बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा या ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानुसार जर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला तर त्या कुटुंबाला पाणी व घरपट्टी कर माफ करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे!
परिसरातील भडगाव मायंबा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यांचे पालकांना ग्रामपंचायतकडून घेतला जाणारा पाणीपट्टी आणि घरपट्टी कर माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दि.२४ मे रोजी झालेल्या गावकऱ्यांच्या ग्रामसभेत वतीने एकमताने ठराव मंजूर केला गेला आहे.
यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भवितव्य टिकवून ठेवणे आणि गावकऱ्यांमध्ये शाळेबाबत जाणीव निर्माण करणे हा आहे.
या उपक्रमाद्वारे सरकारी शाळेची ओढ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ग्रामसभेत हनुमान पालकर यांनी हा ठराव वाचून दाखवला, तर राहुल साखरे यांनी त्याला अनुमोदन दिले. या बैठकीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच अनुसया खडके होते.
सरकारी शाळेचे भवितव्य टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिक बळकट होऊन गावकऱ्यांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
-अनुसया खडके, सरपंच
२४ मे रोजी आयोजित ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला.
प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच प्रवीण इंगळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल साखरे, शंकर मगर, विजय साखरे, शरद पालकर, धनंजय साखरे, गौतम भटकर, किशोर इंगळे, सुभाष पाटील, गणेश पाटील, सुधाकर पालकर, भगवान शेळके, भागवत साखरे, वैभव ताडे, रमेश इंगोले, नऊ साखरे, गुलाबराव जाधव, विठ्ठल खडके, अशोक साखरे, संजय साखरे, दीपक खडके, गणेश तायडे, अनिल भटकर, करण मगर, शंकर इच्छित, योगेश इरशीत, रामकृष्ण इंगळे आणि संजय इंगळे उपस्थित होते.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments