार 1:10 या गुणोतराप्रमाणे (समांतर आरक्षणासह) मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवडीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी करण्यात आलेली आहे. सदर सर्वसाधारण गुणवता यादी व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
18) पवित्र पोर्टलवर उमेदवारांकडून अपलोड केलेली कागदपत्रे (उदा., शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, जातपडताळणी प्रमाणपत्र, समांतर आरक्षण विषयक प्रमाणपत्रे इत्यादी) अपलोड करून घेण्यात आलेली आहेत. परंतु यांपैकी कोणत्याही कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची करून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. सदर कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून उमेदवार शिफारस केलेल्या पदासाठी पात्र असल्याची खात्री करावी. उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारेच मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवडीसाठी शिफारस झालेली आहे. स्व प्रमाणपत्रांमध्ये नौद केलेली माहिती व प्रत्यक्षात उमेदवाराकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास उमेदवार निवडीसाठी अपात्र ठरेल. व्यवस्थापनास उपलब्ध करून देण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्तायादी अंतिम निवडयादी नसून मुलाखतीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी आहे. व्यवस्थापनाकडून मुलाखतीनंतर प्रसिद्ध होणारी यादी अंतिम निवडयादी असेल.
19) उमेदवाराच्या निवडीपूर्वी स्व-प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेली व उमेदवाराची ज्या पदासाठी निवड झाली आहे त्या पदासाठी आवश्यक असलेल्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली 1981 तसेच शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक सीईटी-2015/प्रक्र 149/टीएनटी-1 दिनांक 07/02/2019 मधील मुद्दा क्रमांक 10 व अन्य तरतुदीनुसार गठीत केलेल्या 'शाळा समिती' मार्फत करावी.
20) मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रे व उमेदवारांनी अपलोड केलेली कागदपत्रे व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
21) व्यवस्थापनाने लॉगिन केल्यानंतर Reports या मैनुअंतर्गत उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेला उमेदवाराचा ईमेल आयडी यांची एकत्रित माहिती Recommended Candidates Communication Details यावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध होईल. या माहितीचा वापर करून उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी कळविता येईल.
22) पात्र उमेदवारांचा गट, विषय व प्रवर्ग इत्यादींमध्ये व्यवस्थापनाच्यास्तरावर बदल करता येणार नाही. तथापि, मुलाखतीसाठी यादी तयार करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील पदासाठी पात्र ठरत असल्यास, अशा उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रवर्गाऐवजी खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार विचारात घेण्यात आलेले आहे. अध्यापन कौशल्यानंतर निवडीच्या वेळी सदर उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी गुणानुक्रमे पात्र ठरत नसल्यास अशा उमेदवारांचा त्यांच्या मूळ प्रवर्गातदेखील (जाहिरातीमध्ये मूळ प्रवर्गाच्या जागा असल्यास) गुणवतेनुसार निवडीसाठी विचार करता येईल.
23) पोर्टलवर उमेदवारांनी नौद केलेल्या माहितीनुसार मुलाखतीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवारांची सर्वसाधारण गुणवतायादी, विषयनिहाय गुणवतायादी, आरक्षणनिहाय गुणवत्तायादी या याद्यांचा समावेश असेल. उमेदवाराची निवड करताना सर्वसाधारण गुणवत्तायादी नुसारच कार्यवाही करावी केवळ व्यवस्थापनाच्या माहितीसाठी विषय व आरक्षणनिहाय स्वतंत्र यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
24) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक सीईटी 2015 प्रक्र-149/टीएनटी-1, दिनांक 07/02/2019 अन्वये उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील.
25) सदर 30 गुणदानाबाबतचे स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) याबाबतचे दिनांक 06/08/2024 रोजीचे शासन पत्र यासोबत देण्यात येत आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी याचा वापर करावा व त्यामध्ये दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
26) मुलाखत व अध्यापन कौशल्य याद्वारे संबंधित व्यवस्थापन उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पोर्टलवर जाहीर करेल. त्याप्रमाणे मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतरचा अंतिम निकाल देखौल व्यक्तिशः ईमेल आणि रजि. पोस्टाने कळविण्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील.
27) 'पवित्र पोर्टल' मार्फत शिक्षक पदभरतीसाठी शासनाने विहित केलेल्या सर्व तरतुदींसह सामाजिक व समांतर आरक्षणाच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील.
28) मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित गुणांनुसार नियुक्तीसाठी निवड केलेली आहे. अशा उमेदवारांची नियुक्ती 7 (सात) कार्यालयीन दिवसांत संबंधित व्यवस्थापन करेल. संबंधित व्यवस्थापन उमेदवारांचे नियुक्ती आदेश ई-मेल द्वारे संबंधित उमेदवार, संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक), संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवावे, तसेच सर्व संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेशाची मूळ प्रत नोंदणीकृत (Registered R.P.A.D.) पोस्ट द्वारे पाठवेल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा Selected व उर्वरित उमेदवारांचा Wait listed/Absent/Rejected (लागू असेल त्याप्रमाणे) या प्रकारामध्ये अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या लॉगिनला नोंद करून अंतिम निवडयादी प्रसिद्ध करावी.
29) कोणत्याही व्यवस्थापनाला पदभरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क की इत्यादी आकारता येणार नाही.
30) निवडप्रक्रियेदरम्यान व्यवस्थापनांना अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी / विभागाशी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयाशी संपर्क साधावा.
31) व्यवस्थापनांना तांत्रिक अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
32) या पदभरतीच्या संपूर्ण पक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची सर्व संबंधितांनी नौद घ्यावी.
ब) मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता :-
1. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिनांक 12/02/2023 पूर्वी धारण केलेली असणे आवश्यक आहे. (CIEI ही परीक्षा December 2022 या बॅचमध्ये देऊन मार्च 2023 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहेत.)
2. उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय दिनांक 7/2/2019, 25/02/2019, 16/05/2019, 12/06/2019 मध्ये नमूद केल्यानुसार असावी. तथापि, खाजगी व्यवस्थापनातील उच्च माध्यमिक स्तरावरील (11 वी ते 12 वी) पदासाठी उमेदवार पदव्युत्तरपदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच माध्यमिक स्तरावरील (9 वी ते 10 वी) पदासाठी उमेदवार पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. इयता। ली ते 5 वी. इयत्ता 6 वी ते 8 वी यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2018/ प्र के 397/ टीएनटी-1 दिनांक 07/02/2019 दिनांक 25/02/2019,16/05/2019, 12/06/2019 च्या शुद्धिपत्रकामध्ये व दिनांक 23/08/2013 नमूद केल्यानुसार राहील.
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता खालील प्रमाणे-
1) इयत्ता 1 ली ते 5 वी
शैक्षणिक अर्हता- इयत्ता 12 वी (उच्च माध्यमिक शालांत) परीक्षा अथवा समकक्ष 45% गुणासह (आरक्षित प्रवर्गासाठी 40% गुणासह) व व्यावसायिक अर्हता- D.Ed// D.EL.Ed/ D.T.Ed/ TCH आणि TET-Paper-1 or CTET-Paper-1 उत्तीर्ण (खुला प्रवर्ग किमान 60 टक्के व आरक्षित प्रवर्ग- 55 टक्के गुण, दिव्यांग प्रवर्ग -55%, माजी सैनिक प्रवर्ग -45 टक्के गुण)
2) इयत्ता 6 वी ते 8 वी
शैक्षणिक अर्हता- संबंधित विषय गटातील पदवी परीक्षा किमान 45% गुणासह (आरक्षित प्रवर्गासाठी 40% गुणासह) व व्यावसायिक अर्हता- D.Ed/ D.EL.Ed/ D.T.Ed/ TCH OR B.Ed /B.A.Ed/ B.Sc.Ed आणि TET-Paper-2 or CTET-Paper-2 संबंधित विषय गटात (भाषा विषयासाठी कोणत्याही विषय गटातील ) उत्तीर्ण (खुला प्रवर्ग- किमान 60 टक्के व आरक्षित प्रवर्ग- 55 टक्के गुण, दिव्यांग प्रवर्ग -55%, माजी सैनिक प्रवर्ग-45 टक्के गुण)
3. इयत्ता 9 वी ते 10 वी
शैक्षणिक अर्हता- संबंधित विषय गटातील पदवी
व्यावसायिक अर्हता- B.Ed/ B.A.Ed B.Sc.Ed / B.P.Ed. (For Physical Education Subject only)
4. इयत्ता 11 वी ते 12 वी -
1) शैक्षणिक अर्हता- संबंधित विषय गटातील किमान द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी
व्यावसायिक अर्हता- B.Ed/ B.A.Ed/ B.Sc.Ed/ M.P.Ed. (For Health and Physical Education Subject only) II) दोन विषय मिळून एक पूर्णवेळ पदाची शैक्षणिक अर्हता इयत्ता अकरावी व बारावी या गटातील दोन विषयासाठी एक पूर्णवेळ पदाची जाहिरात असेल तर या जाहिरातीतील दोन्ही विषयासाठी उमेदवार किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, नसल्यास असा उमेदवार या दोन विषयातील पदासाठी नियुक्तीस पात्र असणार नाही.
वरील सर्व गटासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांक 12/02/2023 रोजी वा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक आहे.
क) उमेदवारांची वयोमर्यादाः-
1. इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गाकरिता खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील पदांकरिता उमेदवारांची वयोमर्यादा महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये 9 (4) व अन्वये प्राथमिक शाळेशिवाय इतर कोणत्याही शाळेत कोणत्याही पदावर नियुक्ती करताना उमेदवाराचे वय किमान 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
2. इयत्ता पहिली ते आठवी वर्गाकरिता शिक्षण सेवक पदाकरिता बालकाचा सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्यानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक 07/02/2019 मध्ये नमूद मुद्दा क्रमांक 9 मध्ये नमूद केल्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी 40 (38+2) व आरक्षित प्रवर्गासाठी 45 (43+2) अशी राहील.
3. उमेदवाराचे वय पवित्र पोर्टल वरील पहिल्या टप्प्यातील जाहिरातीच्या म्हणजेच दिनांक 16/10/2023 रोजी चे वय ग्राह्य धरण्यात आले आहे.
ड) निवडीची कार्यपद्धती :-
1. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक 5059/2017 मध्ये दिनांक 21/11/2018 रोजी खालील प्रमाणे आदेश पारित केले आहेत..
a) The validity of Rules 6(2) and 6(3) and 9 (2A) and (2B) of MEPS Rules, introduced on 22/06/2017, is upheld on the touchstone of competency of the State Government and Article 19(1) (g) of the Constitution of India.
b) The procedure for selection and appointment of the teachers in the private schools, receiving or eligible to receive full or partial grant-in-aid from the State exchequer, shall be governed by provisions of Rule 6(1),(2) and (3) read with Rule 9 (2A) and (2B) of MEPS Rules, as are interpreted by us in paras 34,36,39 and 44 of the judgment without interfering with the right of the Management and/ of the School Committee to select and appoint the qualified, eligible and suitable candidate by holding the personal interview.
2. पवित्र प्रणालीतील स्व-प्रमाणपत्रांमध्ये उमेदवाराने नोंद केलेल्या माहितीच्या आधारे (आरक्षण प्रवर्ग, समांतर आरक्षण, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इत्यादी) संस्थेने दिलेल्या जाहिरातीतील रिक्त पदानुसार गुणानुक्रमे जास्तीतजास्त 1:10 या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून दिलेले आहेत.
3. उपरोक्त अ.क्र. 2 मध्ये नमूद केल्यानुसार 1:10 या प्रमाणाच्या मर्यादेत, उमेदवारांचे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील (TAIT) गुण, उमेदवारांनी दिलेला प्राधान्यक्रम, माध्यम, विषय, आरक्षण, समांतर आरक्षण इत्यादींचा एकत्रित विचार केलेला आहे.
4. वरील अ.क्र. 2 व 3 मधील बाबी विचारात घेऊन उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडला गेला आहे. त्यामुळे व्यवस्थापनस्तरावर या उमेदवाराचा गट, विषय व प्रवर्ग यामध्ये निवडीच्या वेळी बदल करता येणार नाही.
तथापि, मुलाखतीसाठी यादी तयार करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरत असल्यास, अशा उमेदवारांना त्याच्या मूळ प्रवर्गाऐवजी गुणवतेन्सार खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात आलेले आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर अंतिम निवडीच्या वेळी सदर उमेदवार गुणानुक्रमे खुल्या प्रवर्गातून निवड होत नसल्यास अशा उमेदवारांचा त्यांच्या मूळ प्रवर्गातदेखील (जाहिरातीत मूळ प्रवर्गाची जागा असल्यास) गुणवत्तेनुसार निवडीसाठी विचार करता येईल.
5. मुलाखत व अध्यापन कौशल्य यांमध्ये उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 2/12/2017 रोजीच्या शासन पूरकपत्रानुसार व शासन पत्र दिनांक 06/08/2024 नुसार गुणानुक्रमे निवडयादी तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. त्यासाठी सदर शासन पूरक पत्राचा विचार करूनच व्यवस्थापनास पुरविण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता (General Merit List) यादीमध्ये जो क्रम दिला आहे त्या क्रमाचा विचार उमेदवाराच्या निवडीसाठी करता येईल. याउपरही सदरच्या तरतुदी खालील प्रमाणे आहेत.
अ) मुलाखत व अध्यापन कौशल्य यांमध्ये समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
ब) समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील (अ) नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे.
क) वरील अनुक्रमांक (अ) व (ब) या दोन्ही अटींमध्ये देखील समान गुण ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास (म्हणजेच दिनांक 12/02/2023) पदासाठीच्या उच्चतर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (इयत्ता बारावी पदवी/ पदव्युत्तर पदवी डी.एड., बी.एड. समकक्ष) यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावे.
6. व्यवस्थापनाकडून संबंधित उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य द्वारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येईल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांची गुणांनुक्रमे यादी तयार करून पवित्र पोर्टलवरील व्यवस्थापनाच्या लॉगीनवर व्यवस्थापन नोंद करेल.
7. मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यवस्थापनाने उमेदवारांबाबत उपस्थित, अनुपस्थित, पात्र, अपात्र, प्राप्त गुण, आवश्यक तेथे अभिप्राय या सर्व बाबींची नोंद केल्यानंतर संबंधित व्यवस्थापनाची अंतिम निवडयादी पोर्टलवर तयार होईल.
४. निवड झालेल्या सर्वच उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडून केल्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित व्यवस्थापनाकडून नियुक्ती आदेश देता येईल.
9. सदर नियुक्ती आदेशामध्ये मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे दाखल असलेल्या विविध याचिकांच्या निर्णयांच्या अधीन राहून नियुक्ती देत असल्याचे नमूद करण्यात यावे.
10. उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर Interview Status मध्ये माहितीची नोंद पूर्ण केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत.
11. माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू या समांतर आरक्षणाच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी झाल्यानंतरच नियुक्ती आदेश देण्यात यावेत.
12. व्यवस्थापनाने निवड केलेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर 7 कार्यालयीन दिवसांमध्ये हजर व्हावे लागेल, उक्त कालावधीमध्ये उमेदवार हजर न झाल्यास व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील (प्रतिक्षाधीन / Wait listed) उमेदवाराची निवड करेल, निवडलेल्या प्रत्येक उमेदवारास हजर होण्यासाठी कमाल 7 कार्यालयीन दिवसांची मर्यादा असेल.
13. मुलाखतीसह शिक्षक पदभरती प्रक्रियेसाठी एका जागेसाठी उपलब्धतेनुसार जास्तीतजास्त 1:10 या प्रमाणात उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले जाणार आहेत. यामधील नियुक्ती आदेश दिलेला उमेदवार विहित कालावधीत रुजू न होणे, कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरणे अशा इतर कोणत्याही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या पदांवर व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील (प्रतिक्षाधीन / Wait listed) उमेदवाराची निवड करेल. परंतु असे करताना वरील सर्व निर्देशाचे तंतोतंत पालन करून पुढील उमेदवाराचा नियुक्तीसाठी विचार करावा,
14. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक 5059/2017 मध्ये दिनांक 21/11/2018 रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय दिनांक 07/02/2019 अन्वये व्यवस्थापनाकडे प्राप्त झालेल्या यादीतील (TAIT) परीक्षेतील उच्च गुण नसणाऱ्या उमेदवाराची निवड करावयाची झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे नमूद करावी लागतील. तसेच (TAIT) परीक्षेतील कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवड होत असल्यास अंतिम निकालामध्ये त्याबाबतची कारणे स्पष्टपणे नमूद करावीत. तसेच शाळा समितीने याबाबतचे अभिलेख जतन करून ठेवणे अनिवार्य राहील.
इ) मुलाखतीसह पदभरतीसाठी राज्यातील खाजगी व्यवस्थापनाकरिता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी वेळापत्रक :-
1. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता राज्यस्तरावरून 01/07/2025 ते 21/07/2025 हा कालावधी निश्चित करण्यात येत आहे.
2. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी व्यवस्थापनाकडील पोर्टलवर दिलेल्या रिक्त पदांच्या जाहिरातीनुसार उपलब्ध होणारे उमेदवार विचारात घेता व्यवस्थापनाला आपल्या स्तरावरून एक किंवा अधिक मुलाखतीचे पॅनल तयार करून मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही पूर्ण करता येईल यासाठी समितीमध्ये आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा समावेश करावा.
3. राज्यात पावसाळी वातावरणाचा विचार करता पूरपरिस्थिती इत्यादी सारखी नैसर्गिक आपती विचारात घेता व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडलेल्या सर्वच उमेदवारांना सहभागी होता येईल या दृष्टीने व्यवस्थापनाने त्यांचे स्तरावर योग्य ते नियोजन पुनर्नियोजन करावे.
4. व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडलेल्या सर्वच उमेदवारांना आपल्या स्तरावरून त्यांच्या ई-मेलद्वारे विहित मुदतीत मुलाखत घेण्यात येत असल्याचे मुलाखतीचे ठिकाण, मुलाखतीचा दिनांक व वेळ इत्यादी बाबत कळवावे जेणेकरून सर्वच शिफारस पात्र उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी प्रक्रियेत सहभागी होतील.
5. बहुतांश उमेदवार एकापेक्षा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले गेले आहेत अशा उमेदवारांपैकी काही उमेदवारांना एकाच वेळी दोन अथवा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर अशा अन्य प्रकारच्या अपवादात्मक परिस्थितीत उमेदवारांची येणारी विनंती विचारात घेऊन संबंधित उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या वेळापत्रकामध्ये आवश्यक तो बदल करावा जेणेकरून मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या सर्वच उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी हजर राहता येईल.
6. शिक्षण सेवक शिक्षक पदभरती दरम्यान अडचणी येत असल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, मोबाईल क्रमांक व संस्थेचा ई-मेल आयडी इत्यादी माहिती शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून उमेदवार, व्यवस्थापन व शिक्षण विभाग यांच्यामध्ये समन्वय राहील.
क) उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी/पडताळणी :-
व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांचे पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व पोर्टलवर अपलोड केलेली आवश्यक सर्व कागदपत्रे व्यवस्थापनास ऑनलाईन पडताळणीसाठी त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या सुविधेचा वापर करून व्यवस्थापनाने उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस येण्यापूर्वी पूर्वतयारी करता येईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळी शिक्षणाधिकारी यांचा प्रतिनिधी संस्थेने ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहील. तथापि, सदर प्रतिनिधीचा प्रत्यक्ष मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या कार्यवाहीमध्ये कोणताही सहभाग राहणार नाही,
मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहत असलेल्या सर्व उमेदवारांचे बाबतीत त्यांच्या स्व-प्रमाणपत्रांमध्ये नौद केलेली माहिती मूळ कागदपत्रांवरून पडताळल्यानंतर उमेदवार पात्र असल्यास, अशा उमेदवाराची मुलाखत संबंधित व्यवस्थापन घेईल.
मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर नियुक्तीसाठी अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांची कागदपत्रे संबंधित शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पदांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक तपासतील आणि उमेदवार निवड झालेल्या पदासाठी पात्र आहे अथवा नाही याबाबत स्पष्ट अभिप्राय व्यवस्थापनास कळवतील.
उमेदवाराने स्व-प्रमाणपत्र पूर्ण करताना अपलोड केलेली कागदपत्रे व ज्या पदासाठी निवड झालेली आहे त्या पदासाठी आवश्यक असलेल्या खालील प्रमाणे कागदपत्राची प्रसाणपत्राची तपासणी/पडताळणी करावी.
1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक (गुणपत्रक नसल्यास स्व प्रमाणपत्रातील नमूद असलेले गुण विचारात घेण्यात येतील.)
2. शालांत परीक्षा प्रमाणपत्र (जन्मतारखेच्या पडताळणीसाठी )
3. उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (इयता । ली ते 5 वी गटातील पदासाठी)
4. डीएड/डीटीएड/डी.एल.एड. परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5. शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (TET/CTET-Paper-1,TET/CTET-Paper-2 (लागू असल्यास)
6. पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7. व्यावसायिक अर्हतेसाठी बी. एड. एम.एड./बी.पी.एड. (फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी) एम.पी.एड. (फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी)
8. अ) उमेदवाराची निवड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ). अटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (3) विशेष मागास प्रवर्ग (SBC), इतर मागास प्रवर्ग (OBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) या प्रवर्गातून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्रांची व जात पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी व्यवस्थापनाने करावी. ब) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करण्याची आवश्यकता नाही.
क) विमुक्त जाती (अ). भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) विशेष मागास प्रवर्ग (SBC), इतर मागास प्रवर्ग (OBC), सामाजिक आणि व्यवस्थापनमागास वर्ग (SEBC) या प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करणे आवश्यक राहील व्यवस्थापनाने सदरचे प्रमाणपत्रांची तपासणी करावी.
ड) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांनी उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) ची आवश्यकता नाही. तथापि, त्यांच्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले (EWS) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
9. जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate)
10. समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान 40 टक्के दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र (लागू असेल तेथे)
11. अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असेल तेथे)
12. समांतर आरक्षणातून निवड झाली असल्यास त्याबाबतचा पुरावा. (माजी सैनिक / अंशकालिन कर्मचारी । प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / खेळाडू)
अ) माजी सैनिक या समांतर आरक्षणातील लाभासाठी स्वतः माजी सैनिक असल्याचे अथवा शहीद सैनिकाचे पाल्य विधवा असल्याचे प्रमाणपत्र,
ब) पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी (तहसीलदार) यांचे प्रमाणपत्र.
क प्रावीण्यप्राप्त खेळाडू या समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल.
13. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) (लागू असेल तेथे)
14. उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतया कायदेशीर पुरावा पडताळून पुढील कार्यवाही करावी.
पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठीचे आरक्षण, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण, संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान, ओळखपत्र बाबत, दिव्यांग व्यक्तीसाठीच्या आरक्षणाबाबत, माजी सैनिक आरक्षण, खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा दावा, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याबाबत इत्यादी. वरील सर्व प्रकारच्या सवलतीच्या तरतुदीबाबत उमेदवारांसाठी दिनांक ०१/०९/२०२३ रोजी पवित्र पोर्टलवर सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत, सदर सूचनांचे अवलोकन करावे.
15. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत, मदतनीस, प्रश्नांची कमी संख्या इल्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला आहे. अशा उमेदवारांकडे स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे प्रमाणपत्राचे असल्याची खात्री करावी. ज्या दिव्यांग उमेदवारांची शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता, त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गातून झाली असेल, तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी. अशा उमेदवारांकडे संबंधित प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. प्रमाणपत्रे नसल्यास उमेदवार कोणत्याही प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
16. कागदपत्रे पडताळणीअंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी.
17. नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचवी तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी.
18. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, मुलाखत व अध्यापन कौशल्य मूल्यमापन, पात्र-अपात्रतेची कारणे, उमेदवाराचा रुजू अहवाल इत्यादींबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी व्यवस्थापनाच्या लॉगीनवर कराव्यात.
19. विविध शासन निर्णयांमधील व नियमावलींमधील तरतुदींनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील, याची नोंद घ्यावी.
20. कागदपत्रे पडताळणीअंती नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीप्राधिकाऱ्यांनी नियुक्ती देण्याबाबतची आवश्यक कार्यवाही करावी.
संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments