दिवसातून तीनदा हजेरी; पोरगा शाळेत नसेल तर एसएमएस येणार!
विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसी कॅमेरेही लागणार, समुपदेशही केले जाणार!
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत, शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या नियमानुसार आता विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून तीन वेळा घेण्यात येणार असून, गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती त्वरित त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णपणे संबंधित शाळांवरच असणार आहे.
वर्गात पोरांची दिवसातून तीनदा हजेरी!
आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून तीन वेळा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे. सकाळी शाळा सुरू होताना, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या आधी अशी तीन वेळा हजेरी घेण्यात येणार आहे. यामुळे पालकांना आपला पाल्य गैरहजर असल्यास तात्काळ माहिती मिळू शकणार आहे. गैरहजेरीचे प्रमाण कमी होईल.
विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकाला त्वरित 'मेसेज'
विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचा अचूक मागोवा घेता येईल आणि जर एखादा विद्यार्थी गायब असेल, तर त्याची माहिती त्वरित पालकांपर्यंत पोहोचविता येईल. हे पाऊल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जात असून, शाळांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाचे नवे आदेश काय?
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी १५ महत्त्वपूर्ण उपाय जाहीर करण्यात आले आहेत. त्यात शाळेच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी, शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित चाहने उपलब्ध करून देणे, यांसारख्या बाबींचा समावेश आहे. शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण शाळा परिसरात सीसी कॅमेरे कार्यरत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि संरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे, असा यामागील उद्देश आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments